पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. .] अध्याय ५ वा. १६३ आम्हांशीं कृतघ्नपणानें वागत आहेस." गोपींचें तें भाषण ऐकून श्रीकृष्ण भगवान्, प्रसन्न झाला व प्रसन्न चित्तानें म्हणाला; "तुझीं अहर्निश माझें भजनपूजन करीत. जा, ह्मणजे मी नेहमी तुमच्या जवळच आहें, मी आपल्या भक्तांपासून क्षणभरहि दूर होत नाहीं; इतकेंच नव्हे, तर भक्त जसे माझे दास होतात, त्याप्रमाणे मीहि आपल्या भक्तांचा दासानुदास होऊन त्यांचें कार्य करतों. " याप्रमाणे कृष्णासह त्या गोपींनीं त्या वृंदावनांत रात्री आनंदानें घालविल्यावर त्या गोपी गोकुळांत परत आल्या. त्या गोपी जेव्हां गोकुळांत परत येऊं लागल्या, तेव्हां त्या आनंदभराने गाणीं ह्मणूं लागल्या व नाचूं लागल्या; त्यांच्या आगमनानें सर्व गोकुळांत सुवास सुटला. तो चमत्कार पाहून सर्व गवळी आश्चर्य करूं लागले व त्यांनां हा कांहीं सुखाचा प्रसंग आहे किंवा हें कांहीं संकट येत आहे तें कळेना. नंदाने घरांत जाऊन प्रथम कृष्णाचा शोध केला, तो कृष्ण व बलराम शय्येवर स्वस्थ निजले आहेत; त्याप्रमाणे त्या गवळ्यांच्या स्त्रिया व गोपाळहि स्वस्थ निजले आहेत असें गवळ्यांच्या दृष्टोत्पत्तीस आलें. तेव्हां तो काय प्रकार आहे याची कोणासच कांहीं कल्पना होईना. हें कांहींतरी अरिष्टच आहे अशी सर्वांची समजूत झाली व त्या अरिष्टाच्या शांतीसाठी नंद, गोपाळ, स्त्रिया, कृष्ण व बलराम वगैरे सर्व अंबिकेच्या यात्रेला जाण्याची तयारी करूं लागले. हल्ली आपणास दिवस बरोबर नाहींत अशी त्या गवळ्यांची समजूत झाली. मागें अतिवृष्टि झाली, नंदाला वरुणानें नेलें, वगैरे अनेक संकटें एकामागून एक आली, यावरून दिवसच वाईट आले आहेत असे वाटतें, तर या अरिष्टांची शांति व्हावी म्हणून सर्व अंबिकेच्या मंदिरांत आले. तेथें यथाविधिपूर्वक अंबिकेची पूजाअर्चा करून अंबिकेला नैवेद्य समर्पण केला व सर्वजण भोजन करून आनंदानें तेथें निजले. सर्वजण गाढ झोंपी गेल्यावर तेथें एक मोठा सर्प आला व तो नंदाच्या पायाला चावला; त्या सर्पाच्या दंशानें नंद जागा झाला व व्याकुळ होऊन कृष्णा ! कृष्णा ! म्हणून हांका मारूं लागला. त्याबरोबर तेथें कृष्ण आला व त्यानें त्या सर्पाला लाथ मारून तेथून दूर केलें. परंतु सर्पाला कृष्णाचा पाय लागल्याबरोवर तो शापमुक्त झाला व तेथें सर्पाच्या ऐवर्जी एक सर्वांग सुंदर मनुष्य निर्माण झाला. तो कृष्णाला नमस्कार करून म्हणाला; " हे पतितपावना नारायणा ! आज तुझ्या चरणस्पर्शाने मी शापमुक्त झालों. मी सुदर्शन नांवाचा गंधर्व आहे. अंगिरा ऋषीला नग्न पाहून हंसलों म्हणून त्यांनी मला सर्प होशील असा शाप दिला. त्यांची प्रार्थना करून क्षमा मागि तल्यावर त्यांनी कृष्णाचा पाय लागल्यावर तूं शापमुक्त होशील असा मला उःशाप दिला होता; त्याप्रमाणें मी आज शापमुक्त झालों." असें म्हणून त्या गंधर्वानें कृष्णाच्या चरणांवर मस्तक ठेविलें व तो गंधर्वलोकीं निघून गेला. कृष्णाचें तें विलक्षण सामर्थ्य पाहून सर्व गवळ्यांनां मोठें आश्चर्य वाटलें, व प्रत्यक्ष परमात्मा