पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] अध्याय २ रा. १३१ आहे, तो नंद व यशोदा कोण हेंहि तुला सांगतो. पूर्वी द्रोण या नांवाचा कोणी एक महा तपस्वी ब्राह्मण होता. त्याची प्रणिता या नांवाची एक स्त्री होती, तिला धरा असेंही ह्मणत असत. त्या द्रोणानें व प्रणितीनें पुत्र आसीसाठीं, असेंच अनंत वर्षे माझे तप केले होते. त्यांच्या तपश्चर्येनें मी त्यांना प्रसन्न झालो व तुमचें जें इच्छित असेल तें तुझाला द्यावयाला तयार आहे ह्मणून ह्मणालों. तेव्हां ते उभयतां मला ह्मणाले; " हे शार्ङ्गधरा ! तूं आमचा पुत्र ह्मणून आमचे घरी राहावेंस. " याप्रमाणे त्यांनीं वर मागित- ल्यावर, मीं त्यांना मोठ्या आनंदानें वर दिला. तो द्रोण व ती प्रणिता ( धरा ) हीच नंद होत. त्यांना दिलेले वचन या वेळी मी पूर्ण करणार आहे. " याप्रमाणें विष्णूनीं शेषाला सांगून त्याला पुढे अवतार घेण्याकरितां पाठवून दिले. दा हे जन्मेजय राजा ! आतां तुला वसुदेव हा कोठील कोण, ती सर्व कथा सांगतो. " वसुदेव हा सोमवंशातील शूरसेन राजाचा पुत्र होता. उग्रसेन या नांवाचा राजा होता, त्याला कंस व देवकी अशीं अपत्यें होतीं. देवकी ही वसु- देवाला दिली होती. वसुदेव देवकीचें लग्न पूर्ण झाल्यावर उग्रसेन राजानें उभयतांनां स्थांत बसविलें, व रथ हाकण्यासाठी कंसाला बरोबर देऊन त्यांना त्यांच्या नगरीकडे मार्गस्थ केले. कंस मोठ्या उत्साहानें रथ हाकीत होता, कारण रथांत त्याची बहिण व तिचा पति होता, तेव्हां त्या नूतन विवाहित बहिणीचा रथ हाकणे याचा त्याला उत्साह वाटत होता. याप्रमाणे मोठ्या आनंदानें ही सर्व मंडळी मार्ग क्रमित असतां, एकाएकीं अशी आकाशवाणी झाली किं, " हे कंसा ! या देवकीच्या उदरीं जो आठवा गर्भ येईल त्या पासून तुझा प्राण- नाश होईल, " या प्रमाणे ती विलक्षण आकाशवाणी ऐकून सर्वजण चकित झाले. कंसाला तर त्यावेळी काय करावें तें सुचेना. शेवटी त्यानें असा विचार केला किं, जिच्या पोटीं आठवा गर्भ येऊन त्या गर्भाकडून आपला नाश होणार आहे, ती आपली बहिण देवकी हिलाच मारून टाकावें ह्मणजे हा विषवृक्ष तोडला जाऊन याला पुढे वाईट फळेंहि येणार नाहीत, आणि आपला नाशहि होणार नाहीं. आपल्या मनाशी असा विचार ठरविल्यावर त्याने म्यानांतून तरवार काढली व ती एकदम देवकीच्या मानेवर मारूं लागला. तेव्हां वसुदेव त्याची विनवणी करून ह्मणाला; हे कंसा ! या देवकीचा निष्कारण छळ करून तुला काय फायदा आहे ? शरीर हें पंचभूतांचे असून आत्मा हा अविनाशी आहे. तूं हिला मारशील तर ती अन्य ठिकाणी जन्म मेईल व तेथें हिला संतति होईल. अरे जे प्राक्तनांत लिहिलेले असतें तें कधीहि टळावयाचें नाहीं. तेव्हां निष्कारण तूं आपल्या बहिणीला मारून पाप व अपकीर्ति कां जोडून घेतोस ?" अशी वसुदेवानें कंसाची पुष्कळ विनंति