पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ [ स्तबक जणूं काय आपण आपल्या घरींच आहोत, असें वाटलें; व ते आपल्या गायी गुरांसह आपापले व्यवसाय करू लागले. सर्व गवळी तेथें एके ठिकाणी अस- ल्यामुळे त्यांचा तो काळ फारच आनंदानें जात असे. त्या पर्वतानें आश्रय दिल्यामुळे प्रलय कालापासून आपलें रक्षण झालें, असें वाटून सर्व गौळी तो पर्वत हाच खरा ईश्वर आहे, व याचा अधिकार इंद्रापेक्षांहि मोठा आहे, असे मानू लागले. आपल्या भक्तांसाठी हा पर्वत आकाशाला चिकटला व आपल्या तळाखाली त्यानें वीज, वारा, पाऊस, गारा यापासून आपलें संरक्षण केले अशी त्या गवळ्यांची दृढ भावना झाली. कृष्णानें हा मार्ग दाख- विल्यामुळे कृष्णाचे तर ते फार उपकार मानू लागले. याप्रमाणे सात दिवस त्या पर्वताखाली राहिल्यावर आकाशांत जमलेले मेघ नाहींसे झाले व त्यामुळे पर्जन्यहि नाहींसा झाला. इकडे मेघ इंद्रलोकीं गेले व ते इंद्राला सांगू लागले किं, " हे देवेंद्रा ! तुझ्या आज्ञेप्रमाणें आह्मीं सात दिवसपर्यंत अहोरात्र गोकुळावर वृष्टि केली, परंतु तो गोवर्धन पर्वत गोकुळावर छत्रीप्रमाणे राहिल्यामुळे आमच्या वृष्टीचा कांहींहि उपयोग झाला नाहीं. गोकुळावर एक थेंब किंवा एखादि गारहि पडली नाहीं. तो पर्वत तेथें कोणाच्या बळानें आका- शांत तरंगत आहे तें आह्मांला तर कांहीं समजलें नाहीं." तें त्या मेघांचें भाषण ऐकून इंद्राला अत्यंत आश्चर्य वाटलें व तो आपल्या सेवकांसह गोकुळांत आला. तेथे येऊन पाहतो तों, श्रीकृष्ण भगवान आपल्या वामकरांगुलीवर गोवर्धन पर्वत उचलून उभे राहिले आहेत. ती भगवंताची विलक्षण शक्ति पाहून इंद्राचा गर्व पार नाहींसा झाला. तो कृष्णाला अनन्यभावें साष्टांग नमस्कार करून म्हणाला; " हे देवाधिदेवा अनंता ! हे अव्यक्तव्यक्ता पुराण पुरुषा ! तूं मोक्षा निधान असून तूंच या त्रैलोक्याचा आधार आहेस. आम्हां सर्व देवांनां तुझाच आधार असून तूंच आमचें संरक्षण करति आहेस. तुझी माया विक्षलण आहे, तुझी शक्ति आम्हाला कळत नाहीं, तुला पूर्णपणे ओळखावयाला आह्मी असमर्थ आहों. सर्व प्राणीमात्रांना कर्मबंधनांनी बांधून, तूं हे सर्व विश्व मोहून टाकिले आहेस. तूं त्रिगुणाचें यंत्र तयार करून हीं अनंत जीवरूप बाहुलीं नाचवीत आहेस, मी अभिमानानें अंध होऊन तुझ्या शक्तीचा विचार न करितां मेघांनां पाठविलें, याबद्दल क्षमाकर. माझी इंद्रपदावर तूंच स्थापना केली आहेस, आणि तुझ्याच कृपेमुळे मी त्या इंद्रपदाचा उपभोग घेत आहें. हें श्रीकृष्णा ! त्या पदाचा अभिमान तूं आळगू लागल्यास मला या वनांत मग कोणीहि विचारणार नाहीं.” या प्रमाणे इंद्रानें श्रीकृष्णाची प्रार्थना करून श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार घातला, व हात जोडून पुढे उभा राहिला. तेव्हां श्रीकृष्ण म्हणाला; "हे इंद्रा ! तूं माझ्या शक्तीचा विचार न करितां वागलास म्हणून तुला हे मानभंगाचें फळ मिळाले. आम्ही वेळोवेळीं अवतार घेऊन अहंकार, कथाकल्पतरु.