पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० कथाकल्पतरु [ स्तनक ती चार मुले जे सांगतात त्यावर तूं विश्वास ठेवूं नकोस, आणि तीं सहा मुले तर मीं खातों एक तर तुला सांगतात भलतेंच, तूं त्या कोणाचेंहि बोलणे खरे मानूं नकोस. माझ्या तोंडांत काय आहे, हें तुला पहावयाचें असल्यास पहा. " असें म्हणून कृष्णानें आपलें तोंड उघडिलें व तो यशोदेपुढे उभा राहिला. व्यशोदा त्याच्या तोंडांत पाहूं लागली तो तिला श्रीकृष्णाच्या मुखांत चवदा भुवनें दिसूं लागली. संपूर्ण विश्व श्रीकृष्णाचे मुखांत तिला दिसूं लागलें, इतकेंच नव्हे तर गोकुळहि दिसले व त्या गोकुळांत यशोदा कृष्णाला खेळवित आहे असेंद्दि तिनें पाहिलें. तो विलक्षण प्रकार पाहून यशोदा आश्चर्यानें थक्क होऊन गेली; परंतु कृष्णानें तत्काल यशोदेचें मन आपल्या मनोहर बाललीलांनीं दुसरीकडे वळविलें, ६. दामबंधनलीला. एके दिवशी यशोदा ताक करीत असतां कृष्ण बाहेरून आंत आला व खाण्यासाठी लोणी मागूं लागला, परंतु यशोदा कृष्णाला लोणी देईना; इत- क्यांत चुलीवर दूध तापत ठेविलें होतें तें उतूं जावयाला लागले म्हणून यशोदा तिकडे गेली. ती संधी साधून कृष्ण माथणींतून लोणी घेऊं लागला. परंतु माथणी खोल असल्यामुळे त्याचा हात पुरेना, म्हणून कृष्णाने मायणी सांडून दिली व माथणीतील सर्व लोणी खाऊन टाकलें. इकडे यशोदा येऊन पाहते तो कृष्णानें माथणी पालथी केली असून लोण्यानें भरलेली बोटें चाटित बसला आहे. तो कृष्णाचा दांडगेपणा पाहून यशोदा कृष्णावर रागावली व त्याला धरू लागली; परंतु कृष्ण इकडून तिकडे व तिकडून इकडे पळत असल्यामुळें तो यशोदेच्या हाती लागेना. त्याच्या मागें धांवतां धांवतां यशोदा थकून गेली. शेवटी आपली आई आपल्या मागें धांवतां धांवतां थकली असें जाणून कृष्णच उभे राहिले. तेव्हां यशोदेनें कृष्णाला धरलें व त्याला ती गुराच्या दाव्याने बांधू लागली; परंतु तें दावें कृष्णाच्या कंबरेलाच पुरेना, म्हणून यशोदेनें आणखी एकदोन दावीं आणिली आणि त्याला जोडली तरी देखील ते कृष्णाच्या कंबरेला पुरेना. शेवटी यशोदेला अगदी कंटाळा आला व ती त्याला सोडून द्यावयाला लागली. इतक्यांत कृष्णानें आपली कंबर बारीक केली, तेव्हां यशोदेनें गुराच्या दाव्याचा एक पदर कृष्णाच्या कंबरेला बांधिला, व दुसरा आंगणामध्यें उखळी होती त्याला बांधिला. आतां कृष्ण कांहीं दांडगाई करणार नाहीं, असें वाटून यशोदा स्वस्थ चित्तानें घरांत आली व गृहकृत्यें करूं लागली.. इकडे श्रीकृष्णाने ती लांकडाची प्रचंड उखळी आंगणांतून सहज लीलेने ओढीत ओढीत बाहेर नेली व रस्त्यामध्ये दोन प्रचंड वृक्ष जवळ जवळ उभे होते त्या दोन्हीं वृक्षांमधून ती उखळी ओढली. त्या बरोबर ते दोन्ही प्रचंड वृक्ष उन्मळून पृथ्वीवर पडले, व त्यांतून दोन दिव्य पुरुष निघाले. ते मणिग्रीव व नलकुबेर असे दोन गंधर्व नारदाच्या शापानें यमलार्जुन नावाचे.