पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३.] • अध्याय १७ वा. १२१ ठेविली, व त्यांना सर्व क्षत्रियधर्माची दीक्षा देऊन चांगल्याप्रकारची युद्ध विद्याहि शिकविली. पुढे तेथें पृथ्वीप्रदक्षिणा करीत असतां परशुराम आले, त्यांनीं त्या सुंदर व चपळ मुलांना पाहून कर्धीना हे कोण ! म्हणून प्रश्न केला. ऋषींनी हे आमचे नातू आहेत म्हणून सांगितले. मुलांच्या गळ्यांत यज्ञोपवीत व ते ब्रह्मकर्म- निपुण आहेत, असें पाहून परशुरामानें ऋषींच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, व ते तेथून निघून गेले. ३ कार्तवीर्याचे पुत्र व चंद्रगुप्त. राजा जनमेजया ! पुढें तीं मुले मोठी झाल्यावर त्यांना आपल्या बापाविषयीं साहजिक जिज्ञासा उत्पन्न झाली, व त्यांच्यापैकीं, इंद्रसेनानें एके दिवशी आपल्या आईला विचारिलें कीं, “आई। आमचा पीता कोण, ते आम्हांला साग. तेव्हा त्या चौघांना इंद्रसेनाचे आईनें कार्तवीर्याची सर्व हकीकत सांगितली. ती हकीकत ऐकून चौघांचेहि मनांत परशुरामाचा सूड घेण्याचें आलें, व त्याप्रमाणे ते उद्योगाला लागले. एकदा ते सर्व अरण्यांत शिकार करीत असतो त्यांच्या दृष्टीस दूर एक चकाक- णारा पदार्थ पडला. तेव्हां त्यांनी त्यावरच बाण सोडले, तथापि तो नाहींसा झाला नाहीं. हें पाहून त्या चौघांनाहि फार आश्चर्य वाटलें; व ते चौघेहि त्या वस्तूच्या धोर• णानें तेथें आले. पाहतात तो ती चकाकणारी वस्तु आरसा आहे, असे त्यांना वाटलें, परंतु तो आरसा नसून चकाकणारा दगड होता. त्या अरण्यांत एक दुर्गेचं देऊळ असून तेथें तो आरसा त्या दुर्गादेवीच्या पादतलाशीं होता. शंकरानी जेव्हां त्रिपुर- सुराचा नाश केला, तेव्हां तो राक्षस त्या शिळेमध्ये नाहींसा झाला होता, व त्या राक्षसाचें तेज त्या दगडांत मुरल्यामुळे तो दगड आरशाप्रमाणे दिसत होता. तो आरसा आपण घेऊन शंकरांना नेऊन दिल्यास ते प्रसन्न होतील; व आपण परशु- रामाचे संहारासाठी जें मागूं तें आपणास देतील, असें त्या चौघांहि राजपुत्रांना चाटलें. त्याप्रमार्णे ते तो आरसा घेऊन कैलासी गेले, आणि त्यांनी तो आरसा महा- देवाला अर्पण केला. तो आरसा पाहून महादेवाला फार आनंद झाला, व हे कार्त- वीर्याचे आपणाकडे कोणत्या उद्देशाने आले आहेत हे त्यांनी जाणलें. परशुराम पुत्र म्हणजे प्रत्यक्ष नारायण, केवळ दुष्टाचा नाश करण्यासाठी त्यांनी माझ्या सांगण्या- वरून अवतार घेतला, तेव्हा त्याच्या नाशासाठी या राजपुत्रांनां कांहीं साधन देणे हैं उचित नव्हें, असें जाणून महादेव त्यांस म्हणाले; राजपुत्र हो ! हा आरसा पार्वतीला नेऊन द्या, म्हणजे ती तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करील." शंकरांनी असे सांगितल्यावर राजपुत्र तेथून निघाले, व पार्वतीकडे येऊन तिला त्यांनी तो आरसा अर्पण केला. तो आरसा पाहून पार्वती प्रसन्न झाली व तुम्हाला काय पाहिजे ?- म्हणून तिनें प्रश्न केला. तेव्हां ते राजपुत्र म्हणाले, " हे अंधिके! तूं +