पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय १७ वा. १२५ 66 46 शिपायांवर फेंकिली. ती ताटें चक्राप्रमाणे गरगर फिरूं लागलीं; व त्यांनी त्या सर्व शिपायांना कंठस्नान घालून इहलोकच्या तापत्रयांतून मोकळे केले. तें वर्तमान राजाला कळल्यावर तो चोलराजा आपणाबरोबर सैन्य घेऊन त्या चौघां राजपु त्रांना पकडण्यासाठी आला, तेव्हां ते चौघे राजपुत्र आपल्या ताटांची चक्रे करून राजाबरोबर युद्ध करूं लागले, परंतु राजाबरोबर पुष्कळ सैन्य असल्यामुळे त्या चौघांचा निभाव लागेना; ह्मणून त्यांनी पार्वतीचें स्मरण केलें. पार्वतीचें स्मरण करण्याबरोबर ती आदीमाता तेथें प्रगट झाली; व तिनें मंत्रोच्चार केल्याबरोबर त्या राजपुत्रांची भांडी आपोआप उडालीं; व अत्यंत वेगानें गरगर फिरून सर्वं सैन्याचा नाश करूं लागली. इतकेच नव्हे तर ती मांडीं सर्व नगरांत फिरूं लागली व त्यामुळे असंख्य लोकांना इजा झाली. तेव्हां त्या राजाला शंकरभट्ट जाऊन भेटला व म्हणाला, 'राजा ! हे कारागीर महाशक्तिशाली व मंत्रविद्येमध्यें प्रवीण असे दिसतात, तर त्यांच्याबरोबर युद्ध करून तुला जय मिळणार नाहीं, त्यांच्या हातानें नाश करून घेण्यापेक्षा त्यांनां शरण जा व आपलें संरक्षण करून घे." राजानें शंकरभट्टाचा तो सल्ला मान्य केला; व त्या राजपुत्रांची क्षमा मागून सर्वत्र शांतता केली. नंतर त्या चौघांना राजा आपल्या घरी घेऊन आला; व ह्मणाला, “ हे कुमारहो ! तुमचे नियमधर्म वगैरे काय आहेत, ते मला कृपा करून सांगा. तेव्हां ते राजपुत्र ह्मणाले; "राजा ! आमचा मुख्य धर्म मौनत आहे. विशेषतः दाल्भ्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणें आह्नीं जेव्हां जप करीत बसतों, त्यावेळीं बोलतहि नाहीं, व जप पुरा होईपर्यंत उठतहि नाहीं. " तें त्या राजपुत्राचे भाषण ऐकून राजाचे मनांत वाईट बुद्धि उत्पन्न झाली; व त्यानें त्या चौघांचा नाश करून सर्व भांडीं लुबाडण्याचा विचार ठरविला. मग त्यानें राजपुत्रांनी सांगित- ल्याप्रमाणें त्यांना आसनें देऊन जप करावयास बसविलें. ते राजपुत्र जप कराव- पास बसल्यावर त्या कपटी चोल राजानें तलवार आणून ती इंद्रसेनाचे मानेवर मारिली. त्याबरोबर इंद्रसेनाचें शीर धडापासून तुटलें, व त्याच्याच ओंजळीत पडलें. जरी मस्तक तुटून पडलें तरी इंद्रसेनाचें धड तसेंच पूर्व स्थितीत आसनावर बस- ळें होतें. इंद्रसेनानें आपलें शीर आपल्या ऑजळीत पडल्यावर शेजारी आपला भाऊ जप करीत बसला होता, त्या भद्रसेनाचे ओंजळींत घातलें. भद्रसेनाचें ओंजलींत अशा रीतीनें इंद्रसेनाचें मस्तक आल्यावर तें मस्तक ह्मणालें, " भद्रसेना ! तुजवरहि असाच प्रसंग येईल, परंतु भीतीनें तूं व्रत मोडूं नको. " इतक्यांत राजानें भद्रसेनाचेंही मस्तक कापिलें; व तेही त्याच्या ओंजळीत पडलें. नेव्हां भद्रसेनानें तीं दोन्हीं मस्तकें रुद्रसेनाच्या हातांत दिली भद्रसेनाचे मस्तका- नेही इंद्रसेनाप्रमाणेंच रुद्रसेनाला सांगितलें, मग चोल राजानें रुद्रसेनाचे मानेवर तल- पार चालवून त्याचं मस्तक तोडिलें, तेंही त्याच्याच भोजलींत पडलें, व त्यानें तीं