पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ कथाकल्पतरु. [ स्तबक आमच्या साह्यासाठी नेहमी आमच्याजवळ असावेंस, आणि आम्हाला असा व्यव साय द्यावा कीं, तो अखंड चालावा. पार्वती त्या वेळी त्यांना प्रसन्न चित्ताने म्हणाली, तुमचे मनोरथ पूर्ण होतील. तुम्हीं कांसें, पितळ, यांची पूजा करून त्या धातूचा रस करून त्यांच्या निरनिराळ्या वस्तु तयार कराव्यात. त्या वस्तु बाजा- रांत फार किंमतीला विकल्या जातील, व तुम्हांला विपुल पैसा मिळेल. तुम्हीं आतां आपल्या नगराला जाऊन शाळा घाला; व तेथें धातूंचीं पात्रें तयार करा." पार्वतीने अर्से सांगितल्यावर ते राजपुत्र आपल्या नगरास परत आले; व पार्वतीने सांगितल्या- प्रमाणे शाळा घातल्या. प्रथम लोहशाळा घातली, ती शाळा घातल्यावर त्या राज- पुत्रांनां हत्यारांची अडचण पडली; म्हणून त्यांनी पार्वतीचें स्मरण केले. तेव्हां पार्व- तीनें हजारों सर्प त्या शाळेत पाठवून दिले. कांहीं सर्प अनि फुंकूं लागले, कांहीं सर्प ऐरणीप्रमाणें बसले, काहीं हतोडे झाले, काहीं कातरी, कांहीं सांडस वगैरे अनेक सर्पोनी अनेक हत्यारांची रूपें धारण केली. मग त्या हत्यारांच्या साह्याने त्या राज- पुत्रांनीं तलवारी वगैरे अनेक उत्तम उत्तम वस्तु निर्माण केल्या. नंतर त्यांनी ताबें, पितळ, कांसें वगैरे धातू आणून त्यांची अनेक सुंदर पात्रें तयार केली. याप्रमाणें ते राजपुत्र आपल्या शाळेत अनेकप्रकारची पात्रे तयार करीत असतां, तेथें कांतीपूरचा शंकरभट्ट या नांवाचा एक विद्वान् ब्राह्मण आला. तो ती सुंदर पायें पाहून म्हणाला, अहो कारागिरहो ! तुम्हीं ह्रीं सुंदर पायें जर कांतीपूरच्या राजाला दाखवाल तर तो प्रसन्न होऊन तुम्हांला या पात्रांच्या मारंभार सुवर्ण देईल." तें त्या ब्राह्मणाचें बोलणें ऐकून राजपुत्रांना ती भांडीं विकण्याची इच्छा झाली, व त्यांनीं अनेक उंटावर ती भांडी घालून ती कांतीपुरास आणली. त्या शहरांत आल्यावर चौघांनीं भांड्यांची दुकानें घातलीं; व तेथें भांडी विकीत बसले. , त्या वेळी कांतीपूर येथें चोल या नांवाचा राजा असून, त्या राजाला चंद्रगुप्ता या नावाची एक मुलगी होती. त्या मुलीला आपल्या शहरांत कांहीं कारागीर भांडी विकण्यासाठी आले आहेत, असें समजल्यावर ती बरोबर कांहीं शिपाई वगैरे लोक घेऊन, त्या भांड्यांच्या दुकानावर आली. तेथें तो दिव्य भारसा पाहून त्या राजकन्येला तो आरसा घेण्याची इच्छा झाली; व तिनें त्याची किंमत वगैरे काहीं एक न विचारितां सत्तेच्या घमेंडीवर तो आरसा त्या दुकानांतून उचलला, व निर्धास्तपर्णे तेथून ती आपल्या वाड्याकडे परतली. त्या राजकन्येचा तो दांडगेपणा पाहून इंद्रसेन वगैरे राजपुत्रांना फार राग आला, व इंद्रसेन तत्काल दुकानावरून उठून त्यानें त्या राजकन्येच्या हातांतील आरसा जोराने एकदम काढून घेतला. अशारीतीने राजकन्येचा अपमान झालेला पाहून, तिच्या बरोबरच्या शिपायांनीं क्रुद्ध होऊन इंद्रसेनावर तलवारी उपसल्या, पण इत क्यांत इंद्रसेनाच्या तिघां भावांनीं पार्वतीचे स्मरण करून दुकांतील ताटेंच त्या