पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ कथाकस्पतरु. [ स्तबक दर्शक आहेस. ज्याप्रमाणे सूत्रधार सूत्र चालवून बाहुली नाचवितों, त्याप्रमाणें तूं आमचा सूत्रधार आहेस. तेव्हा हे प्रभो वाग्विलासा ! या ग्रंथति नवरस चांगल्या- प्रकारें खुलावेत म्हणून तूंच मंजकडून जे काय वदवावयाचे असेल तें वदव. श्रोते- जनहो ! हा ग्रंथ आपणांस आवडता व्हावा, म्हणून मी यथाशक्ति प्रयत्न करीत आहे, परंतु कोणाहि पंथांत काठिण्य हे असणारच, एवढ्यासाठी ज्ञान, विज्ञान, वैराग्य आणि रूप यांचा नौकारूप जो गुरु त्या गुरुचें साल घ्या; ह्मणजे हा ग्रंथ तुझाला केव्हांच समजेल. मजकडून हा ग्रंथ लिहिला जात आहे, ही केवळ गुरु- होय. असो. पुनः एकदां श्रीचरणी वंदन करून है मंगलाचरण पुरें करितों. 1 पाच अध्याय २ रा. १ श्रीकृष्णजन्मकथा व पापभारानें पृथ्वीचें ब्रह्मदेवाकडे जाणे. . एके दिवशी जनमेजय राजा वैशंपायन ऋषीला ह्मणाला, “अहो मुनिवर्य, गोकुळामध्यें ईश्वरार्ने श्रीकृष्णावतार कां घेतला ? तसेंच या अवतारांत विष्णूनें आपलें पूर्व स्वरूप कायम कां ठेविलें होतें १ आणि आयुधेहि शंख, चक्र, गदा व पद्म हींच कायम होतीं, पीतांबरहि तोच होता, गळ्यांत वैजयंतीची माळहि होती, हृदयावर तें श्रीवत्सलांछनहि होतें; सारांश या अवतारांत विष्णूचें पूर्वरूपच कायम होतें, तर भगवंतानें अशात-हेनें अवतार कां घेतला १ तसेंच भगवंताला गरुडवाहनहि कसें प्राप्त झालें ! वगैरे माहिती आपण आज मला कृपा करून सांगा. " राजानें घैशंपायन ऋषीची याप्रमाणे प्रार्थना केल्यावर वैशंपायन ऋषि ह्मणाले; " राजा जनमेजया ! पूर्वी जेव्हां राक्षसांनी पृथ्वीवरील लोकांना त्रास देऊन जिकडे तिकडे अधर्म प्रवृत्त केला होता, त्या वेळी प्रभूनेंहि श्रीराम अवतार, धारण करून दुष्टांचा संहार करून सर्वत्र धर्माची स्थापना केली, प. नाश के 9 लेल्या राक्षसांना स्वर्गात नेऊन ठेविलें. या गोष्टीस कांही वर्षे लोटल्यावर पृथ्वीवर पुन्हां दुष्ट निर्माण झाले, व त्यांनी लोकांना त्रास देण्यास आरंभ केला. यज्ञया- गादि, कुर्माना प्रतिबंध करावा, ब्राह्मणांना छळावें, लोकांचा द्रव्यापहार करावा, स्त्रियांना भ्रष्ट करावें, याप्रमाणे त्या राक्षसांनी जेव्हां पृथ्वीवर उत्पाद मांडिला, तेव्हां सर्व लोक त्रस्त झाले; व पृथ्वी पापभारानें अत्यंत क्लेश पावूं लागली. पृथ्वीला जेव्हां तो पापभार सहन होईना, तेव्हां ती सत्यलोकी ब्रह्मदेवाकडे गेली; ष बह्मदेवाची प्रार्थना करून ह्मणाली; "हे चतुरानना ! सांप्रत मजवर दुष्ट लोक फार झाले असून त्यांच्या पापभारानें मी फार लांत झाले आहे, मला तो पापभार मुळीच सहन होत नाही, यज्ञयागादि कर्मे बंद पडली आहेत, दुष्टांकडून ह्मणांनी फार त्रास होत असल्यामुळे तेहि स्वस्थ बसले आहेत, हे महादेवा !