पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु

0:-

स्तबक ४ था. अध्याय १ ला. मंगलाचरण. हे देवाधिदेवा गजानना ! बुला मी अनन्यभाषानें साांग नमस्कार करितों, हे वाग्देवी सरस्वती 1 तुलाहि मी अनन्य शरण येऊन वंदन करितों. यानंतर सर्व देव व गुरु यांना वंदन करून मी रसिक व विद्वान् श्रोते संतसज्जनांना वंदन करितों. संत जनहो, तुमची हरिकथेची आवड पाहून मी हा गोड असा ब्रह्मकथारस मुद्दाम तयार करीत आहे. हा माझा प्रयत्न यशस्वी होणें, हे केवळ ईश्वरी कृपेस अव लंबून आहे. हे आदिपुरुषा | हे परमहंसा अनंता ! हे शेषशचना नारायणा ! मी तुला अनन्य शरण आला आहे. मी तुला साष्टांग प्रणाम करितों. हे दयाघना ! तूं या सुझ्या अज्ञानी भक्तांवर कृपा करून याचें अज्ञान दूर कर. माझ्या हृदयांतील ज्ञान- दीप प्रज्वलित कर. हे मंगल महंत गुणरूप अद्वैता | हे जन्मजराविवर्जित अच्युता ! हे विश्वंभरा परम पुरुषा परात्परा ! हे वेदगर्भाक्षर विश्वलिंगा | तुझा जयजयकार असो. हे रूपविलास पुराणभरित अव्यक्ता ! सगुण व निर्गुण अशा दोन्ही स्थितीत असणान्या परमेश्वरा | तूं ब्रह्मरूप योगेश्वर असून आपल्या लीलालाघवाने हैं चराचर जगत् निर्माण करीत आहेस, व याचा लयहि करीत आहेस. हे मोक्षदात्या अनंता । हे मंगलधाम चिंतामणी । हे गदाधरा सारंगपाणी ! तूं आपल्या भक्तजनांना वज्ञ- पंजराप्रमाणें असून, त्यांच्या सर्व विघ्नांचा नाश करण्यास तत्पर असा आहेस. हे अपरंपरा आदिकुमरा श्रीमुकुंदा | हे ज्योतिर्लिंग परमपुरुषा ! हे आनंदमूर्ति श्रीरंगा | तुझा जयजयकार असो । हे देवाधिदेवा अनंता ! तुझी स्तुति कितीहि केली तरी ती थोडीच आहे. ह्या ग्रंथांत जरी मी निरनिराळ्या कथा सांगितल्या आहेत, तरी है तुझेंच सर्व संकलित केलेले चरित्र आहे. ती सर्व तुझीच स्तुति आहे. तेव्हां या मंगलाचरणांतच तुझी विशेष स्तुति करण्यांत कांहीं मोठेपणा आहे, असें नाहीं. हे सच्चिदानंदा । तुझें घरित्र वर्णन करण्यास ज्ञानाचा प्रकाशही पाहिजे. तो असल्यावांचून मी तुझें कीर्तन करण्यास असमर्थ आहे. ज्याप्रमाणें डोळसे मनुष्य अंध मनुष्यास वागवितो, त्याप्रमाणें तूं आह्मां अज्ञानांधकारांत सांपडलेल्यांचा मार्ग-