पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तवक 4 66 27. बोलाविले आहे. त्या भगवंताचें आज आह्मांला दर्शन तरी होईल. " या प्रमाणे त्या ऋषींच्या स्त्रियांना फार आनंद झाला व त्या आपल्या पतीकडे जाऊन त्यांच्याजवळ कृष्णाकडे अन्न नेण्याची परवानगी मागू लागल्या. तेव्हां ते ऋषि रागावून ह्मणाले; “ देवतांची तृप्ति झाल्यावांचून कोणाला अन्न देणें हैं अनुचित होय, आणि हें शास्त्र तुझांला माहीत असतांना हें भलतेंच विचा- रण्यासाठीं तुझीं आलांत, याबद्दल तुमच्या मनाला कांहींच शंका वाटत नाहीं ऋपींनी असे सांगितल्यावर त्या स्त्रिया ह्मणाल्या; "अहो ! तो प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान् देवाधिदेव या पृथ्वीवर अज्ञजनांच्या उद्धारासाठी अवतीर्ण झाला आहे. आणि तुझीं ही स्नानसंध्या आणि ही पाषाणाची पूजा करितां कशाला ? तो परब्रह्म निराकार परमेश्वर साकार स्वरूपानें पतितांनां पावन करण्यासाठी आला' आहे, पण या अविद्येमुळे त्याची ओळख तुझांला होत नाहीं. कृष्णानें जन्म घेतल्याबरोबर वसुदेवाला आपल्या चतुर्भुज मूर्तीचें दर्शन दिलें, तुरुंगाचें दर- वाजे उघडले, यमुना दुभंग झाली; तें काय कृष्णाच्या आंगीं ईश्वरी शक्ति असल्यावांचून झालें ? पांच दिवसांच्या कृष्णानें पूतनेचा नाश केला, अनेक राक्षस लहानपणी मारले, एकदां नंद पूजेला बसला असतां कृष्ण तेथें आला व तेथील सर्व साहित्य त्यानें गिळून टाकलें, व देवांच्या आसनावर आपण बसला, तेव्हां यशोदा रागावली व त्याला मारण्यासाठी आली, पण पाहतें तों आसनावर कृष्णाचीच शंख, चक्र, गदा व पद्म अशीं चार भूषणें धारण केलेली चतुर्भुज मूर्ति आहे. याप्रमाणें त्या कृष्णानें जे चमत्कार केले आहेत, ते वर्णन करितांना सरस्वतीचीही मति कुंठित होईल, मग आमचा पाड काय ? तो साक्षात् जगदीश्वर आपण होऊन आमचे जवळ अन्न मागत आहे; यापेक्षां आमचें थोर भाग्य तें कोणतें ? " याप्रमाणे त्या स्त्रियांनी ऋषींनां सांगितल्यावर ऋषींनी स्त्रियांनां अन्न घेऊन जाण्याची परवानगी दिली. परंतु त्यांच्यांत एक ऋषि फार चमत्कारिक स्वभावाचा होता. कृष्ण हा साधारण मनुष्याप्रमाणेच असून त्याचें या लोकांनी निष्कारण थोतांड माजविले आहे असा त्याचा समज होता. त्याची स्त्री जेव्हां कृष्णाकडे अन्न घेऊन निघाली, तेव्हां तो तिला कठोर शब्दांनी पुष्कळ बोलला व इतर स्त्रियांतून तिला ओढून काढून एका झाडाला बांधलें व आपण आश्रमांत आपले कर्म करण्याकरिता निघून गेला. इकडे बाकीच्या स्त्रिया आपल्या सोबतिर्णाबद्दल खेद करून अन्न घेऊन निघाल्या, व श्रीकृष्णाकडे आल्या. श्रीकृष्णाची व बलरामाची ती प्रसन्न मुद्रा पाहून सर्व स्त्रियांना फार आनंद झाला व त्यांनीं आणिलेली अन्नसामुग्री कृष्णापुढे कृष्णाला नमस्कार केला. त्या स्त्रिया ठेवून तेथे पाहतात तो ज्या स्त्रियेला ऋषीनें झाडाला बांधून ठेविलें होतें ती स्त्री सर्वांपुढे येऊन कृष्णाजवळ उभी आहे. तो प्रकार पाहून त्या सर्व स्त्रियांनां १५२ कथाकल्पतरु.