पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] अध्याय ४ था. १४९ सुचेना, तेव्हां आतां आपण या अग्नीत सांपडून जळून खाक होणार, असे सर्वांना कळून चुकले व त्या भयंकर कल्पनेमुळे सर्व गवळी भगवंताला शरण गेले. तेव्हां कृष्णाला सर्वांची दया आली व तो त्यांनां ह्मणाला, तुझीं सर्व- जण नेत्र झांका ह्मणजे मी या अग्नीचें निवारण करितों. कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे सर्वोनी डोळे मिटल्यावर श्रीकृष्णानें तो सर्व अनि भक्षण केला; व सर्वांनां त्या संकटांतून मुक्त केलें. नंतर सूर्योदय झाल्यावर सर्व गोपाळ गोकुळांत गेले. ४. प्रलंबासुरवध या गोष्टीस कांही दिवस झाल्यावर श्रीकृष्ण गोपाळांसह भांडीरवडाच्या झाडा- खालीं कुरघोडी या नावाचा खेळ खेळत असतां, तेथें प्रलंब या नावाचा एक राक्षस गोपाळाचा वेष धरून आला. त्या कपट अवस्थेत तो कोणालाहि ओळखूं आला नाहीं. पुढें खेळतांना प्रलंबावर डाव आला, तेव्हां बलराम त्या राक्षसावर बसला, ती संधि साधून तो जेव्हां राक्षस बलरामाला घेऊन दूर जाण्याचा विचार करू लागला, परंतु तें त्याचें कपट बलरामानें ओळखून त्याच्यावर इतका भार घातला की, त्या भारानें तो राक्षस एकदम भूमीवर पडला व मृत झाला. नंतर काही दिवसांनी श्रीकृष्ण आपल्या खेळगड्यांसह रानांत गुरे चारीत असतां संध्याकाळ झाली ह्मणून सर्व गोपाळांनां व गुरांनां गोवर्धन पर्वतावर घेऊन गेला व तेथेच रात्रभर मुक्काम केला. तेव्हां तेथें संवर्त या नावाचा राक्षस आला. त्या राक्षसाला अग्निशक्ति अवगत होती. त्यानें सर्व गोपाळ निद्रावश झाले आहेत असे जाणून त्या पर्वतावरील गवताला आग लावून दिली. तो वणवा जेव्हां चोहींकडे भडकला, तेव्हां सर्व गोपाळ जागे झाले व तो भयंकर प्रकार पाहून रडूं लागले, गायी मोठ्यानें हंबरडा फोडूं लागल्या. मग श्रीकृष्णानें आपलें मुख विशाळ करून उघडलें व तो सर्व अग्नि गिळून टाकिला. नंतर तेथून सर्व गोपाळ, गायी गुरांसह निघाले व आनंदानें गोकुळांत आले. ५ गोपीवस्त्रहरण. गुढे एके दिवशीं गोकुळांतील कांही तरुण मुली गौरीच्या पूजेसाठी यमु नेच्याकांठी आल्या होत्या. त्यांनीं गौरीची यथासांग पूजा केल्यावर, यमुनेचें तें निर्मळ पाणी पाहून त्यांनां जलक्रीडा करण्याची इच्छा झाली. तेव्हां सर्व मुलींनीं इकडे तिकडे कोणीं नाहीं असें पाहून एका कदंब वृक्षाचे खालीं आपली नेसावयाची वस्त्रे व अंगांतील चोळ्या काढून ठेविल्या व त्या जलक्रीडा करूं लागल्या. त्या जलक्रीडा करण्याच्या नादांत गुंग झाल्या असतां श्रीकृष्णभगवान् तेथें आला व तीं सर्व वस्त्रे घेऊन तो त्या कदंब वृक्षावर चढून बसला. इकडे बराच वेळ जलक्रीडा केल्यावर त्या स्त्रियांनां घरी जाण्याची आठवण झाली व घाईघाईनें पाण्यांतून निघून वृक्षाखाली आपली वस्त्रे नेसण्या- साठीं आल्या; पण तेथे पाहतात तो एकही वस्त्र किंवा कंचुकी नाहीं. तो