पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ कथाकल्पतरू. [ स्तबक घालून या ससाण्याला संतुष्ट करा. मी मृत झालें सर कोही हरकत नाहीं, आपढ़ें शरीर कायम असल्यावर आपणास अनेक स्त्रिया मिळतील; व आपला संसार होईल. " परंतु त्यापुढे सत्यवतीला बोलूं न देतां त्या राजाचा मुलगा धर्मसेन म्हणाला, बाबा ! आपण व आई कुशल रहाल तर आपणास मजप्रमाणे अनेक पुत्र होतील, याकरितां आपण आईचें मांस न देतां या पक्ष्याला माझ्या शरीरांतील मांस द्यावें. " सत्यवती व धर्मसेन या उभयतांचें तें बोलणे ऐकून शिबी राजाच्या अंतःकरणाची स्थिति मोठी चमत्कारिक झाली. नगरवासी लोक अश्रु गाळूं लागले, परंतु तो ससाणा धर्मसेनाचें तें बोलणे ऐकून म्हणाला, राजा स्त्रियांची जातच मुळीं अपवित्र आहे, मी आजपर्यंत कधींहि पक्ष्यांतील मादीदेखील मारून खाली नाहीं, मनुष्ययोनीतील स्त्री तर त्याहीपेक्षां अपवित्र, तिच्या मांसाचा तर मी कधींहि स्वीकार करणार नाहीं. तर्सेच हा तुझा पुत्र धर्मसेन व्रतबंध झालेला नसल्यामुळे शुद्ध आहे, याचे मांसहि मला सेवन करितां येणार नाहीं, आणि राजा ! स्त्री असो व पुत्र असो, ती परकी अशीच आहेत, त्यांना पीडा करून त्यांच्या मासानें माझा संतोष करूं पाहणें, हा खन्या दात्याचा धर्म नव्हे; म्हणून तुला जर आपढ़ें सत्व राखावयाचें असेल, तर स्वतःचेंच मांस दे० अश्ववृषभांना त्रास देऊन तीर्थयात्रा करण्यांत जसें पुण्य नाहीं, चोरी केलेल्या द्रव्यानें अतिथींना भोजन घालण्यांत जशी कीर्ति नाहीं, किंवा दुसऱ्याची हत्या करून वैभव मोग- ण्यांत जसा पुरुषार्थ नाहीं, त्याप्रमाणें स्त्रीपुत्रांचें मांस देणें हेंहि तुला शोभणार नाहीं. राजा । तूं नव्याण्णव याग केले आहेस, त्यांचें सुकृत राखावयाचें असल्यास प्राण दे, पण असत्यवादी होऊं नकोस. वचनभंग केल्यास नव्याण्णव याग फुकट जाऊन शिवाय अपकीर्ति होईल. "" 46 ७ शिबी राजाचा निश्चय. त्या ससाण्याचें तें भाषण ऐकून राजा म्हणाला, "बा ससाण्या ! तुझें भाषण सत्य आहे, मला त्या सत्याची चाड आहे; म्हणूनच मी तुला आपलें मांस देण्यास तयार झालों आहे. माझ्या शरीरांत तर आतां मांस राहिलें नाहीं, जठरांतील मांस घेण्याची तुझी इच्छा नाहीं, तेव्हां मी आतां माझें मस्तक कापून त्याचें मांस मी तुला देतों. त्या मस्तकानें जर कपोत पक्ष्याचें वजन झालें, तर बरेंच आहे, कदाचित् न झाल्यास जें मांस मिळेल त्यांतच संतोष मानून मला तुझ्या ऋणांतून मुक्त कर, आणि या कपोतपक्ष्याला सोडून दे. असें म्हणून राजानें पुत्र व स्त्री यांना जवळ बोलावून त्यांच्या साह्यानें तो मोठ्या कष्टानें उठला, व हातांत तीक्ष्ण सुरी घेऊन ती आपल्या मानेवर फिरवूं लागला सुरी मानेवर ठेवण्याच्या अगोदर तो आपल्या प्रधानाकडे दीन दृष्टिपात करून म्हणाला, प्रधान व लोकहो ! माझ्या पश्चात् या धर्मसेनाला गादीवर बसवून त्याच्या