पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ [ स्तबक उत्साहानें वसुदेवदेवकीवर पुष्पवृष्टि केली. त्या आनंदभरामुळे देवकीला गर्भावस्थेचें दुःख मुळीं न होतां ते नऊ महिने केव्हांच संपून गेले. योग्य समय प्राप्त झाल्यावर श्रावण वद्य अष्टमी बुधवारी रात्री प्रभूनें जन्म घेतला. त्यावेळी रोहिणी नक्षत्र असून पाऊस सारखा पडत होता. देवकी व वसुदेव या दोघांनां निद्रा लागलेली होती. दोघेहि निद्रिस्त आहेत असें पाहून प्रभूनीं देवकीचे उदरांतून बाहेर प्रवेश केला; व नंतर देवकीला जागे केलें. प्रभूची ती रम्य बाल मूर्ति पाहून देवकीला अत्यानंद झाला व तिनें आपल्या पतीला जागे केलें. वसुदेव जागा होऊन पाहतो तो पुढें प्रभूची सुंदर श्यामल बालमूर्ति उभी आहे. प्रभूला चार भुजा असून शंख, चक्र, गदा व पद्म हीं आयुधें धारण केली आहेत, कंबरेला दिव्य पितांबर परिधान केला आहे, गळ्यांत वैजयंती माळा धारण केली आहे, अशी ती इंद्रनील मण्याप्रमाणे प्रभूची सतेज व सर्वागसुंदर मूर्ति पाहून दोघेहि आनंदानें तन्मय होऊन गेले; परंतु मागील सहा मुलांच्या दुःखाचें स्मरण होऊन ते खिन्न झाले. कारण आतां कंस मागच्या मुलांप्रमाणे या मुलाचीही व्यवस्था करील या विचारानें दोघांनांही फार वाईट वाटलें व पुढे कसे करावें, या काळजीनें दोघेहि व्याकुळ झाले. तेव्हां श्रीकृष्ण त्यांस ह्मणाला; "गोकुळामध्यें नंदाचे घरीं यशोदेच्या उदरीं योगमायेनें आतांच जन्म घेतला आहे. तेव्हां तुझांला माझ्यासंबंधानें काळजी करण्याचें कांहींहि कारण नाहीं. दे वसुदेवा ! तूं मला घेऊन त्या यशोदेच्या घरी नेऊन ठेव व यशोदेच्या त्या मुलीला तूं येथें घेऊन ये. हे वसुदेवा ! तूं पूर्व जन्मीचा सुतपा नावाचा ब्राह्मण असून तुझ्या तपश्चर्येमुळें प्रसन्न होऊन मी तुला असा वर दिला होता किं, मी तुझे उदरीं तीन वेळां जन्म घेईन, त्याप्रमाणें तूं कश्यप असतानां मी तुझे उदरीं वामन अवतार घेतला होता, तसेंच तूं जमदग्नि असतांना मी परशुरामाचा जन्म घेतला होता, आणि आतां तुझ्या उदरीं श्रीकृष्णावतार घेऊन मी तुझ्या ऋणांतून मुक्त झालों आहें. तुला आतां मोक्षाची प्राप्ति होईल. तुझा उभयतांनां माझें लालनपालन करण्याची इच्छा आहे हें मला माहित आहे, ह्मणून मी गोकुळांत क्रीडा खेळून व कंसाचा नाश करून लवकरच तुझांकडे येईन.” असे कृष्णानें वसुदेवाला सांगितल्यावर तेथे स्वर्गातून सर्व देवांसह ब्रह्मदेव आले, त्यांनीं प्रभूची अनन्यभावानें स्तुति केली, व ते स्वस्थानीं निघून गेले. वसुदेवाची रोहिणी ही वडील स्त्री होय. वसुदे- बानें कंसाच्या भीतीनें तिला नंदाकडे कोणाला नकळत पाठविलें होतं. तेथें ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला तोच बलराम हा होय. श्रीकृष्ण हे बलरा- मापेक्षां वयाने सहा महिन्यांनी लहान होते. " कथाकल्पतरु.