पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० [ स्तनक इकड़े भगवान् शेषाला झणाले; " हे शेषा ! तुजवर माझा अत्यंत लोभ आहे, तूं क्षणभर नसलास झणजे मला चैन पडत नाहीं, तर इतर अवतारां- प्रमाणे या अवताराचे वेळींहि तूं पृथ्वीवर जाऊन वसुदेव देवकीचे उदरीं जन्म घेऊन नंद व यशोदा यांचे घरी जाऊन रहा. यावेळी तूं माझा वडील बंधु हो, मी तुझा धाकटा बंधु होईन. तूं जन्म घेतल्यावर मीहि लवकरच वसुदेव देवकीच्या उदरीं जन्म घेईन, तथापि तुझ्याच सहवासाला येऊन राहीन. भगवंतानीं शेषाला असें सांगितल्यावर शेष ह्मणाला; " हे प्रभो ! नारायणा ! त्या वसुदेवाचे उदरीं तूं जन्म घेणार आहेस, तेव्हां त्या वसुदेवाची अशी काय योग्यता आहे, किं प्रत्यक्ष भगवंतानें त्याच्या पोटीं जन्म घ्यावा ? महान महान तपोनिधी तुझ्या प्राप्तीसाठी सहस्र वर्षे तपश्चर्या करितात, योगी तुझें हृदय- कमलांत ध्यान करितात, परंतु त्या कोणाला तुझें दर्शनहि होत नाहीं, आणि या यःकश्चित् वसुदेवाचे पोटीं तूं जन्म घेणार हे ऐकून मला फार आश्चर्य वाटतें; तर या वसुदेवाची अशी काय योग्यता आहे तें मला ऐकण्याची इच्छा आहे. " दोषानें अशी शंका घेतल्यावर भगवान लक्ष्मीरमण म्हणाले; " हे शेषा ! स्वयंभू या नांवाचा जो मनु तोच सुतपा या नांवाचा ब्राह्मण होय. या ब्राह्मणाला प्रौणी या नांवाची स्त्री होती. हे दोघेहि स्त्रीपुरुष अत्यंत सच्चरित्र असून त्यांनीं पुत्रासाठीं तपश्चर्या केली होती. त्या सुतपानें धूम्रपान व पंचाग्नि साधन एक हजार वर्षेपर्यंत करून माझी आराधना केली होती, तसेच त्या सुतपाची स्त्री प्रौणी हिनेंहि सहस्रवर्षेपर्यंत मौन व्रत धरून व ब्रह्मचर्यानें राहून माझी सेवा केली होती. ती त्या उभयतांची भक्ति पाहून मी अत्यंत प्रसन्न झालों व त्या उभयतांनां दर्शन देऊन ह्मणालों; " हे स्त्रीपुरुषहो ! मी तुझां उभयतांच्या सेवेनें प्रसन्न झालों आहें, तर तुमची काय इच्छा आहे ते मला कथन करावें. " तेव्हां तो सुतपा ब्राह्मण मला ह्मणाला; “ हे देवाधिदेवा ! तूं आमचे उदरीं तीन जन्म घ्यावेस अशी आमची इच्छा आहे." मी त्यांनां प्रसन्न चित्तानें तथास्तु ह्मणून हाणालों, व त्याचे मनोरथ पूर्ण करीत आलो आहे. ज्या- प्रमाणें त्यांनीं तपश्चर्येनें मला प्रसन्न करून घेतलें, त्याप्रमाणे त्यांनी शंकरांनाहि प्रसन्न करून घेतले आहे. हे शेषा ! कश्यप आणि अदिती हींच ती सुतपा व- प्रौणी होत. " हें ऐकून शेष ह्यणाला; हे भगवंता ! आपण एकंदर दहा अवतार घेणार असें ऐकतों. तर यांपैकी कोणत्या तीन अवतारी आपण कश्यपाचे उदरीं जन्म घेतला तें मला सांगावें. " तेव्हां भगवान ह्मणाले; " शेषा ! मागें कश्यपाचे उदरीं वामन अवतार घेतला होता. तसेच जमदग्नीचे उदरी परशुराम अवतार घेतला होता, तो जमदग्नि कश्यपच होय. आणि आतां तोच कश्यप भूमीवर यमुदेव व आदिती देवकी आहेत. त्यांचे उदरीं मी आतां कृष्ण अवतार घेणार आहे. तसेंच मी ज्या नंदयशोदाचे घरी तुझे सहवासाला येऊन राहणार 66 कथाकल्पतरु.