पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४७ ४ था. ] अध्याय ४ था. सुंदर अशी कृष्णाची मूर्ति पाहिल्यावर त्यांनां त्याची फार दया आली व त्या त्याच्याजवळ येऊन ह्मणाल्या; "मुला ! तुझी ही सुरूपसंपन्नता पाहून आह्मांला फार दया येते, तर त्वरा करून तूं पाण्यांतून बाहेर निघून जा. जर आमच्या पतीला येथें तूं आल्याचें कळेल तर तो तुझा तेव्हांच नाश करून टाकील." कृष्णानें त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाहीं. त्यानें पाण्यांत चेंडू शोधण्याचें काम तसेंच चालविलें. तेव्हां त्या कालियाचे संरक्षक जे अन्य सर्प होते ते कृष्णावर धांवले व त्यांनी कृष्णाला वेढून टाकिलें, परंतु कृष्णानें त्या सर्व सर्पाना क्षणार्धोत पायाखाली तुडवून टाकिलें व तो तसाच समोर चालला; तेव्हां कालीया कृष्णावर फूत्कार टाकीत धांवून आला. तेव्हां श्रीकृष्ण त्याच्या मस्तकावर चढला, व एखाद्या जलद गमन करणाऱ्या नौकेप्रमाणें त्याला इकडून तिकडे, तिकडून इकडे, फिरवूं लागला. ती त्या कालियाची विटंबना पाहून त्याच्या स्त्रिया कृष्णाजवळ आल्या व त्याला ह्मणाल्या; "हे देवाधिदेवा अनंता ! तुझी शक्ति अतर्क्य आहे, आली तुझ्या धर्माच्या बहिणी आहोंत, तर आमच्यावर कृपा कर व आझांला चुड़ेदान दे. हे प्रभो ! आमचे अपराध पोटांत घाल. हे करुणाकरा ! तूं शरणागताचे संरक्षण करतोस अशी तुझी कीर्ति आहे. आह्मीं तुला शरण आल्या आहोत. आम्हांला एवढी सौभाग्यभिक्षा दे." तेव्हां श्रीकृष्णाला त्या स्त्रियांची दया आली, व तो त्या कालियाला म्हणाला; हे कालिया ! तूं ब्रह्मदेवाचा पणतू असल्यामुळे तुझा वध मला करितां येत नाही; परंतु तूं या पाण्यांत आपले विप कालवून मोठा अपराध केला आहेस, माझे सर्व गोपाळ व गायी हें पाणी पिऊन मरून पडले होते; आणि त्यांच्याप्रमाणेच पुष्कळ लोक मेले असतील, तर तूं हैं विष नाहींसें करून आतांच्या आतां येथून निघून जा. " तेव्हां तो कालिया म्हणाला; “ अनंता ! गरुड मला अत्यंत त्रास देतो, त्याच्या भीतीनें मी येथे येऊन राहिलों होतों; आतां मी येथून दुसरीकडे गेल्यास तो पुन्हां मला त्रास देऊं लागेल.” श्रीकृष्ण म्हणाले; "कालिया ! माझ्या पायाचें चिन्ह तुझ्या मस्तकावर आहे, तें चिन्ह पाहिल्यावर तो तुला मुळींच त्रास देणार नाहीं. " या प्रमाणे इकडे पाण्यांत श्रीकृष्ण व कालिया यांचा संवाद चालला आहे, तो यमु- नेच्या बाहेर श्रीकृष्ण पाण्यांत बुडाला अशी बातमी गोकुळांत पसरली आणि गोकुळांतील सर्व लोक यमुनेच्या कांठी येऊन दुःख करीत बसले होते. धीवर ठिकठिकाणी जाळीं टाकून कृष्णाचा शोध करीत होते. यमुनेचीं दोन्ही तीरें शोधलीं, परंतु श्रीकृष्णाचा शोध लागेना, तेव्हां सर्व आबाल-वृद्ध शोकाकुल होऊन अश्रु गाळूं लागले ! कृष्णाबरोबर खेळणारे गोपाळ तर धाय मोकलून रडूं लागले. नंद व यशोदा यांच्या शोकास तर पारावारच राहिला नाहीं. नंद तर ती दुःखकारकवार्ता कानावर पडल्याबरोबर गतधैर्य होऊन दुःखानें वेडा झाला, आणि यशोदेच्या शोकावस्थेला तर सीमाच उरली