पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकर पतरु. [ स्तबक चरुणा ! मी आपला पिता जो नंद त्याला नेण्यासाठी येथे आलो आहे; तर नंदाला माझे स्वाधीन कर, व त्याला येथें कां आणिलें, तें सांग." तेव्हां वरुण म्हणाला; “हे श्रीकृष्णा! नंदानें शौचायमन केलें नाहीं, पाय धुतले नाहीत, आणि दंतधावन विधीहि केला नाहीं, शिवाय श्रीहरीचें स्मरण न करितां हा सूर्योदयापूर्वी तसाच पाण्यांत शिरला, म्हणून मी त्याला येथे आणिलं. आणि हे देवाधिदेवा, अशा कारणानें तरी तुझें दर्शन व्हावें असाहि माझा हेतु होता. हे जगदीश्वरा; मला तूं दिक्पाळ केलेंस व एवढी सत्ता मला दिलीस ही सर्व नुझीच संपत्ति आहे. आम्ही केवळ तुझे दासानुदास असून तुझ्या आज्ञेप्रमाणें वागत अहोत.” असे सांगून वरुणानें नंदाला कृष्णाच्या स्वाधीन केले व मोठ्या सत्कारानें त्या दोघांनां गोकुळांत पोहोंचतें केलें. नंतर घरी येऊन नंदाने मोठ्या समारंभानें द्वादशीचं पारणें सोडिलें. नंदानें वरुण लोकीं घडलेली हकीकत सर्व गवळ्यांनां सांगितल्यावर त्या सर्वांना वरुण-लोक पाहण्याची इच्छा झाली. तेव्हां कृष्णानें त्या सर्वांना एकदां यमूनेवर स्नानाला नेलें, व ते स्नान करीत असतां त्यांनां तेथून एकदम विष्णु लोकीं नेलें. तेथें पाहतात तो विष्णु लक्ष्मीसह आपल्या सिंहासनावर बसले असून अनेक देव विष्णूपुढे हात जोडून स्तुति करीत होते. त्या देवांमध्यें वरुणहि उभा होता. तो प्रकार पाहिल्यावर ते गवळी पुन्हां यमूनेंत आले व स्नान वगैरे करून घरोघर गेले. विष्णु लोकीं श्रीकृष्णाला सिंहासनावर बसलेला, व सर्व देव त्याच्या समोर हात जोडून प्रार्थना करीत आहेत असा प्रकार पाहून त्यांनां वरुण लोक पाहण्याची इच्छा राहिली नाहीं. आपणास श्रीकृष्ण हा प्रत्यक्ष परमात्मा मिळाला आहे अशी त्यांची खात्री झाली. ४. रासक्रीडा. पुढे शरहतु संपून वसंत ऋतूला आरंभ झाला असतांना श्रीकृष्ण कुंज- वनांत जाऊन मुरली वादन करीत बसले, त्यावेळी कुंजवनांतील वनश्री कांहीं अपूर्व अशी होती. मोगरा, जाई, जुई, चमेली वगैरे वेलींना त्या त्या फुलांचा चहार आला होता. त्या फुलांच्या सुवासानें गुंग झालेले भ्रमर सर्वत्र गुंजारव करीत होते. सुवासानें सर्व अरण्य भरून गेले होते. त्या दिवशीं फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्यामुळे सर्वत्र स्फटिकाप्रमाणें स्वच्छ चांदणें पडलें होतें. गोकुळांत घरोघर वसंतपूजा करून लोक आपल्या शयनावर आपापल्या स्त्रियेसह आनंदाने क्रीडा करीत होते, इतक्यांत कुंजवनांत श्रीकृष्णाचें चाललेले मुरलीवादन ऐकून गोकुळांतील सर्व लोक तल्लीन होऊन गेले. त्या मधुर व चित्ताकर्षक वेणुनादानें स्त्रिया आपलें देहभान विसरून गेल्या. श्रीकृष्णाच्या जवळ जाऊन ती मुरली ऐ- कावी असे त्यांना वाटले व त्या आपल्या पतींना शय्येवर निजवून ठेवून कुंजवनांत आल्या. कित्येक स्त्रिया मुलांना पाजीत होत्या, त्या आपल्या मुलाला ठेऊन तशाच कृष्णाकडे आल्या; कित्येक गृहकृत्यें तशींच टाकून आल्या. .