पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] अध्याय २ रा. १२९ शक्षस हे किती दुष्ट स्वभावाचे असतात हे तुला माहित आहेच. या राक्षसांसा- रखे अभिमानी, मूर्ख, क्रोधी, दुष्ट, कपटी, त्रिभुवनांतहि कोणी नाही. त्यांच्या नीच कृत्यामुळे धर्माचार सर्व प्रकारें बंद पडला असून असत् व्यवहार मात्र वाढत चालले आहेत. मजवरील पाप कोणत्याहि अंशानें कमी न होतां प्रत्यहीं वाढत चालले आहे. ब्रह्मदेवा ! या पापपीडेनें मला फार क्लेश होत आहेत. या संक- टांतून माझी सोडवणूक करणारा तुझ्यावांचून कोणी नसल्यामुळे मी तुला अनन्य मावानें शरण आलेली आहे. तर मजवरचें हें संकट शक्य तितक्या लवकर दूर कर, व पुन्हां पूर्वीप्रमाणे लोक धर्माचरणानें वागतील असें कर." पृथ्वीनें याप्रमाणें ब्रह्मदेवाची प्रार्थना केल्यावर ब्रह्मदेव म्हणाला; हे वसुमती ! तुजवर आलेले हे संकट दूर करण्यास मी असमर्थच आहें. क्षीरसागरांत राहणारे जे शेषशाई भगवान् विष्णु तें या तुझ्या संकटाचें निवारण करतील. तेव्हां मी आतां त्यांच्याकडे सर्व देवांसह त्यांची प्रार्थना करण्यासाठी जातो; तूं आपल्या स्थानों जाऊन स्वस्थ ऐस. आलेलें संकट लवकरच दूर होईल. त्या संबंधानें तूं मुळींदेखील काळजी करूं नको. " ब्रह्मदेवानें याप्रमाणे सांगितल्या- वर पृथ्वी सत्यलोकाहून निघून गेली. २ ब्रह्मदेवकृत विष्णुप्रार्थना, व विष्णूचें देवांस वरदान. पृथ्वी गेल्यावर ब्रह्मदेव सर्व देवांकडे गेला व त्यांनां पृथ्वीवर आलेल्या संकटाची माहिती देऊन त्यांच्यासह क्षीरसागरी श्री विष्णूकडे गेला. त्या वेळीं विष्णु योगनिद्रेत असून द्वाराशीं गरुड उभा होता. योग्याला अत्यानंद देणारी जी उन्मनी मुद्रा त्या उन्मनी मुद्रेनें भगवान् शेषावर निजलेले होते. त्यांच्या चरणाजवळ लक्ष्मी त्यांची पादसेवा करीत बसली होती. तेथे गेल्यावर सर्व देवांच्या पुढे होऊन ब्रह्मदेव विष्णूला म्हणाला; हे परब्रह्म नारा- यणा! गुणनिधाना, हे अजरामरा! निर्गुणा! हे देवाधिदेवा! तूं सर्व विश्वाचा कार्यका- रणकर्ता आहेस. हे अनंता ! पृथ्वीवर पाप अत्यंत वाढल्यामुळे वसुंधरा फार त्रस्त झाली आहे. राक्षसांच्या प्रळयानें धर्माचा एकसारखा क्षय होत असून यज्ञयागादि कर्में बंद पडली आहेत व ब्राह्मण दुष्टांच्या पीडेनें धर्माचरण सोडून बसले आहेत. तर हे प्रभो! अनादि अनंता! आतां अवतार धारण करून दुष्टांचा संहार करावा आणि पृथ्वीवरील पापभार नाहींसा करावा. " ब्रह्मदेवानें याप्रमाणें भगवंताची प्रार्थना केल्यावर भगवान् ह्मणाले; " ब्रह्मदेवा ! मी वृंदेला अभिवचन दिल्या - प्रमाणे लवकरच मथुरेस अवतार घेईन व दैत्यांचा संहार करून पापाचा नाश करीन व पुन्हा धर्माची स्थापना करीन. तर मला साह्यभूत होण्याकरितां तुझी पृथ्वीवर जाऊन मनुष्य जन्म वारण करा. " भगवंतानें ब्रह्मदेवाला याप्रमाणे सांगितल्यावर सर्व देवांसह ब्रह्मदेव तेथून निघाला व त्या सर्वोनी पृथ्वीवर मथुरा, वृंदावन, गोकुळ, वगैरे ठिकाणच्या सच्चरित्र लोकांच्या उदरी जन्म घेतले. A