पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

h ४ था. ] अध्याय ५ वा. १६१ स्त्रियांप्रमाणेच गोपाळ, गाई, वनांतील पक्षी, वगैरे सर्वांची तशीच चमत्कारिक अवस्था झाली. सर्व कुंजवनांत कृष्णाजवळ येऊन उभे राहिले. त्या आलापदार सुवर वेणू नादानें दशदिशांना फिरणारा वायुही स्थिर झाला होता, व यमुनेच पाणीही स्तब्ध झाले होतें. इतकी विलक्षण चित्ताकर्षकता त्या वेणुनादांत होती. अधिक • काय ? पण स्वर्गातून देव, गंधर्व व अप्सरागणही त्या मुरलीच्या नादानें तल्लीन होऊन आकाशांत आपल्या विमानांत बसून आले होते. त्या वेणु- नादानें देहभान विसरून गेलेल्या गोपीनी मुरलीच्या स्वराबरोबरच नाचण्यास आरंभ केला. तें नृत्य पाहून अप्सरांनीही तोंडांत बोटे घातलीं, मग इतर लोक त्या नृत्यानें थक्क झाले असतील यांत मोटेसें नवल तें काय ? श्रीकृष्ण अनेक रूपें धारण करून एक गोपी व एक आपण या प्रमाणें फेर धरून, • सुंदर गाणी म्हणून नाचूं लागले व मध्यभागीही आपणच वेणु वाजवूं लागले. ती निरनिराळ्या सुरांची सुस्वर गाणीं व तें सुंदर नृत्य पाहून सर्व आपआपलें वैर विसरून जाऊन तल्लीन झाले, गाय व सिंह, हरिण व वाघ, लांडगा व बकरी, याप्रमाणे जन्मापासून ज्या प्राण्यांमध्ये वैर असतें ते प्राणी देखील वैर विसरून जाऊन तेथें आनंदाने डोळूं लागले. ते अनेक कृष्ण व त्या अनेक गोपी यांची ती अनुपमेय क्रीडा पाहून सर्व आश्चर्य- चकित झाले. कृष्णाचें तें कौतुक पाहण्यासाठी इंद्र आपला सारथी जो मातली त्यासह ऐरावतावर बसून आला होता. त्याच्यावर मेघरूपी छत्री होती; व त्याच्या हातांत प्रखर धारेचें वज्र होतें. आग्नेयदिशे- कडील अधिपति जो अग्नि तो. मेंढ्यावर बसून आला होता, त्याची अंगकांति कुंकुमासारखी दैदीप्यमान असून त्याला सात जिव्हा होत्या, दक्षिण दिशेचा राजा यम हा तेथें काळ्या टोणग्यावर बसून व कृष्णवसनें परिधान करून आला होता; काळपाश व काळदंड ही त्याची दोन्हीं आयुधे त्याच्या हातांतच होती. नैऋत्यदिशेकडील नैर्ऋति डुकरावर बसून आला होता, पश्चिमेचा यरुण मृगावर बसून आला होता, वायव्यदिशेचा राजा पवन हाहि आला होता, उत्तरेचा सोम राजा मृगावर बसून आला होता, ईशान्यदिशेचा राजा ईशान हा

  • बैलावर बसून आला होता, त्याला पांच तोंडे असून दहा हात होते, पाशुपत,

त्रिशूळ, डमरु, शंख, चक्र, नागपाश वगैरे आयुधें त्याच्या हातांत होती. हे सर्व देव श्रीकृष्णाला नमस्कार करून ती कृष्णाची लीला अवलोकन करीत होते. ती कृष्णाची लीला पाहून त्यांनां त्याबद्दल हेवा वाटू लागला व आपण गोपाळ होऊन त्या मुखाचा लाभ घ्यावा असे त्यांनां वाटू लागलें, परंतु बिचान्या देवांच प्राक्तन तितकें थोर नव्हतें. असो, श्रीकृष्णानें तेथें बराच वेळ क्रीडा केल्यावर ते त्यांतील एका गोपीला आपल्या कडेवर उचलून घेऊन तेथून निघून आणखी दूर त्याच वृंदावनांत गेले, ज्या गोपीला कृष्णानें उचलून नेलें- राजा 19