पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ५ वा. ३ कच व देवयानी. देवयानी म्हणाली; “राजा, माझा बाप शुक्राचार्य हा तामसी वृत्तीच्या असु- रांचा गुरू असून त्याला संजीवनी मंत्र अवगत आहे. जेव्हां जेव्हां सुर व असुर यांचें युद्ध होते, तेव्हां तेव्हां युद्धांत मरणाऱ्या असुरांना माझा बाप संजीवनी मंत्रानें जिवंत करितो. असुरांची अशी स्थिति असल्यामुळे देवांना फार त्रास होऊं लागला. ही विद्या देवां पैकी कोणालाच अवगत नसल्यामुळे ही कशी प्राप्त करून घ्यावी, याचा देवांनां मोठा विचार पडला. तेव्हां देवगुरू बृहस्पति यांनीं आपला मुलगा कच, यास माझे बापाकडे ती विद्या शिकण्यासाठी पाठ- वून दिलें. कच विद्या शिकण्यासाठी आल्यावर शुक्राचार्यांनी त्यास 'तुला दैत्य फार त्रास देतील, तेव्हां तूं ही विद्या शिकण्याचे भानगडीत पडूं नको' म्हणून सांगितलें. परंतु कच आपला हेका सोडीना, तेव्हां मीहि आपल्या वापाला सांगितले की, 'बाबा, हा जातीनें ब्राह्मण आहे, आपला ज्ञातिबंधु आहे, याचा अभिमान आपण धरून याला विद्या अवश्य शिकविली पाहिजे. आपण याचें संरक्षण करणारे असल्यावर, राक्षस याला काय करणार आहेत ?' असें मी आपल्या पित्याला सांगून कचास आपले घरी ठेवून घेतलें. तो व मी समवयस्क असल्यामुळे आह्मां उभयतांत साहजिक प्रीति उत्पन्न झाली, तो घटकाभर दृष्टीस पडला नाही म्हणजे मला मुळींच करमत नसे. पुढे ही गोष्ट दैत्यांचे कानावर जाऊन त्यांनां कच संजीवनी विद्या शिकण्यासाठी आला आहे, हे सम. जलें. तेव्हां त्यांनीं एके दिवशी कचाला जंगलांत गांठून ठार भारून टाकलें- त्या दिवशीं कच घरी लवकर न आल्यामुळे मला मोठी काळजी वाटू लागली, म्हणून मी आपल्या पित्याला त्याच्यासंबंधानें विचारिलें, पित्यानें अंतर दृष्टीने सारा प्रकार पाहून मला घडलेली हकीकत सांगितली. तेव्हां मी आपल्या बापाला कचास संजीवनी मंत्रानें जिवंत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पित्यानें त्यांस जिवंत केलें. पुढें राक्षसांनी तीन चार वेळां या प्रमाणे प्रयत्न केला; पण तित- क्याहि वेळां मी आपल्या बापास त्याला जिवंत करावयास लावलें. शेवटीं दैत्यांनीं एक निराळीच युक्ति योजिली त्यांनी कचास जाळून टाकून त्याची राख केली, व ती राख मद्यांत घालून तें मद्य माझ्या बापास पिण्यास दिलें. कच बराच वेळ दृष्टीस न पडल्यामुळे, मी आपल्या बापास त्याचें वर्तमान विचारिलें, तेव्हां माझा पिता ह्मणाला; " मुली, कच अशा रीतीनें माझ्या पोटांत गेलेला आहे, त्याला जिवंत करावें तर मी मरेन.” तेव्हां मी आपल्या बापाला म्हणालें; 'बाबा, कचास पोटांत जिवंत करून अगोदर संजीवनी मंत्र शिकवा आणि मग त्यास पोटांतून बाहेर येण्यास सांगा. म्हणजे तो बाहेर आल्यावर आपणास जिवंत करील.' माझ्या पित्यास ही गोष्ट मानवली व त्यानें त्या प्रमाणे कचास जिवंत केलें. अशा रीतीनें कचास संजीवनी विद्या २५