पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

F १३२ कथाकल्पतरु. केली, परंतु कंसाला स्वतःच्या प्राणाचा मोह अधिक सुटल्यामुळे देवाच्या विनंतीकडे मुळींच लक्ष देईना. तेव्हां वसुदेव ह्मणाला; हिला तूं मारूं नको; कारण ही मग दुसरा जन्म धारण करील व तेथें तुझा नाश करणारा गर्भ उत्पन्न होईल. त्यापेक्षां तूं असे कर किं, हिच्या पोटी जो आठवा गर्भ उत्पन्न होईल त्याचा तूं नाश कर, ह्मणजे झाले. मला होणारें मूल लहान आहे तोच मीं तें तुझ्या स्वाधीन करीन.” वसुदेवानें सांगितलेली ही गोष्ट कंसाला पसंत पडली, परंतु हे आपल्या स्वाधीन आठवा गर्भ करतील असा त्याला त्यांचा विश्वास नसल्यामुळे त्यानें त्या उभयतांसह तो रथ मागे फिरविला व आपल्या प्रधानाची वगैरे सल्ला घेऊन त्या दोघांनां तुरुंगांत ठेवून दिले. " [ स्तबक तो वसु- " कंसा ! + याप्रमाणे त्या दोघांनां तुरुंगांत ठेवून दिल्यावर कंसाच्या मनाला कांहींशी स्वस्थता वाटू लागली; या प्रकारास कांही दिवस झाल्यावर नारद मुनीची स्वारी आली. तेव्हां कंसानें नारदाला आकाशवाणीची हकीकत सांगून तें संकट टळावे झप्पून वसुदेव देवकीला तुरुंगांत ठेवल्याचेंही सांगितलें. ती सर्व हकीकत ऐकून नारदमुनि झणाले; " कंसा ! तूं ही व्यवस्था केली आहेस ती बरी केली आहेस, परंतु आठवा गर्भ कोणता हें ठरविणे मोठें कठिण आहे. कारण उलट मोज-. ल्यास पहिलाहि आठवा येईल; कदाचित् दुसराहि आठवा असेल; सारांश आठवा गर्भ कोणता हें समजावयाला कांहीं मार्ग नाहीं. तर आतां तूं असें कर किं, या वसुदेव देवकीच्या उदरीं जी मुले होतील तीं सर्व मारून टाक; आणि याप्रमाणे आट गर्भाचा संहार केल्यावर या दोघांना सोडून दे, ह्मणजे तूं संकटांतून मुक्त होशील. नाहीं तर कोणत्या गर्भाकडून तुझा नाश होईल हें कांही मला सांगता येत नाहीं. याप्रमाणे सांगून नारद तेथून गेल्यावर वसुदेव देवकीला कांही दिवसांनी एक सुंदर मुलगा झाला, तुरुंगावरील पाहरेकऱ्यांनी तो प्रकार तत्काल कंसाला जाऊन कळविला, त्या बरोबर कंस तुरुंगांत आला व त्यानें देवकीच्या मांडीवरून तो सुंदर बालक हिसकून घेऊन बाहेर दगडावर जोरानें आपटला, त्या बरोबर तें नूल शतखंड होऊन त्याचे पंचप्राण पंचभूतांत मिळाले. त्या दुःखकारक प्रसंगाने वसुदेव व देवको उभयतांही अत्यंत शोकाकुल झाले. पूर्व जन्मीच्या दारुण पातकामुळे हें विलक्षण दुःख आह्मीं भोगीत आहों, असें त्यांना वाटू लागले. त्या दुःखानें त्या दोघांना अत्यंत क्लेश होऊ लागले, परंतु कांहीं उपाय नसल्या- मुळे विचारे निमूटपणें त्या तुरुंगांत आयुष्याचे दिवस कंटित राहिले. त्यानंतर देवकीला दुसरा मुलगा झाला, तोही कंसानें मारिला. याप्रमाणें कंसाने देवकीचे सहा पुत्र मारले. या सहा मुलांच्या वधामुळे कंसानें तप करून जे काहीं थोडेफार पुण्य संचय केले होते, ते सर्व नाहीसे होऊन त्याच्या मस्तकावर पापाचा डोंगर मात्र तयार झाला. कंसानें ज्या सहा मुलांचा नाश केला, ते पूर्वजन्मीं मरीचीचे बंधु होते. ब्रह्मदेव सरस्वतीचा अभिलाष धरून जेव्हां कामा--