पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय १६ वा. त्याचा वध करणें हेंहि पाप होय. म्हणून मी आपल्या शरीरातलें कपोतपक्ष्याच्या वजनाइतकें मांस देतों. " राजाचे ते उद्गार ऐकून ससाण्याला मोठा आनंद झाला; परंतु यज्ञमंडपांतील सर्व लोकांना अत्यंत वाईट वाटलें, व त्यांना त्या ससाण्याचा फार राग आला. ते म्हणाले; “ अहो ! या ससाण्यालाच येथून हुसकून या, किंवा तो कपोत त्याला देऊन टाकून तेथून घालवून द्या. यःकश्चित् पक्ष्यासाठी आपल्या प्रणाचा नाश करून घेण्याची एवढी काय आवश्यकता आहे !" तेव्हां राजा सर्व लोकांना शांत करून म्हणाला, “लोकहो ! असें कांहीं कोणी अविचाराचें कृत्य करूं नका. पक्षी असो अथवा कोणीहि असो, त्याची इच्छा वचनाप्रमाणे पुरी करणें हें माझें कर्तव्य होय. " असें म्हणून राजानें धर्म नांवाच्या आपल्या पुत्राला बोलावून प्रासादांतील अंगणांत तराजू बांध विला, नंतर एका ताजव्यांत कपोत पक्षी घातला व दुसऱ्या ताजव्यांत राजा आपल्या शरीरातलें मांस स्वतः हातानें कापून घालूं लागला. प्रथम राजानें आपलें दैवत जें श्रीनरहरि, त्या श्रीनरहरीचें नामस्मरण केलें; व अत्यंत तीक्ष्ण अशी सुरी घेऊन जंघेतील मांस कापून तें तराजूत घातलें. कपोतपक्ष्याच्या वजनापेक्षां दुप्पट भरेल इतकें मांस राजानें प्रथमच जंघेतून काढून तराजूत घातलें; परंतु ज्या पारड्यांत कपोतपक्षी बसला होता तें पारर्डे जमिनीपासून एक केंसभरही वर उचललें नाहीं. मग राजानें दुसऱ्या जंघेतलें मांस काढून तें तराजूत घातलें, तरी ताजवा खालीं मुळींच येईना. नंतर राजानें पोटया, दंड वगैरे अवयवांतून मांस काढून तें तराजूत घातलें; परंतु कपोतपक्ष्याचें वजन मुळींच पुरे होईना. शरीरांत तर कोठें मांस राहिलें नाहीं, असा विचार करून राजानें सुरी घेतली. व तो ती पोटांत घालूं लागला, तेव्हां ससाणा म्हणाला, राजा ! तुझ्या पोटांतलें माँस मी मुळींच घेणार नाही, कारण जठर हे मलमूत्राचे कोठार होय. अशा ठिकाणचें अमंगल मांस मला मुळींच नको. " है ससाण्याचें बोलणे ऐकून शिबी राजाची स्थिति मोठी चमत्कारिक झाली. शरीरांतून ठिकठिकाणचें मांस काढल्या- मुळे सर्व अंगांतून रक्त वहात होतें, शरिरांतून रक्त व मांस गेल्यामुळे शक्ति नाहींशी झाली होती, अशा स्थितीत ससाण्याचे ते उद्गार ऐकून राजाला फार वाईट वाटलें, त्याला मूर्च्छा आली; व तो जमिनीवर निश्चेष्ट होऊन पडला. ती त्या राजाची स्थिति पाहून सर्व कांतीनगरचे लोक शोकाकूल झाले. लोक त्या दुष्ट ससाण्यावर फार क्रुद्ध झाले, परंतु त्या राजाची राणी सत्यवती मुलगा धर्मसेन यांनी त्या पक्ष्यावर राग न करण्याविषयीं लोकांस विनंति केली. काही वेळानें राजा सावध झाल्यावर राणी सत्यवती म्हणाली, ' महाराज ! आपण आपल्या शरीरातलें बहुतेक मांस दिले आहे, आतां शरिराला अधिक त्रास दिल्यास, आपली अवस्था कठीण होऊन मजवर भलताच प्रसंग येईल, तर आपण आता माझ्या शरीरांतलें मांस 68 ११७