पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ कथाकल्पतरु. [ स्तबक सहदेव असे कुरुक्षेत्रावर असे दोन बंधु होते. त्यांपैकी पंडूला धर्म, भीम, अर्जुन, नकुल व पांच पुत्र होते. त्यांत अर्जुनाला अभिमन्यु या नांवाचा पुत्र होता; झालेल्या युद्धात हा अभिमन्यु चक्रव्यूहांत सांपडून मृत झाला. या अभिमन्यूला रीक्षिति नांवाचा महावैष्णव पुत्र झाला, आणि हे जनमेजय राजा | त्या परी- क्षिति राजाचा तूं पुत्र होय. हे जनमेजया ! आतो तुला पुरूरवाराजाचा तिसरा पुत्र जो रुरुंभी त्याचा वंशविस्तार सांगतों. या पुरूरवाराजाचा जो तिसरा पुत्र रुरुशी या नांवाचा होता, त्याला जयंत पुत्र झाला होता. जयंताचा देवश्रम, व देवश्रमाचा प्रसिद्ध शिबी या नांवाचा पुत्र होता. तो चक्रवर्ती राजा असून, त्यानें आपल्या भक्तिबळानें आपलें सर्व कांतीनगर् वैकुं- * ठास नेलें होतें. हा राजा सर्व परिवारासह वैकुंठास गेल्यामुळे, त्याचा वंशविस्तार पुढे मुळींच झाला नाहीं. पुरूरवाराजाचा चवथा पुत्र जो एकवीर, त्या एकवीराला कोण कोण पुत्र होते, व त्याचा पुढे वंशविस्तार कसा झाला, हे सांगण्यापूर्वी, राजा | तुला शिबीराजा आपल्या सर्व परिवारासह व कांतीनगरासह वैकुंठास कसा गेला, ही कथा तुला सांगतों. ६ कपोत व ससाणा पक्षी. पुरुरवाराजाने आपल्या चौघां पुत्रांना चार ठिकाणची राज्य दिलीं होतीं; एक- बीराला महिकावतीचें राज्य दिलें होतें. रुरुशीला विष्णुकांतीचें राज्य दिलें होतें, दक्षकर्णाला इंद्रप्रस्थाचें राज्य दिले होतें व यदूला मथुराकांतीचें राज्य दिले होतें. स्वतः पुरूरवा हा पाटणा शहरी राज्य करीत होता; शिबीराजा हा विष्णुकांती येथें राज्य करीत होता. तो राज्य करीत असतां, त्यानें एकदां नव्याण्णव यज्ञ करून शंभरादा यज्ञ करण्याचा संकल्प केला; व तो त्या उद्योगाला लागला. त्यानें पज्ञाला आरंभ केल्यावर असा निश्चय केला होता की, जो कोणी जें कांहीं मागेल तें त्याला नाहीं न म्हणतां संतोषानें द्यावयाचें. त्यानें यज्ञासाठी मोठा मंडप घालून यज्ञाचें कार्य मोठ्या उत्साहानें व थाटाने चालविलें होतें. यज्ञासाठीं वसिष्ठ, बाम- देव, शतानंद, कश्यप, पाराशर, कौंडिण्य, कर्व, गौररूप, बक्कदाल्भ्य, भृगु, सुमंत, मार्कण्डेय वगैरे विद्वान् पवित्र व महातपोनिधि असे ऋषि ऋविज होते. अशा विद्वान् ऋत्विजांकडून त्या शिबीराजाच्या यज्ञाचें कार्य चालले असता, नारद अमरावतीस इंद्राकडे गेला, व त्याला म्हणाला, " अरे सुरपति । पृथ्वीवर शिबी नांवाचा राजा शंभरावा यज्ञ करीत आहे; या यज्ञप्रसंगी जो कोणी काही मागेल, ते त्याला देऊन त्याला संतोषित करावयाचें, असा त्या राजाने संकल्प केला असून, त्याच्या निश्ययाप्रमाणे त्यानें मम्याण्णव यज्ञ पूर्ण केले आहेत. आतां एक राहिला आहे, तो पूर्ण झाला म्हणजे तुझें तेजबळ सर्व नाहींसें होऊन त्याला प्राप्त होईल, व तो ह्या अमरावतीचा इंद होईल." नारदाने सी: सांगितलेली हकी-