पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] अध्याय ३ रा. १३९- उतरले. नंतर श्रीकृष्णाला एका गाडीच्या खालच्या भार्गी वस्त्राची झोळी करून त्यांत ठेविलें. इतक्यांत एका असुरानें येऊन कृष्णाचा नाश करण्याच्या हेतूनें त्या गाडींत प्रवेश केला. तेव्हां श्रीकृष्ण तोंडांत पायाचा आंगुठा घालून रहूं लागला. तें त्याचें रुदन कोणीहि न ऐकिल्यामुळे श्रीकृष्णानें सहज लीलेने या गाड्यावर लाथ मारिली, त्याबरोबर त्या गाडयाचा चुरा होऊन त्या शकटासुराचा नाश झाला. अशी कथा श्रीमद्भागवतांत आहे. ४. तृणावर्ताचा नाश. या गोष्टीस कांही दिवस झाल्यावर श्रीकृष्णाचा नाश करण्यासाठी, तृणावर्त या नांवाचा एक राक्षस आला होता. त्यावेळी अंगणामध्यें यशोदा श्रीकृष्णाला आपल्या कडेवर घेऊन खेळवीत होती. श्रीकृष्णानें अंतरदृष्टीनें तृणावर्त राक्षस आपला नाश करण्यासाठी आकाशमार्गाने येत आहे असें जाणून यशोदेच्या कंबरेवर थोडा अधिक भार घातला. तेव्हां यशोदेनें कृष्णाला सहज खालीं अंगणावर मोकळें खेळण्यासाठी सोडिलें. ती संधी साधून त्या तृणावर्त राक्षसानें मोठा धुंधुवात निर्माण केला. त्या वादळामुळे वृक्ष डोलू लागले, लहान लहान वस्तु सैरावैरां उडूं लागल्या आणि भूमीवरील धूळ तर आकाशांत इतकी कांहीं भरली किं, सूर्य दिसेनासा होऊन पृथ्वीवर अंधार पडला. इतकी तयारी केल्यावर त्या तृणावर्त राक्षसानें भूमीवर येऊन कृष्णाला सहज उचलिलें, व त्याला घेऊन तो फिरून आकाशांत गेला. इकडे वादळ शांत झाल्यावर यशोदा अंगणांत पाहते तो कृष्ण नाहीं; तेव्हां तिच्या पोटांत धस्स झालें व ती चोहोंकडे कृष्णाला शोधूं लागली. तिनें ती इकीकत नंदाला सांगितल्यावर नंदहि अत्यंत शोकाकुल झाला व तो सगळ्या गवळ्यांना बरोबर घेऊन ठिकठिकाणी कृष्णाचा शोध करूं लागला. इतक्यांत नंदाच्या अंगणांत तो तृणावर्त राक्षस मरून पडला व त्याबरोबर श्रीकृष्णहि अंगणांत येऊन यशोदेपुढें खेळूं लागला. तो प्रकार पाहून यशोदा आश्चर्य- चकित झाली व तिनें कृष्णाला आपल्या पोटाशी घट्ट धरिलें. कृष्ण सांपडल्या- बद्दल सर्वांना आनंद झाला. यशोदेनें अंबिकेची स्तुति करून कृष्णाचें निरंतर संरक्षण करण्याविषयीं तिची प्रार्थना केली. व ५. श्रीकृष्णाचें मृत्तिकाभक्षण. कृष्णाची अर्भकावस्था संपून तो थोडा मोठा झाल्यावर बरोबरीच्या लहान • मुलांबरोबर तो खेळावयास जाऊं लागला. तो बरोबरीच्या मुलांबरोबर खेळत असतां एके दिवशी त्यानें माती भक्षण केली. माती खाल्ली, असें यशोदेला येऊन सांगितलें रागावली, व तूं माती कां खाल्लीस म्हणून त्याला विचारूं लागली. तेव्हां कृष्ण मणाला; आई ! अटरानण मुले उगीच कांहींतरी खोटें सांगतात, तसेंचं 66 तेव्हां इतर मुलांनीं, कृष्णानें तें ऐकून यशोदा कृष्णावर