पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३रा ] १ १९ कडून राज्य चालवा. माझ्यावर जसा लोम होता, तसाच याच्यावर व राणी सत्यवतीवर ठेवा. मजकडून जर कांहीं अन्याय किंवा अपराध झाले असतील, तर त्यांची मला क्षमा करा." असें म्हणून राजानें सुरी घेतली व ती आपल्या मानेवर ठेविली; आणि तो ती आपल्या मानेवर फिरविणार इतक्यांत कोणी मागून येऊन त्यांचा हात धरला. राजा मागे वळून पाहतो तों, भगवान् विष्णूची शंख- चक्रगदापद्मधारी चतुर्भुज सुंदर श्याममूर्ति मार्गे उभी आहे. तसेंच पुढे पाहतो तों एका पारड्यांत कपोतपक्ष्याऐवजी इंद्र असून, दुसऱ्या पारड्यांत जें बिंदुमात्र रक्क पडलें होतें, त्यामुळे दोन्हींहि पारडी समतोल झालीं आहेत, तसेंच ससाणापक्षी नाहीसा होऊन, तेथें अमीची दैदीप्यमान मूर्ति उभी आहे. असा प्रकार राजा पहात आहे, तोंच तो चमत्कार पाहण्यासाठीं देवांच्या विमानांनीं सर्व आकाशमंडल मरून गेलेले दिसलें; आणि क्षणांत ते सर्व देव शिबीराजाचे राजवाड्यांत येऊन उतरले; व त्यांनीं भगवान् विष्णूचा व शिबीराजाचा जयजयकार केला. विष्णूचा हस्तस्पर्श झाल्याबरोबर शिबीराजाच्या सर्व जखमा भरून येऊन, त्याचें शरीर पूर्वीपेक्षांहि सुंदर, व दिव्य दिसूं लागलें. तो बिष्णुला साष्टांग नमस्कार करून, म्हणाला, " हे भक्तवत्सला | हे रूपानिधे | हे शार्ङ्गधरा ! हे अपरंपारा हे भक्त- जनवज्ञपंजरा ! हे कुलदैवता नृसिंहा | सहस्र याग केले असतांहि ज्यांना तुझें दर्शन होत नाही, तो तूं मला नव्याण्णव योगाचे अंतीच भेटलास ! हे रूपानिधे ? माझें थोर भाग्य, मजवर तुझी अनंत कृपादृष्टि ह्मणून तूं आज मला व मजबरोबर माझ्या सर्व प्रजाजनांना दर्शन दिलेंस " याप्रमाणे शिबी- राजानें भगवंताची स्तुति केल्यावर विष्णुनें व लक्ष्मीनें त्या राजाला त्याच्या स्त्रीपुत्रासह सुवर्णाचे पाटावर बसवून त्यांचा गौरव केला. लक्ष्मीनें त्याच्यावरून दीप ओवाळिले, मग विष्णु त्याला म्हणाले, “हे शिबीराजा ! माझ्या ठिकाणी तुझें निस्सीम असलेलें प्रेम पाहून मी अत्यंत प्रसन्न झालों आहे. महान् महान् तपस्या॑नाहि जें दुर्लभ तें वैकुंठभुवन तुला तुझ्या या भक्तीमुळे प्राप्त झाले आहे, तर विमानांत बसून वैकुंठास चल. " हे भगवंताचे शब्द ऐकून शिबीराजाला अत्यंत आनंद झाला. तो भगवंताला म्हणाला, “ हे देवाधिदेवा । तूं प्रसन्न होऊन मला वैकुंठास नेत आहेस, पण हे माझे नगरवासी लोक मला आपल्या स्त्रीपुत्रांपेक्षांहि प्रिय आहेत. या प्रजेचें मी आजपर्यंत पुत्रवत् पालन केले असून " 76 मला आपल्या पित्याप्रमाणें पूज्य मानिलें आहे. तेव्हां या सर्व प्रजाजनां- नांहि तूं वैकुंठास घेऊन जावेंस, अशी आपणाला माझी अनन्यभावानें प्रार्थना आहे. " तेव्हां विष्णु म्हणालें, राजा १ या सर्वांना विष्णुलोके दुष्प्राप्य होय. यांत अनंत प्रकृतीचे लोक असतील, त्या सर्वोमा वैकुंठीं नेता येणार नाहीं." तेव्हा. शिबी म्हणाला, " हे श्रीधरा । ज्याप्रमाणें सूर्योदय झाल्यावर चोरांना राहण्यास 24 अध्याय १६ वा.