पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ कथाकस्पतरु. [ स्तबक. तिन्हीं मस्तकें धर्मपाळाचें भजळीत घातली. रुद्रसेनाचे मस्तकानेही धर्मपाळाला तेंच सांगितलें. आतां तो राजा त्या धर्मपाळाचाही वध करणार इसक्यांत हा प्रकार शंकरभट्टास कळला; व तो उदकाने भरलेले एक पात्र घेऊन तेथें आला. ते उदक शिंपडून मंत्रशक्तीने त्यांना जिवंत करण्याचा त्याचा विचार होता; पण राजदूतांनीं त्या शंकरभट्टाच्या हातांतील उदकपात्र उडवून दिलें, त्यामुळे शंकरभ हाचा इलाज खुंटला, परंतु राजदुतांनी जेव्हां पाणी उडविले तेव्हां कांही पाणी धर्मपाळानें आचमन केलें; व मनोमय पार्वतीची प्रार्थना केली. ती त्या धर्मपाळाची प्रार्थना पार्वतीनें तेव्हांच अंतर्दृष्टीनें जाणली, व ती निमिषार्धीत गदा त्रिशूळ लेटक चक्रे वगैरे आयुधें घेऊन आपल्या वीर वेताळ डंखिनीशंखिनी वगैरेसह त्या बोल- राजाचे राजवाड्यांत आली; तिनें धर्मपाळाला सुणविल्याबरोबर तो रागानें आस- नावरून उठला व दाराची अर्गळा काढून राजदूतांचा संहार करूं लागला. धर्मपाळ, पार्वती व पार्वतीचें सैन्य या सर्वांनी जिकडे तिकडें थोडक्याच वेळांत रक्तमांसाचा पसारा करून टाकिला, शर्वत्र हाहाःकार झाला. तेव्हां शंकरभट्टानें राजास सांगितलें की, " राजा ! तूं त्या धर्मपाळाला खऱ्या अंतःकरणानें लवकर शरण जा, नाहीं तर तो धर्मपाळ सर्वांचा संहार करून टाकील. " तेव्हां राजानें धर्मपाळाच्या चर णावर मस्तक ठेवून क्षमा मागितली. " तेव्हां धर्मपाळानें त्याला क्षमा केली; व अभय दिले. त्यावेळीं पार्वती धर्मपाळाला ह्मणाली; “अरे ! या बंधुघातक्याला को अभय दिलेंस, हा महाविश्वासघातकी असून अत्यंत नीच आहे. " धर्मपाळ ह्मणाला; " माते ! अंबिके ! हा शरण आलेला आहे, तेव्हां क्षत्रिय धर्माप्रमाणें याचें संरक्षण करणें हैं कर्तव्य होय. " धर्मपाळाचें ते औदार्य पाहूम पार्वतीला फार आनंद झाला. ती ह्मणाली; “ धर्मपाळा | तूं माझी हंसवाहिनी मूर्ति करून त्या मूर्तीची नित्य पूजा करीत जा, तसेंच तुझ्या वंशांतील माझी हंसवाहिनी मूर्ति करून जे त्या मूर्तीची पूजा अर्चा करतील, त्यांना कोणत्याहि गोष्टीचें उणें न पडतां त्यांना कोणतीहि बाधा होणार नाहीं. " याप्रमाणे धर्मपाळाला सांगून पार्वती स्वस्थानीं निघून गेली. मग धर्मपाळ शंकरभट्टाला ह्मणाला; शंकरभट्टजी ! आ पण आज माझा प्राण वांचविलात; ह्मणून मी आपणांस कुळपुरुष समजेन; व मी व माझे वंशज आपली परम प्रीतीनें पूजा करीत जाऊं. " नतर त्या चोल राजानें आपली मुलगी चंद्रगुप्ता धर्मपाळाला अर्पण करून मोठ्या समारंभानें विवाह केला. या धर्मपाळाला शंभर पुत्र झाले होते, ते सर्व कांसेकार झाले. त्यांनी ती धातूंचीं भांडी करण्याची विद्या देशोदेशीं शिष्य करून पसरविली. त्या सर्व कांसेकारांचे गोत्र दत्तात्रि असें आहे; व हे कांसेकार किंवा कासार एकवीराचे वंशज आहेत. राजा जनमेजया याप्रमाणें पुरुरवा राजाच्या चार पुत्रांचा वंशविस्तार आहे, तो तुला संक्षेपानें कथन केला. " (6 ! तिसरा स्तबक संपूर्ण.