पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] अध्याय ५ वा. १५९ पाप व दुष्ट या सर्वांचा नाश करीत असतों. वास्तविक माझें राजसाबरोबर वैर नाहीं, व देवाबरोबर भिन्नत्वही नाहीं. मी हें सर्व चराचर निर्माण केले आहे, त्यांत अमुक आवडतें हा भेदभाव माझ्याजवळ मुळींच नाही. फक्त राजस, तामस व सत्व या गुणांवर माझा सर्व खेळ चालला आहे. तामस मला अप्रिय होतात व राजस मला प्रिय वाटतात. जेव्हां तामसी प्रकृतीचे लोक अत्यंत निंद्या- चरणानें वागतात तेव्हांच मी अवतार घेऊन दुष्टांचा नाश करितों व साधूंचा प्रतिपाळ करितों. तूं आतां आपल्या अमरावतीला सुखानें जा, व गर्व सोडून वागत जा, तुला आपला भाग मिळेल अशी मी व्यवस्था करितों. दिपवाळीत चतुर्दशीचे दिवशीं स्नान करून जे लोक दान देतील तें तुला प्राप्त होईल, अमावास्येच्या दिवशी केलेले दान पितरांना मिळेल, व प्रतीपदेच्या दिवशीं

  • केलेलें दान गोवर्धनाला मिळेल. ” याप्रमाणें कृष्णानें सांगितल्यावर इंद्रानें

कृष्णाच्या चरणावर मस्तक ठेविलें व तो कृष्णाचा अशिर्वाद घेऊन अमरावतीस निघून गेला. त्या वेळीं इंद्रानें बरोबर कामधेनु आणिली होती, तिनें कृष्णाला अभिषेक करून कृष्णाचें गोविंद असें नांव ठेविलें. ३. गवळ्यांनां वैकुंठाचें दर्शन. याप्रमाणें गोकुळांत श्रीकृष्णाच्या अनंत लीला चालल्या होत्या. नंतर एके. कार्तिक शुक्ल एकादशीचे दिवशीं नंद व इतर गवळी हरिजागरण करीत बसले. रात्रभर भजन-कीर्तन झाल्यावर पहाटेस पारणें सोडण्याची तयारी करण्याकरितां नंद यमूनेवर स्नानला गेला. त्यावेळी सूर्योदय झाला नस- ल्यामुळे पाण्यावर वरुणाची सत्ता होती, शिवाय नंदानें पाय धुतले नव्हते. तो पाण्यांत हरिनामोच्चारण न करितांच गेला त्यामुळे जलदेवता त्यावर रागावली व तिनें त्याला ओढून पाताळांत नेलें. पाताळांत गेल्यावर त्या जलदेवतेनें नंदाला वरुणापुढे उभें केलें. वरुणाची ती भव्य नगरी व त्याचे तें अपार वैभव पाहून नंद थक्क होऊन गेला. इकडे नंद पाण्यांत बुडालेला पाहून सर्व गवळी घाबरले व त्यांनीं तो प्रकार तत्काल कृष्णाला कळविला.. ती हकीकत ऐकून गोकुळांतील सर्व लोक अत्यंत दु:खी झाले व श्रीकृष्णासह यमुनेच्या कांठी आले. कृष्णानें तेथें आल्याबरोबर पाण्यांत बुडीमारली व तो नंदाचा शोध काढीत काढीत पाताळांत वरुणलोकी गेला, व जेथें वरुण व नंद बसला होता तेथें जाऊन उभा राहिला. ती कोटि सूर्याप्रमाणें श्रीकृष्णप्रभूची दैदिप्यमान मूर्ति पाहून वरुणानें कृष्णाला ओळखिलें व लगेच साष्टांग नमस्कार करून तो म्हणाला; " हे वैकुंठनाथा ! तुझें आज दर्शन झालें हैं माझें महत् भाग्य होय. या पामराला तुझें दर्शन घडावें अशी याची मुळींच योग्यता नाहीं, म्हणून मला असे वाटतें किं, माझ्या आईबापांच्या सुकृतामुळेच तुझें मला दर्शन झालें." याप्रमाणें वरुणानें कृष्णाची स्तुति केल्यावर कृष्ण म्हणाला; “ हे