पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] अध्याय २ रा. १३३ तुर झाले, तेव्हां हे मरीचीचे बंधु ब्रह्मदेवाला हंसले होते ह्मणून ब्रह्मदेवानीं त्यांना असा शाप दिला किं, तुला मृत्युलोकी जन्म येऊन दारूण दुःख भोगावें लागेल. " याप्रमाणें ब्रह्मदेवानें त्यांना शाप दिल्यावर ते नारदाला शरण गेले, व आमची ही अध:पतनअवस्था चुकवि ह्मणून त्यांनी त्याची विनंति केली. तेव्हां नारदानें त्यांनां अभय दिलें व तुझीं पृथ्वीवर जन्म घेतल्याबरोबर तुमची मुटका करीन, ह्मणून सांगितलें, याप्रमाणे त्या मरीची बंधूंना अभिवचन दिल्यावर नारद कंसाकडे आला व त्याला वर सांगितल्याप्रमाणे सल्ला देऊन त्याच्याकडून सहाहि मुलांचा नाश करविला. अशा रीतीनें सहा मुलांचा नाश झाल्यावर विष्णूनीं शेषाला देवकीच्या उदरीं जन्म घेण्यास सागितले. त्याप्रमाणें शेषानीं देवकीच्या उदरीं जन्म घेतल्यावर विष्णु मायेला ह्मणाले; - "हे माये ! तूं देवकीकडे जाऊन तिच्या उदरांतील गर्भ रोहिणीच्या उदरांत नेऊन घाल, आणि तूं यशोदेच्या उदरीं प्रवेश करून रहा." भगवंतानी मायेला असे सांगित- ल्यावर ती तेथून निघाली व देवकीला ज्या तुरुंगांत ठेविलें होतें त्या तुरुंगांत तिनें प्रवेश करून तिच्या उदरांतील शेषाचा गर्भ सर्वांवर माया घालून कोणाला नकळत काढला व नंदाचे घरों रोहिणी निद्रिस्त असताना तिचे उदरांत नेऊन ठेविला, आणि आपण स्वतः यशोदेचे उदरीं प्रवेश करून राहिली. याप्रमाणे मायेनें व्यवस्था केल्यावर देवकी जागी होऊन पाहते तों उदरांत गर्भ नाहीं. गर्भ उदरांतून कोणी काढला असें ह्मणावें तर तशी कांही चिन्हेंहि दिसत नाहीत; तो प्रकार पाहून देवकी व वसुदेव दोघेहि अत्यंत शोकाकुल झाले; परंतु झालेल्या गोष्टीला कांहीं इलाज नाहीं असे जाणून निमूटपणे त्या तुरुंगांत ते कष्टकारक दिवस कंठित राहिले. इकडे रोहिणी जागी होऊन पाहूं लागली तो तिचें पोट मोठे दिसूं लागले व आपण गरोदर आहों अर्से तिला कळून चुकलें. एकाएकी मी गरोदर कशी झालें हैं माहित नसल्यामुळे ती फार भयभीत झाली व या विलक्षण प्रकाराबद्दल लोक काय ह्मणतील याचीहि तिला फार लाज वाटू लागली, परंतु झालेल्या प्रकारास इलाज नाहीं असें जाणून तीहि स्वस्थ होती. इकडे कंस, देवकी अद्यापि कशी प्रसूत होत नाहीं या चिंतेत होता, तो त्याला देवकीचा सातवा गर्भ नाहींसा झाल्याचे समजलें. देवकीचा सातवा गर्भ नाहींसा होऊन थोडे दिवस गेल्यावर ती पुन्हा गरोदर झाली. यावेळी तिच्या गर्भात प्रत्यक्ष श्रीहरीनें प्रवेश केला होता. यामुळे ती अत्यंत दिव्य व उल्हासित दिसूं लागली. वसुदेवाची स्थितीहि तशीच आनंददायक झाली. विष्णूच्या आगमनामुळे त्या उभयतांच्या चित्त- नृतीत बदल झाला होता. दोघेहि तुरुंगांत होते तरी मागील सर्व दुःख विसरून जाऊन मोठ्या आनंदानें त्या तुरुंगांत दिवस घालवूं लागले. भगवंतानें देवकीच्या उदरी प्रवेश केल्यावर स्वर्गात देवांनां अत्यंत आनंद झाला, व त्यांनी मोठया - •