पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ कथाकस्पतरू. [ स्तबक, प्रसूत होऊन मुलगा झाला, पण पाहतात तो त्याला हात मुळींच नाहीत. अशा त्या थोट्या मुलाच्या प्राप्तीमुळे त्याच्या आईबापाला आनंद न होतां बाईंट मात्र वाटलें. कार्तवीर्य मोठा झाल्यावर त्याला स्वत:लाहि आपल्या व्यंगपणाबद्दल फार वाईट बाटूं लागलें. पुढे त्याचा पिता मृत झाल्यावर प्रधान वगैरे त्याला राज्या- भिषेक करूं लागलें, परंतु कार्तवीर्यानें त्या थोटेपणाच्या अवस्थेमुळे राज्यावर बस- ण्याचें नाकारिलें, व तो आयुष्याचा विनियोग ईश्वरसेवेंत करावा, या उद्देशानें राज्य सोडून बाहेरदेशी निघून गेला. २ सहस्रार्जुनाला दत्तात्रेयाचा वर. Br 66 कार्तवीर्य आपली महिकावती नगरी सोडून इकडे तिकडे भ्रमण करीत असतां सह्यादिपर्वताचे एका गुहेमध्यें त्याला दत्तात्रयाचें दर्शन झालें. दत्तात्रेयाची ती तीन मुखी सहा हातांची प्रशांत पवित्र व प्रभावशील मूर्ति पाहिल्यावर कार्तवीर्याचे अंतःकरणांत त्यांचेविषयीं पूज्यभाव उत्पन्न झाला; व यांची सेवा केली असतां आपला उद्धार होईल, असा त्याला भरंवसा उत्पन्न झाला, तेव्हां तो तेथेंच दत्ता- त्रेयाची परवानगी घेऊन त्यांची भक्तिभावानें सेवा शुश्रूषा करूं लागला. तेथें कित्येक दिवस दत्तात्रेयाची सेवा करीत असतां एके दिवशी त्याला दत्तात्रेय झणाले, " कार्तवीर्या | माझी स्नानाची वेळ झाली आहे, तर स्नानासाठी पाणी घेऊन ये. " गुरूची आज्ञा झाल्याबरोबर कार्तवीर्य पाणी आणण्यासाठी गेला, परंतु हात नसल्यामुळे पाणी कसें न्यावें, याचा मोठा विचार पडला. शेवटी त्यानें पाण्याचें भांडें दातांनीं धरून तें दत्तात्रयाकडे आणिलें, कार्तवीर्याची ती विलक्षण गुरुभक्ति पाहून दत्तात्रेय प्रसन्न झाले व ह्मणाले; " अरे कार्तवीर्या ! तुझी ही एकनिष्ठ भक्ति पाहून मी तुला प्रसन्न झालो आहे. तुला सहस्त्र हात प्राप्त होवोत. ' दत्तात्रेय असें ह्मणाल्याबरोबर सहस्रार्जुनाला एकदम सहस्र भुजा प्राप्त झाल्या. त्या सहस्र बाहूंनीं त्यानें दत्तात्रेयाला नमस्कार केल्यावर दत्तात्रेय ह्मणालें, “हे कार्तर्वार्या । तूं ब्राह्मणाशिवाय सर्वोना अजिंक्य होशील. तूं आतां आपल्या नगरास जाऊन खुशाल राज्य कर. " याप्रमाणें श्रीदत्तात्रेयाचा आशीर्वाद मि ळाल्यावर कार्तवीर्यं तेथून निघून महादेवाकडे गेला, व त्यांजपासून वरप्रदान मिळवून महिकावतीस जाऊन राज्य करूं लागला. पुढे या सहस्रार्जुनाचा भार्गव रामानी कसा नाश केला, वगैरे हकिकत तुला माहित आहेच. हा कार्तवीर्य ज्या वेळीं मृत झाला, त्या वेळी त्याच्या चारही स्त्रिया गरोदर होत्या. निःक्षत्रिय पृथ्वी करावयाची असा परशुरामाचा निश्चय असल्यामुळे सहस्रार्जुनाचा प्रधान या चौघी खियांना घेऊन पळाला; व बद्रिकाश्रमी जाऊन बकदालभ्य ऋषीचे आश्रयानें राहिला. तेथें त्या स्त्रिया प्रसूत होऊन चौघींना पुत्र झाले. ऋषीने त्यांची नांवें इंद्रसेन, भद्रसेन, रुद्रसेन व धर्मपाळ अशीं 19