पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] अध्याय ५ वा. १५३ मोठें आश्चर्य वाटलें. मग त्या सर्व स्त्रियांनी परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाला आसना- वर बसविलें, त्याचें चरण धुतले, त्याच्या अंगाला चंदनाची उटी लाविली, आणि नंतर ताटें मांडून त्यांत कृष्णासाठी मुद्दाम तयार केलेले अन्न वाढून सर्व गोपाळांसह कृष्णाला जेवावयाला बसविलें. सर्वांचीं पोटभर जेवणें झाल्यावर त्या स्त्रियांनी सर्वांनां तांबूल दिलें. तांबूल भक्षण केल्यावर कृष्णाने सर्व स्त्रियांनां आपआपल्या आश्रमांत जाण्याची परवानगी दिली. तेव्हां त्या स्त्रिया म्हणाल्या; हे श्रीकृष्णा आह्मीं मुद्दाम तुझ्या प्राप्तीसाठीं घर सोडून येथें आलों. आतां तूं आझांला आपल्या चरणाजवळून दूर करूं नकोस. तूं शरणांगतांचे संरक्षण करितोस मग ह्नीं शरण आ असतां आमचाच अव्हेर करितोस ? हा BC सोडून १ भवसागर तरून जाण्यासाठी तूंच एक नौकारूप आहेस, तेव्हां तुला घरी जाण्यांत अर्थ तो काय ? तूं हीन जनांचा उद्धार करितोस, हीं भवबंधनें तोडण्यास तूंच एक समर्थ आहेस. कित्येक लोक सहस्र जन्म तप करितात. कित्येक लोक अनंत वर्षे योगसाधन, पंचाग्नि साधन, अनुष्ठान, सगुण उपासना, निर्गुण उपासना, मौन व्रत, अहर्निश ध्यान करितात; कित्येकांनी तुझ्या प्राप्तीसाठीं प्रपंच सोडला, राज्याचा त्याग केला, परमप्रिय अशा स्त्री-पुत्रांचा त्याग केला; तथापि त्यांनां सुद्धां तुझी प्राप्ति होत नाहीं, तो तूं आह्माला आनायासें प्रत्यक्ष भेटल्यावर तुला सोडून जाणें आतां दुरापास्त होय. हे हृषीकेशा ! तूं आतां आह्मांला आपल्या पायाजवळून दूर करूं नकोस.'’ ती त्या स्त्रियांची करुणावाणी ऐकून श्रीकृष्ण ह्मणाले; " स्त्रियांनो ! तुझी ऋषींबरोबर विवाहसंबंधानें बद्ध झालेल्या असल्यामुळे त्यांच्यापासून तुझाला दूर करणें हें इहलोकच्या दृष्टीनें मोठे पाप् होय. एवढ्यासाठी तुम्हीं आपल्या आश्रमांत राहून पतिसेवा करा, व माझें चिंतन करीत जा, माझे भक्त मज- पासून कितीही दूर असले तरी मी अहर्निश यांच्या जवळच असतों. " श्रीकृ हा असे सांगितल्यावर सर्व स्त्रियांनी कृष्णाला साष्टांग नमस्कार केला व त्या अत्यंत कष्टी मनानें कृष्णा जवळून परतल्या. श्रीकृष्णाने आपणास ठेवून न घेतां परत लाविलें, याबद्दल प्रत्येकीला फार वाईट वाटले अश्र गाळित माळित आपल्या आश्रमांत येऊन पोहोंचल्या. तेव्हां ज्या ऋषीनें आपल्या स्त्रियेला झाडाला बांधून ठेविलें होतें तो त्या स्त्रियांकडे आला व त्यांचा उपहास करून ह्मणाला; तुह्मीं सर्वजणी त्या गवळ्याच्या मुलाचा सत्कार करण्यासाठी गेला होता, पण मला वाटतें त्यानें तुझाला त्याचा मोबदला कांहींच दिला नाहीं, आणि ह्मणूनच मला वाटतें तुमचे चेहरे खिन्न दिसत आहेत. अहो ! तो गवळ्याचा मुलगा, मनुष्यासारखा मनुष्य, जवळ त्या देणार ?" हैं ऐकून त्या ऋषींच्या स्त्रिया ह्मणाल्या; तो तुझाला काय अहो ! तो जगदीश्वर सर्व कांहीं देण्यास समर्थ आहे. आमची तितकी भक्ति नाहीं ह्मणून त्यानें आझाला