पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. १४८ [ स्तबक नव्हती. एखादा वृक्ष विजेच्या आघातानें जसा मुळासकट उन्मळून पडतो त्या प्रमाणें कृष्णाविषयीं तें दुःखकारक वर्तमान ऐकून यशोदा भूमीवर पडली आणि त्या दुःखभरांत तिनें आपलें मस्तक बडवून ती आपल्या प्राक्तनाला दोष देऊ लागली. ती म्हणाली; "मी अशी हतभागी म्हणून असें पुत्ररत्न हारवलें. ज्यानीं जन्मांतरी अनेक पातकें केलीं असतील त्याला पुत्रशोक होतो अर्से शास्त्रकारांनी सांगितलें आहे, त्यावरून मला असे वाटतें किं, मी पूर्वजन्मीं अनंत पातकें केली असावीत. जे ब्रह्मद्वेष करितात त्याचा वंश वाढत नाहीं असे म्हणतात. ज्यांनी गायी, सोनें, रत्नें, यांची चोरी केली असेल; ज्यांनी गुरूची निंदा केली असेल, जी स्त्री पतीचा द्वेष करिते, जो पंक्ति प्रपंच करितो; जो विष्णु व शंकर यांत भेद मानितो; त्याला पुत्रशोक होतो असें ह्मणतात. यावरून माझ्या हातून ही सर्व पातकें घडली असावीत असें वाटतें. अशी मी पापीण ५ या जगांत जिवंत राहावयाला मुळींच योग्य नाहीं. मला आतां संसार नको, घर नको, कांहीं नको. ज्या यमुनेंत बुडून माझा कृष्ण नाहींसा झाला, त्याच यमुनेंत मीहि उडी टाकून, कृष्णावांचून शून्य दिसणाऱ्या या जगाचा निरोप घेतें. असें झणून यशोदा आत्महत्या करण्याला प्रवृत्त झाली. गोकुळांतील लोक तिची पुष्कळ समजूत करूं लागले पण ती मुळींच ऐकेना. याप्रमाणे सर्व आबाल- वृद्ध दारुण शोकाग्नीनें करपून गेले होते, परंतु बलराम आपला निश्चित मनाने बसून तो सर्व प्रकार पहात होता. शेवटी जेव्हां यशोदा आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली, तेव्हां वलरामानें आपल्या मानसिक शक्तीने कृष्णाला यमुनेच्या तिरावरील एकंदर प्रकार कळवून त्याला लवकर बाहेर येण्याची सूचना केली. तेव्हां श्रीकृष्ण भगवान् त्या कालिया सर्पावर बसून पाण्यांतून वर आले. श्रीकृ- कृष्णाला पाहिल्याबरोबर सर्वोचीं मुखें आनंदयुक्त झालीं व त्यांच्या नेत्रांतून आनंदाश्रु वाहू लागले. नंद व यशोदा या उभयतांनी धांवत जाऊन कृष्णाला दृढ आलिंगन दिलें, व ईश्वरानें या संकटांतून कृष्णाची सुटका केली ह्मणून तिनें त्याची स्तुति केली. नंतर कृष्णानें त्या कालिया सर्पाला समुद्रांत पाठवून दिलें व पवित्रसलीला यमुनेला विषरहित केलें. ३. श्रीकृष्णाचें दावाग्निभक्षण. श्रीकृष्णाची प्राप्ति झाल्यावर नंद, यशोदा व गोपाळ वगैरे तेथून निघाले व गोकुळांत येऊं लागले. कृष्णासाठी संबंध एक दिवसभर लोक उपाशीं बसल्यामुळे त्यांनां क्षुधा लागली होती. परंतु रात्र बरीच झाली असल्यामुळे सर्वानी वाटेत मुक्काम केला. सर्वजण झोपेत असतां तेथें एकाएकी दावाग्नि पेटला व त्यानें सर्व जंगल व्यापून टाकिलें. त्या विलक्षण उष्णतेनें सर्व लोक खडबडून जागे झाले व त्या दावामींतून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधूं लागले; पण चारही दिशांनां अभि पसरलेला असल्यामुळे त्यांचा निरुपाय झाला. कोणालाच कांहीं युक्ति