पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० [ स्वबक विलक्षण प्रकार पाहून त्या स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या व त्यांना आपल्या अवस्थे- ची अत्यंत लज्जा उत्पन्न होऊन मोठी भीति वाटू लागली. मग लज्जासंरक्षणासाठी उरस्थल पाण्यांत बुडून जाईल इतक्या खोल पाण्यांत जाऊन उभ्या राहिल्या. वस्त्रे कशींव केव्हां नाहींशीं झाली याबद्दल त्यांनां कांहींच अनुमान करितां येईना. आतूर दृष्टीनें त्या चोहींकडे पाहूं लागल्या तेव्हां कदंब वृक्षावर वस्त्रे फडफड उडत असलेली त्यांनां दिसलीं व जवळच एका शाखेवर श्रीकृष्ण भगवान् बसले आहेत असें त्यांनी पाहिलें. मग आपली वस्त्रे कदंबवृक्षावर कोणीं नेऊन ठेविलीं हैं त्यांच्या लक्षांत तेव्हांच आलें. हा नंदाचा खोडकर मुलगा येथें आपणा सर्वांची नजर चुकवून केव्हां व कसा आला, व त्यानें हीं वस्त्रे झाडावर कशी नेऊन ठेविलीं, याबद्दल त्यांनां कृष्णाचें फार कौतुक वाटलें; पण ही अशी भलतीच थट्टा केल्याबद्दल त्यांना कृष्णाचा रागहि आला, आणि तो कदाचित् घरीं जाऊन आमच्या पतींजवळ या आमच्या नग्न जलक्रीडेची हकीकत सांगेल किं काय अशी त्यांना भीतीही वाटू लागली. मग त्या सर्वजणी श्रीकृष्णाला हात जोडून ह्म- णाल्या; ' हे कृष्णा ! आह्मीं परक्यांच्या स्त्रिया असून आह्मांला तूं नग्नावस्थेंस पाहण्यासाठी येथें मुद्दाम आलास, हें आह्नीं तुझ्या घरीं सांगूं. तूं आमची वस्त्रे दे, नाहींतर आह्मीं हैं वर्तमान नंदाला कळवूं व त्याच्याकडून तुला शिक्षा करवूं. आपलें वय, नातें वगैरे गोष्टींचा कांहीं विचार न करितां आमची अशी थट्टा करितोस हें चांगले नव्हे. ' तें बोलणें ऐकून श्रीकृष्ण ह्मणाला; 'तुझीं पाण्याचे बाहेर या ह्मणजे मी तुमचीं वस्त्रे तुझांला देतों. तुझीं निःशंक मनानें कोणाची लाज मर्यादा न ठेवतां येथे येऊन खुशाल नागव्यानें स्नानें करितां याबद्दल तुम्हांला शिक्षा पाहिजेच.' हें कृष्णाचे बोलणें ऐकून त्या स्त्रियांनां काय करावें तें समजेना, शेवटीं निरुपाय जाणून त्या दोन्हीं हातांनीं गुह्यभाग झांकून यमुनेंतून बाहेर आल्या व वस्त्रे मागूं लागल्या. परंतु श्रीकृष्ण म्हणाला; तुम्हीं या अपराधाबद्दल दोन्हीं हात जोडून सूर्याला नमस्कार करा, म्हणजे तुमची वस्त्रे तुम्हांला देतों." पण तसें करावयाला त्यांना फारच लाज वाटू लागली, व त्या नमस्कार करण्याचें टाळू लागल्या. तेव्हां श्रीकृष्ण म्हणाले; " देहभाव सोडून सूर्याला नमस्कार करा, म्हणजे तुम्हीं या अपराधा- पासून खरोखर मुक्त व्हाल. " शेवटीं नाइलाजास्तव त्या स्त्रियांनी दोन्ही हात जोडून सूर्याला नमस्कार केला व अनन्यभावानें क्षमा मागितली. मग श्रीकृष्णानें सर्वोची वस्त्रे व अलंकार त्यांचे त्यानां दिलें व श्रीकृष्ण गोपाळांत खेळ- ण्यासाठी निघून गेला. इकडे त्या स्त्रियाहि कृष्णाच्या त्या चमत्कारिक कृत्याबद्दल कौतुक करीत आपआपल्या घरीं निघून गेल्या. 66 कथाकल्पतरु