पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथा कल्पतरु J [ स्तबक. थारा मिळत नाही, त्याप्रमाणें तुझें प्रत्यक्ष दर्शन या सर्वांना झाल्यावर यांचे पाप राहिलें कोटें ? किंवा मेदिनी आपल्या अंकावर आपल्या मुष्टदुष्ट सर्व बाळकांनां खेळविते, त्याप्रमाणें तुझें दर्शन झाल्यावर या माझ्या प्रजेलाहि वैकुंठाचा लाभ झाला पाहिजे. भोंपळा पाण्यावर स्वतः तरतो, यांत कोणी कांहीं मोठेंसें नवल मानीत नाही, परंतु दुसन्यालाहि पाण्यावर तरवितों; ह्मणून त्याची लोकांत प्रसिद्धी आहे. सुवर्णाचा देव केल्यास त्याच्याबरोबर | जशी लाखेलाहि पूजा मिळतें, त्याप्रमाणे माझ्याबरोबर माझे प्रजाजनहि वैकुंठीं यावेत, अशी माझी इच्छा आहे. " शेवटीं भगवंतांनी शिबी राजाची ती विनंति मान्य केली, व दूतांकडून विमानें आणवून सर्व कांतीनगर विमानांत घातलें, व सर्वानां वैकुंठास घेऊन गेले. याप्रमाणे त्या शिबी राजाने आपल्या भक्तिबळानें स्वतःचा उद्धार करून आपणाबरोबर आपले खीपुत्र, आप्तसोयरे, नोकरचाकर, लष्कर, प्रजाजन, गायी, ह्रशी, अभ्व, हत्ती, इतकेच नव्हे तर कुत्र्यामांजरासारख्या क्षुद्र प्राण्यांचा देखील उद्धार केला. अशा शिबी राजाच्या भक्तीचें कौतुक कितीहि केले तरी तें थोर्डेच आहे. " अध्याय १७ वा. १ एकवीराचा वंशविस्तार. वैशंपायन ऋषींनी जनमेजयाला शिबीची कथा सांगितल्यावर ते त्याला पुरु रव्याचा चौथा पुत्र जो एकवीर त्याचा वंशविस्तार सांगू लागले. ते ह्मणाले, “राजा जनमेजया 1 हा एकवीर राजा काशी नांवाच्या नगरी ( महिकावती ) त राज्य करीत असतां एकदां वैकुंठास जाऊन लक्ष्मीला भेटण्याची त्याला इच्छा झाली. लक्ष्मीनें तें आणून एकवीराला वैकुंठांत घेऊन येण्याविषयीं विष्णूची विनंती केली, जन्म दिलेल्या पुत्राला एकवार भेंटण्याची इच्छा झाली, हें आईच्या दृष्टीनें योग्यच असल्यामुळे विष्णूंनी लक्ष्मीची विनंति मान्य केली; व तत्काळ दिमानांत बसून ते काशीस आले. तेथें आल्यावर विष्णु एकवीराला भेटले व तो शस्त्रास्त्रवि किती प्रवीण झाला आहे, हे पाहण्याच्या उद्देशानें त्याला ह्मणाले; “एकवीरा ! महींद्र नांवाच्या दैत्यानें इंद्राच्या आठ मुली पळवून आणिल्या आहेत तर तूं त्या महींद्राचा वध करून त्या आठ मुलींची सोडवणूक कर." एकवीरानें विष्णूची ती आज्ञा तत्काल मान्य केली, व तो आपणाबरोबर सैन्य घेऊन जेथें महींद्र होता तेथें उत्तम सरोवर असून त्या सरोवराचे कांठीं इंद्राच्या आठही मुली त्या विल आपत्तीत असल्यामुळे अश्रू गाळत बसल्या होत्या, आणि तो महींद्र नांवाचा असुर डुकराचे रूप घेऊन सेथें हिंडत होता. इतक्यांत तेथें सैन्यासह एकवीर येत आहे,