पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] अध्याय ३ रा. वृक्ष होऊन बहुत कालपर्यंत तेथें होते. ही कथा प्रथम स्तबकांत अकराव्या अध्यायांत सांगितली आहे. ) तो प्रकार पाहून लोक श्रीकृष्णाकडे धांवले, व त्याला उचलून यशोदेजवळ नेऊन दिलें, आणि झालेली हकीकत सांगितली. कृष्णाला आपल्या हृदयाशी घट्ट धरून त्याचें चुंबन घेतलं. . १४१ ७ वत्सासुर, बकासुर व आघासुरचा वध. एके दिवशीं कृष्ण व इतर गवळ्यांची मुलें यमुना नदीच्या काठी गाय चारीत असतां तेथें वत्सासूर या नावाचा राक्षस बैलाचें रूप घरून आला. तो कंसाचा गुप्त हेर असून कपटानें कृष्णाचा नाश करावा या उद्देशानें आला होता, परंतु कृष्णानें त्याला तेव्हांच ओळखिलें व त्याचे मागचे पाय धरून त्याला खूप गरगर फिरविलें आणि नंतर एका शिलेवर जोराने आपटून त्याला मारून टाकले. त्या प्रमाणेंच एकदां बकासुर या नावाचा राक्षम चगळ्याचे रूप धारण करून आकाश मार्गाने एकदम आला व कृष्णावर झडप घालून त्यानें त्याला आपल्या प्रचंड चोंचीनें घरून घशांत गिळण्यासाठी घेतलें. तेव्हां कृष्णानें आपल्या अंगांत विलक्षण उष्णता उत्पन्न केली. त्या उष्णतेमुळें बकासुराचें तोंड होरपळले व त्याने घाईघाईनें कृष्णाला जमिनीवर सोडून दिले. मग कृष्णानें त्या बगळ्याची चोंच दोन्ही हाताने घरून त्याला उभाचा उभाच चिरून फेंकून दिलें. बकासुराची ती दशा झालेली पाहून अघासुर या नावाचा एक राक्षस अत्यंत संतप्त झाला व कृष्णाचा नाश करण्यासाठी प्रचंड अजगराचें रूप धरून तेथें आला. इकडे कृष्ण व गवळ्याची मुलें दहीभात खात असतां त्या अजगरानें एकावर एक वेटाळीं घालून आपल्या शरिराचा एक पर्वतच तयार केला, व पर्वतांतील दरीप्रमाणे तोंड पसरून तो तेथें बसला. गोपाळांचा दहीभात खाणें झाल्यावर ते उठले व इकडे तिकडे खेळू लागले, तेव्हां कित्येक मुले सहजगत्या (तो अजगर हा एक डोंगरच आहे असें जाणून) त्याच्यावर चढलीं. कांहीं मुले चढल्यावर बाकीच्या मुलांनांहि चढ- प्याची इच्छा झाली व तींही त्या अजगराच्या शरिरावर चढलीं. तो सर्व प्रकार कृष्णाच्या लक्षांत आला, आणि हा अजगर आपला नाश करण्यासाठी आला आहे असे त्यानें ओळखिलें; परंतु सर्व गोपाळ त्या अजगराच्या शरिरावर चढल्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठीं कृष्णालाहि अजगराच्या शरिरावर चढावें लागले. पुढे ती मुलें अजगराच्या मुखाजवळ गेलीं, व अजगर आपला प्रचंड जबडा पसरून बसल्यामुळे मुलांनां ती एक दरीच आहे असे वाटले व कसलाहि विचार न करितां तीं त्या अजगराच्या मुखांत शिरली, तेव्हां त्यांच्या संरक्षणा- •साठीं कृष्णहि अजगराच्या मुखांत गेला. कृष्ण आपल्या उदरांत आला आहे असें जाणून त्या अजगरानें आपलें तोंड बंद केले व तो त्या सर्वांनां मारण्याचा प्रयत्न करूं लागला. तेव्हां सर्व गोपाळ घाबरले व या सकटाचें निवारण करण्या--