पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ [ स्तबक होतें तिला सर्व गोपींमधून इकडे एका बाजूला आणण्यासाठी कृष्णानें आपली निवड केली, यावरून आपले स्वरूप विशेष सुंदर आहे, असा तिला अभिमान उत्पन्न झाला; पुढे एक वृक्ष फुलांच्या बहारानें फारच प्रफुल्लित झाला होता; तेव्हां तीं फुलें तोडून घेण्याची त्या स्त्रियेला इच्छा झाली. तिची ती इच्छा जा- णून कृष्णानें तिला आपल्या खांद्यावर उभें केलें व फुलें तोडण्यास सांगितलें, त्या वेळी तर त्या स्त्रियेला अत्यंतच गर्व झाला. ती तिची अहंकारी मुद्रा पाहून कृष्णाला तिचा फार तिटकारा आला व त्यानें तिला त्या वनांत एकटीलाच टाकून तो दुसरीकडे निघून गेला. इकडे गोपी, आपणांमधून श्रीकृष्ण निघून गेल्यावर त्याचा शोध करीत करीत त्या वृंदावनांत आल्या, पाहतात तों तेथें कृष्ण नसून एकटीच एक गोपी बसली आहे. तिला त्या गोपी म्हणाल्या; " अगे ! तुला सोडून श्रीकृष्ण कोणीकडे निघून गेला ? " तो त्यांचा प्रश्न ऐकून तिला अधिक वाईट वाटलें, व तिला आपल्या अहंकाराबद्दल अधिक पश्चात्ताप वाटू लागला. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले, व ती करुण- वाणीनें कृष्णाचा धावा करूं लागली. ती म्हणाली; " हे श्रकृिष्णा ! हे करुणानिधे ! मी मनांत प्रापंचिकाप्रमाणें अहंकार धरिला, अभिमानानें तुला विसरून मीच आपले गुण गाऊं लागलें, म्हणून माझ्यावर रुसून कोणीकडे निघून गेलास ? पण हे गोविंदा ! तुझ्या ठिकाणी माझें जर खरें प्रेम नसतें तर मी आपला पति-पुत्र-सासू सासरा या सर्वोनां सोडून तुझ्याकडे आले नसतें. तुझ्यासाठी मी आपले घरदार सोडलें, सर्व प्रपंच सोडला, व तुझ्या लीला पाहण्यासाठी मी तुझ्याजवळ आलें, आणि तूं मला एकटीलाच टाकून कोणीकडे निघून गेलास ? " याप्रमाणें ती स्त्री कृष्णाची करुणा भाकूं लागल्यावर कृष्णाला तिची दया आली व तो तेथें एकदम प्रकट झाला. श्रीकृष्णाची ती श्यामसुंदर मूर्ति प्रगट होण्याबरोबर सर्व गोपीनां अत्यानंद झाला, व त्यांनी कृष्णाच्या चरणावर मस्तकें ठेविली. त्या सर्वजणी कृष्णाला हात जोडून म्हणाल्या; हे कृष्णा ! हे अनंता ! हे वासुदेवा ! आम्हीं सर्वजणी तुझ्या चरणाच्या दासी झालों असून तूं आमचा क्षणोक्षणीं अव्हेर करितोस हैं बरें नव्हे. तूंच आम्हाला तुझ्याजवळून दूर केल्यास आम्हीं शरण तरी कोणाला जाणार ? हे देवाधिदेवा ! तुझ्या प्रेमसंपादनाकरितां व तुझ्या प्रसन्नते करितां आह्मी तुझी करुणा तरी कशी भाकावयाची? तुझी शुश्रूषा कशी करावयाची ? ते एकदां आम्हांला सांग, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे वागत जाऊं. आपले जो भजनपूजन करील, त्याचे आपणही भजनपूजन करावें, ही एक प्रकारची भक्ति आहे, जरी आपलें कोणीं भजनपूजन केले नाहीं, तरी दुसऱ्याचें भजनपूजन करावें, हाहि एक मार्ग आहे. कित्येक आपले भजनपूजन करितात त्यांचें भजनपूजन जे करीतहि नाहीत, अशा प्रकारचे लोक कृतघ्न होत. त्याप्रमाणे आम्ही तुझ्या चरणरजाचे किंकर होऊन तुझी भक्ति करितों, पण तूं कथाकल्पतरु.