पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] ● अध्याय ५ वा. J अध्याय ५ वा. १ ऋषिपत्यांची कथा. ● 66 वैशंपायन ऋषि म्हणाले; " हे जनमेजय राजा ! पुढे श्रीकृष्णाने काय काय लीला केल्या तें तुला सांगतों. एके दिवशीं सर्व गोपाळांनी सकाळी उठल्याबरोबर आपआपल्या आईजवळून शिदोरी घेतली व ते खेळण्यासाठी गायींना घेऊन गांवाबाहेर गेले. यमुनेच्या कांठी जाऊन त्यांनी गायी वासरांना स्वैर चरण्यासाठीं सोडून दिलें, व त्यांमी खेळण्यास आरंभ केला. थोडा वेळ खेळल्यावर भूक लागली म्हणून सर्वांनी आपल्या शिदोन्या काढिल्या, त्यांतील भाकरी वगैरे एके ठिकाणीं केल्या व सर्वजण खात बसले. सर्वानां भूक फार लागली होती त्यांनी त्या शिदोऱ्यांतून दुपारासाठीं कांहीं न ठेवितां सर्व अन्न त्याच वेळीं खाऊन टाकिलें; व पुन्हां खेळण्यास आरंभ केला. पुढें तिसरा प्रहर झाल्यावर सर्वानां भूक लागली, तेव्हां ते गोपाळ कृष्णाला ह्मणाले; कृष्णा ! आतां आझाला फार भूक लागली आहे, सकाळी आपण सर्व शिदोन्या खाऊन टाक- • ल्यामुळे आतां खावयाला तर जवळ कांहीं नाहीं, बरें घरीं शिदोरी मागावयाला जावें तर तुझीं असे राक्षसासारखे खाणे खातां तरी किती, असें म्हणून आई शिदोऱ्या ऐवजीं मार मात्र देईल; तेव्हां आतां भूक शमविण्यासाठी काय करावें तें आह्मांला समजत नाहीं, आणि पोटांत भूक तर फार लागली आहे. तेव्हां कृष्ण म्हणाला. "तुझीं आतां ऋषींच्या आश्रमांत जा व त्यांना सांगा कीं, श्रीकृष्ण व बल- राम गोपाळांसह गायी चारण्यासाठी या अरण्यांत आले आहेत, त्यांनां भूक फार लागल्यामुळे ते तुमच्याजवळ खाण्यासाठी अन्न मागत आहेत, ह्मणजे ते तुह्माला अन्न देतील; मग तें अन्न आणल्यावर आपण सर्व भोजन करूं. याप्रमाणे कृष्णाने सांगितल्यावर सर्व गोपाळ ऋषींच्या आश्रमांत गेले व ते ऋषींनां कृष्णाचा निरोप सांगून त्यांच्याजवळ अन्न मागूं लागले. तेव्हां ते ऋषि त्यांना झिडकारून हाणाले; "चला जा ! अद्यापि आमचें देवार्चन चालले आहे, तें पुरे झाल्या नंतर आह्मीं देवांनां नैवेद्य समर्पण करूं, व नंतर तुझांला अन्न मिळेल, त्याच्या अगोदर कांहीं मिळणार नाही. " याप्रमाणें ऋषींनीं सांगितल्यावर सर्व गोपाळं विन्मुख होऊन कृष्णाकडे परत आले व झालेली कच्ची हकीकत त्यांनी कृष्णाला सांगितली. तेव्हां कृष्ण ह्मणाला; आतां ऋषींच्या स्त्रियांकडे जाऊन अन्न मागा हाणजे त्या तुझांला अन्न देतील." त्याप्रमाणें फिरून गोपाळ निघाले, व ऋषींच्या स्त्रियांकडे येऊन अन्न मागू लागले. तो कृष्णाचा निरोप ऐकून त्या स्त्रियांनां फार संतोष झाला. त्या झणाल्या; " आमचें थोर भाग्य, ह्मणून श्रीकृष्णानें आज आह्मांला अन्न घेऊन " तुझीं