पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] अध्याय ५ वा. मग ते सर्व गवळी मोठ्या समारंभानें गोकुळांत परत आले. हळू हळू हें वर्तमान सर्व देशांत पसरलें, व प्रत्यक्ष पर्वत पूजेचा स्वीकार करितो हे ऐकून लोकांनां फार आश्चर्य वाटू लागले. मग सर्व देशोदेशींचे लोक इंद्राचें होमहवन सोडून देऊन त्या गोवर्धन पर्वतालाच भजूं लागले. पुढे हे वर्तमान नारदानें इंद्राला कळविलें. ती गोष्ट ऐकून इंद्राला कृष्णाचा फार राग आला, व माझा हविर्भाग बंद करून त्या पर्वताला दिला याबद्दल कृष्णाची चांगली खोड मोडावयाची, असा इंद्रानें विचार केला, व त्यानें चार मेघ व अष्टदिक्पाळ यानां बोलावून असे सांगितलें किं, तुह्मीं पृथ्वीवर जाऊन गोव- र्धन पर्वताला तेथून हलवून दूर नेऊन टाकावें. तेव्हां ते मेघ वगैरे ह्मणाले; “ सांप्रत तो गोवर्धन पर्वत कृष्णाचे स्वाधीन आहे; तेव्हां त्या पर्वताला हलवा- वयाला आह्मीं असमर्थ आहोत. " मग इंद्र मेघांनां ह्मणाला; " मेघांनों, त्या कृष्णानें माझा फारच मानभंग केला आहे, सर्व गोपाळ व नंद तो कृष्ण सांगेल तसें ऐकत आहेत; आह्मां सारखे देव सोडून त्या सर्व गवळ्यांनी तो मोठा थोरला पाषाणमय गोवर्धन पर्वत त्याची पूजा केली, व आतां त्वा गवळ्याचें ते कृत्य पाहून सर्व देशांतील लोक त्या पर्वताचीच पूजा अर्चा करीत आहेत. हे मेघानों ! तुम्हांवर माझी सत्ता असून त्या कृष्णानें पर्जन्य हा पर्वताच्या प्रसन्नतेमुळें पडतो असें सांगितलें आहे. तर तुह्मीं आतांच्या आतां गोकुळावर जा, व अशी जोरानें वृष्टि करा किं, सर्वत्र जलप्रलय होऊन जाईल. मेघांनां याप्रमाणें इंद्राचा हुकूम झाल्यावर ते गोकुळावर आले व इंद्राच्या आज्ञे- प्रमाणें गोकुळावर मुसळधार वृष्टि करूं लागले; कित्येक मेघ मोठमोठ्या गारांची वृष्टि करूं लागले. याप्रमाणे त्या मेघांनीं अनर्थ सुरू केल्यावर गायी, गोपाळ व गवळी यांची अत्यंत त्रेधा उडाली. जिकडे तिकडे पाणी होऊन गेलें, कित्येकांची घरें धडाधड़ पडूं लागलीं, घरांच्या बाहेर निघावें तर वरून गारांचा मारा होई. अशा स्थितींत लोक अत्यंत दुःखी झाले व आतां जलप्रळय होऊन सर्व वहात जाणार या कल्पनेने सर्व एकत्र मिळून आपआपल्या मुलांबाळांनां घेऊन बसले कित्येक कृष्णाला ह्मणाले:- 'कृष्णा, तूं त्या इंद्राचें होमहवन बंद करविलेंस त्याचा हा सारा परिणाम दिसतो. " तेव्हां कृष्ण म्हणाला; " तसें असेल तर ज्या पर्वतानें आपणा- जवळून पूजा घेतली, तो पर्वत आपलें संरक्षण करील, तर चला आपण त्या पर्वताकडे जाऊं. " असें कृष्णाने सांगितल्यावर सर्व आबाल- वृद्ध कृष्णाच्या मागें त्या पर्वता जवळ आले. तेथे आल्यावर कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलिल व तो करांगुलीवर धरला, आणि त्या खाली सर्व लोकांनां बसविलें. त्या पर्वताचे खालीं बसल्यावर पाऊस व् गारा या पासून कोणालाहि त्रास होईनासा झाला. त्या गवळ्यांना त्या पर्वताखाली १५७ -