पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ [ स्तबक कांहीं दिलें नाहीं. तुमच्या स्त्रियेचें भाग्य थोर, तिची भक्ति मोठी ह्मणून कृष्णानें तिला आपल्याजवळ ठेवून घेतलें आणि आह्मां सर्वांनां जाण्यास निरोप दिला. त्या स्त्रियांचें तें बोलणें ऐकून त्या ऋषीला फार आश्चर्य वाटलें. तो ह्मणाला; “ तुझीं कांहीं तरी खोटें सांगतां, मी तर माझ्या स्त्रियेला झाडाला बांधून ठेविलें आहे. " तेव्हां त्या स्त्रिया ह्मणाल्या; “ आह्मांला खोटें सांगून काय करावयाचें आहे, आह्नीं तेथें प्रत्यक्ष जे पाहिले तेंच आपणास सांगितलें, " हें ऐकून तो ऋषी ज्या झाडाला बायकोस बांधली होती त्या झाडा जवळ जाऊन पाहूं लागला तो बायको प्रेतवत् झालेली दिसली. त्यानें तिला झाडाची सोडली व सर्व ऋषींना बोलावून तिची स्थिति दाखविली. तेव्हां सर्व ऋषींनीं - तुझी बायको मेली–असें सांगितलें. आपल्या स्त्रियेची ती स्थिति पाहून त्याला कृष्णाची निंदा केल्याबद्दल फार पश्चात्ताप होऊं लागला. या सर्व स्त्रियांनी आपल्या स्त्रियेला कृष्णाकडे जातांनां पाहिलें, तेव्हां तिचा लिंगदेह तेथे गेला असून येथें फक्त शरीर आहे, असे त्यानें जाणलें, व तो आपणाबरोबर सर्व ऋषींनां घेऊन कृष्णा- कडे गेला व साष्टांग प्रणिपात करून हाणाला; "हे दयानिधे ! आह्मीं अत्यंत पापी असून शास्त्राच्या अभिमानामुळे अंध झालेले आहोत. तूं निर्विकल्प निरा- कार असून वेळोवेळी आपल्या भक्तांसाठीं साकार स्वरूप धारण करित आहेस. तुला जाणावयाला वेदांचाहि अधिकार नाहीं. मग आह्नीं मूढ तुला कोठून ओळखणार ! हे पुरुषोत्तमा ! हे मेघश्यामा ! आह्नीं अनंत अपराधी असून ते अपराध पोटांत घालणारा तुझ्यावांचून कोणीही कृपावंत नाहीं. हे कृपानिधे ! आमच्या अपराधाची आह्मांला क्षमा कर, व आमचें संरक्षण कर. "त्या ऋषींची ती प्रार्थना ऐकून श्रीकृष्ण म्हणाला, " अहो द्विजोत्तम ! आह्नीं गौळी असून आपणा द्विजांचे आज्ञाधारक दास आहोत. मला भगवान् भगवान् असें झणून निष्कारण माझें नांव लोकांत करूं नका. आपली काय आज्ञा असेल ती मला सांगा, मी आपलें कार्य करण्यास तयार आहे. " तेव्हां तो ऋषि ह्मणाला; " हे प्रभो नारायणा ! माझी स्त्री मृत्यु पावली आहे, ती जिवंत होऊन माझी • मला मिळावी, एवढीच आपणास माझी विनंति आहे. " ती ब्राह्मणाची विनंति ऐकून श्रीकृष्ण ह्मणाले; “ ऋषिमहाराज ! आपण आपले आश्रमांत जा ह्मणजे आपली स्त्री आश्रमांत कामकाज करीत आहे असें आपणास दिसून येईल. त्याप्रमाणें तो ऋषि आश्रमांत येऊन पाहतो, तों आपली स्त्री रोजच्याप्रमाणे कामकाज करीत आहे. ते पाहून त्या ऋषीला फार आनंद झाला. हे जनमे- जय राजा ! त्या ऋषीला श्रीकृष्ण भगवान् प्रसन्न झाले होतें, तेव्हां त्यानें असें मागणे मागावयाला पाहिजे होते किं, ज्यायोगानें जन्ममृत्यूची कटकट चुकून मोक्षाची प्राप्ति होईल. परंतु तितकें ज्ञान नसल्यामुळे किंवा प्राक्तनांत तो योग नसल्यामुळें, बिचाऱ्यानें स्त्री परत मागितली. हे जनमेजया! एकदां "

कथाकल्पतरु.