पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१.] अध्याय १६ वा. ११५ नारदा । कत ऐकून, इंद्र मोठ्या काळजीत पडला. तो नारदाला म्हणाला, या संकटायें निवारण कसें करावें, ते मला तर कांहीं समजत नाहीं; पण तूं जर कांहीं युक्ति सांगशील तर मजवर मोठे उपकार होतील. " तेव्हां नारद म्हणाला, " इंद्रा । तूं आतां कपोत पक्षी हो; आणि अमीला ससाणा पक्षी कर, अमीनें तुझे मार्गे लागावें; व तूं प्राणसंरक्षणासाठी म्हणून पळत पळत शिषी- राजाकडे जाऊन आश्रय मागावा. मग अमीनें शिबी राजाकडे येऊन कपोत पक्षी मागावा, किंवा तितक्याच वजनाचें राजाचें मांस मागायें; म्हणजे त्या राजाचें सव सहज नाहींसें होईल, व त्याला शतयागांचे फळ मिळणार नाहीं. याप्रमाणें नारदानें दिलेली सल्ला इंद्राला पसंत पडली; व त्याप्रमाणें तो कपोत झाला, व अमीला स- साणा करून अमरावतीहून निघाला. दोघेही मोठ्या वेगानें आकाशपंथ आक्रमण करून पृथ्वीवर कांतीनगराजवळ आले. इकडे राजा शिबी यज्ञकुंडाजवळ बसून ऋत्विज् सांगतील त्याप्रमाणें यज्ञकुं डांत आहुत्या देत होता. इतक्यांत कपोतपक्षी भरारी मारून त्या यज्ञमंडपांत आला, व राजाचे हातावर जाऊन बसला. त्या मनोहर व गोजिरवाण्या पक्ष्याला पाहून राजाला फार आनंद झाला. तो त्या पक्ष्याला गोंजारीत असतां तो पक्षी म्हणाला, “राजा! माझ्यामागें एक ससाणा पक्षी लागल्यामुळे मी पळत पळत प्राणसंरक्षणासाठी तुजकडे आलों आहे." असें कपोतपक्षी राजाला जो सांगत आहे, तोंच तेथें एक मोठा ससाणापक्षी भरारी मारून आला; व त्या कपोतावर झडप घालूं लागला; तेव्हां सर्व लोक 'हाणा हाणा' म्हणून ओरडूं लागले. मग तो ससाणा पक्षी मंडपांत एका उंच जागी जाऊन बसला व राजाला म्हणाला, “हे राजा ! मी आज तीन दिवस उपाशी आहे, आज मोठ्या कष्टानें मला हा कपोत मिळाला, तों तूं त्याला आश्रय दिलास. ही शिकार माझी आहे, तेव्हां ही तूं मला दिली पाहिजे. तूं या यज्ञप्रसंगी जें कांही कोणी मागेल तें त्याला देतोस, असें मीं ऐकिलें आहे, तेव्हा ही वस्तु तर माझीच आहे, ती मला द्यावयाला कांहींच हरकत नाही. " ससाणा असें ह्मणाल्यावर कपोतपक्षी राजाला ह्मणाला, “राजा | मी तुला शरण आलो आहे, तेव्हा माझें संरक्षण करणें तुझें कर्तव्य आहे. धेनु जशी कोणी वाघाचे स्वाधीन करीत नाहीं, त्याप्रमाणेच तूं मला या ससाण्याच्या स्वा- धीन करूं नको. तूं जर याच्या स्वाधीन मला करशील, तर तुझ्या सत्वाचा नाश होईल, आणि तुझा हा शंभरावा यज्ञही फुकट जाईल. " कपोत अर्से ह्मणाल्यावर ससाणा ह्मणाला; राजा ! याच्या बोलण्यावर तूं विश्वास ठेवू नकोस, मी नेहमीं मांसाहार करणारा प्राणी आहे; आज तीन दिवस मला खावयाला मिळालें नाहीं. आज मोठ्या कष्टानें शिकार मिळाली; पण तूं त्या कपोताला आश्रय दिलास. मी आता उपाशीं तरफडून मरणार दुसरे काय ? " असे म्हणून ससाणा तत्काल खाली पडला, व मुर्छना आल्याप्रमाणे करूं लागला. वारंवार चोंच 66