पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. J अध्याय ३ रा. अध्याय ३ रा. १३५ १ श्रीकृष्णाच्या बालक्रीडा. श्रीकृष्णानें वसुदेव व देवकी या उभयतांनां - आपणास गोकुळांत यशोदेच्या घरी नेऊन ठेवण्यास सांगितल्यावर, श्रीकृष्णानें आपलें तें स्वरूप टाकून ते नुकत्याच जन्मलेल्या मुलाप्रमाणें लहान झाले. ती हातांतील शंखचक्र वगैरे आयुधे नाहीशी झाली, पीतांबर दिसेनासा झाला, व चार भुजा होत्या त्या ऐवजी दोनच भुजा दिसूं लागल्या. याप्रमाणें कृष्णानें बाळरूप धारण केल्यावर देवकीला प्रेमाचें भरतें आलें व तिनें त्या आपल्या बालकाला पोटाशीं घट्ट धरिलें. - नंतर जवळ असलेल्या फडक्यानें कृष्णाचा देह आच्छादन करून तें मूल तिनें वसुदेवाजवळ दिलें. त्याचें संरक्षण सर्व देवांनीं करावें, त्याला कोणापासून पीडा होऊ नये, म्हणून तिनें त्यावेळी आदिमाता जी अंबिका तिची अत्यंत करुणा भाकिली. या मुलाला येथून घेऊन कसें जातां येईल याचा वसुदेवाला मोटा विचार पडला होता, परंतु बालस्वरूप प्रभूचा स्पर्श त्याच्या हातांस होतांच त्यास एकदम हुशारी आली व तो श्रीकृष्णाला घेऊन तत्काळ उठला व दरवाजाजवळ आला. दरवाजा भक्कम असून त्याला मोठालीं कुलपें घातलीं होतीं. तेव्हां हा दरवाजा उघडून आपण बाहेर कसे पडूं याची वसुदेवाला पुन्हा काळजी वाटू लागली, परंतु त्याचा स्पर्श दरवाजाला झाल्याबरोबर तो मोठा थोरला दरवाजा बिलकूल आवाज न होतां उघडला. दरवाजावर असलेले पाहारेकरी अडवितील अर्से वसुदेवाला वाटले होतें; पण पाहतो तो ते पाहारेकरी स्वस्थ घोरत पडले होते; त्यामुळे वसुदेवाला रस्त्याला लागेपर्यंत कोणीही अडविलें नाहीं. बाहेर डोळ्यांत बोट घातलें तरी दिसणार नाहीं असा घनदाट विलक्षण काळोख पडला होता, आकाश मेघानें आच्छादिलेलें होतें व पाऊस मुसळधार पडत होता. अशा स्थितीत मार्ग काढावयाचा ह्मणजे खरोखरच अत्यंत कठिण असें कार्य होतें, परंतु कंसाची भीति व अपत्यप्रेम या दोहोंमुळें वसुदेव त्या अंधारांतून घाईघाईनें मार्ग क्रमित होता. श्रीकृष्ण भगवान् पावसानें भिजतील ह्मणून शेष त्यांच्यावर आपली फणा पसरून त्यांच्याबरोबर चालला होता; पण हा प्रकार वसुदेवाला मुळींच माहित झाला नाहीं. या प्रमाणें वसुदेव मार्ग क्रमित आहे तों पुढें यमुना नदी लागली. पर्जन्य कालचे दिवस असल्यामुळे त्या विशाल यमुना नदीला फार पाणी आलें होतें व पूराच्या लाटांनी ती गर्जना करीत वहात 'होती. ती नदी उतरून पलीकडे कसे जावें अशी वसुदेवाला पुन्हा काळजी पडली, परंतु इतक्यांत मार्गाचे ठिकाणी यमुना दुभंग झाली व वसुदेव श्री कृष्णाला घेऊन पुढे गेला. त्यावेळी गोकुळांतील नंदाच्या घरचा दरवाजा