पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरू. [ स्तबक ' 24 उघडी, डोळे गरगर फिरवी व पंख फडफड करूं लागला. ती त्या ससाण्याची भुकेवांचून होणारी स्थिति पाहून राजाला फार वाईट वाटलें, व तो आपल्या आसनावरून उठून त्या पक्ष्याला वारा घालूं लागला, त्याच्या चोंचींत पाणी घालू लागला, तेन्डां तो ससाणा राजाला म्हणाला, हे राजा ! वारा घालून काय व्हावयाचें आहे ? भूक लागल्यामुळे माझे पंचप्राण कासावीस होत आहेत. आणखी थोडा वेळ जर मला त्या कपोतपक्ष्याचा मांसाहार न मिळाला, तर म पचस्वाला पावेन; राजा ! तूं इच्छादान देण्याचा संकल्प केला आहेस; पण तूं तर माझें मला देखील परत देत नाहींस. " त्या ससाण्याचें तें बोलणें ऐकून राजाला काय करावें तें समजेना. तो त्या ससाण्याला ह्मणाला; अरे ! मी तुला तुझी इच्छा असेल तितकें मांस खाण्याला देतो; पण ह्या पक्ष्याला मागूं नकोस, त्याचा प्राण घेतल्यावांचून जर तुझी क्षुधा शांत होणार आहे तर मग विनाकारण त्याला मारून तरी काय फायदा ? " तेव्हां तो ससाणा ह्मणाला; “राजा ! मी अमंगळ पशूंचें, शिळे, कोणी तरी कापलेले मांस कधींहि खात नाहीं. तुझी इच्छाच असेल तर मी उत्तम सोज्ज्वल मनुष्याचें या पक्ष्याच्या भारंभार ताजें मांस घेऊन संतोषित हाईन. " ससाण्याची ती चमत्कारिक मागणी ऐकून राजाला मोठा विचार पडला. या यज्ञप्रसंगी मनुष्याचा वध करून त्याचें मांस देणें हें अनुचित होय, आणि कदाचित मनुष्यवध करण्याचें मनांत आणिलें, तरी मनुष्य कोटूंन मि- ळणार 1 तेव्हां प्रधान ह्मणाला; महाराज | आपल्या तरुंगांत पुष्कळ कैदी आहेत, त्यापैकी जो महान् अपराधी असेल, ज्याला देहदंड हीच शिक्षा यावयाची असेल, त्याला कापावें; आणि त्याचें मांस या ससाण्याला देऊन हे संकट निवारण करावे. " र्हे त्या प्रधानाचें भाषण ऐकून ससाणा ह्मणाला; राजा ! हा तुझा प्रधान अत्यंत अज्ञानी आहे, हा तुला भलतीच सल्ला देऊन पापपथ दाखवीत आहे. जो दोषी ठरला असेल, ज्यानें अनंत पातकें केली असतील, त्याचें मांसह अत्यंत अमंगळ व उच्छिष्ट समजतात; असें मांस यागकाळी याचकाला देणें हें अधोगतीस कारण होय. राजा ! या वेळी तूं माझी मागणी अमान्य केल्यास तुझा हा शंभराव्या यागाचा सर्व प्रयत्न फुकट जाईल, तुझें तस्व नाहींसें होईल, आणि याचकाला तूं विन्मुख लाविलेंस ही तुझी अपकीर्ति अक्षय्य राहील. " ससाण्याचे ते शब्द ऐकून राजाला फार वाईट वाटलें, परंतु जो कोणी येईल त्याला मी इच्छादान देईन, हे शब्द परत घ्यावयाचे नाहीत, असा त्यानें संकल्प केला व तो ससाण्याला म्हणाला; व 'हे ससाण्या ! मी कपो. ताला आश्रय दिला आहे, तुझें संरक्षण करतों, म्हणून त्याला मी भाष्यदान दिलें आहे, तेव्हा तो कपोत पक्षी मला तुझे स्वाधीन करितां येत नाही, त्याच्याऐवजीं तुला मी तुझ्या ह्मणण्याप्रमाणे मनुष्याचें मांस देतों. तूं ह्मणतोस त्याप्रमाणें सो- ज्ज्वल, पवित्र मला कोण आहे, ते मला माहित नाहीं; व दुसरा कोणी असल्यास १ 66 66 66