पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक , जातच अत्यंत चार करूं लागले. आपल्या प्रिय भक्ताचें तें नामस्मरण ऐकून भगवान् विष्णु एकदम जागे झाले, व लक्ष्मीला रागावून ह्मणाले; दुराचारिणी ! तूं मोठा अनर्थ केलास. ते माझे परमभक्त असून माझ्या दर्शनासाठी येत असतां तूं त्यांचा निष्कारण नाश केलास. मला माझे भक्त किती प्रिय वाटतात हें तुला माहीत नाही. मी आपल्या भक्तांना आपला प्राण किंवा आपले सर्वस्व समजतो. असलीं कित्येक वैकुंठें, कित्येक स्वर्ग, कित्येक सहस्र क्षीरसागर, असें माझें मोठें वैभव आहे, परंतु या सर्वोपेक्षां भक्त मला अधिक थोर वाटतात व मी त्यांचा फार अभिमान बाळगितों. ते मला आपली बुद्धि, मन, शरीर, संपत्ति, सर्व कांही अर्पण करितात व एकनिष्ठपणें माझी सेवा करितात. केवळ माझ्या प्राप्तीसाठी आपला संसार सोडतात, अनेक सुखांनां तिळांजली देतात, आणि अनेक दुःखें सोसून मला प्राप्त करून घेतात. हे अश्विनीकुमार माझे अत्यंत प्रिय भक्त होते. पापिणी ! तूं त्यांचा विनाकारण वध केलास; तुम्हां स्त्रियांची नीच, तुम्हीं स्वतःच्या लाभासाठी अधीर होऊन वाटेल तें निंद्य कृत्य करितां, पतीशीं कपट करितां, आणि पतीच्या सुखाची तुम्हीं मुळींच काळजी घेत नाहीं, कारणापुरतें पतीशीं गोड गोड बोलून आपले कार्य साधून घेतां, आणि तो दृष्टीआड झाला म्हणजे त्याची चाटेल तशी निंदा करितां; त्याच्याशीं अंतःकरणांत वैर धरून वरवर कार्य साधण्यासाठी मोठ्या प्रेमानें वागतां. स्त्रियांना थोरपण द्यावयाचें, त्यांचा सन्मान ठेवावयाचा, त्यांचा गौरव करावयाचा म्हणजे कुत्र्याचे स्वाधीन सिंहासन करण्या- • सारखे होय. श्वानाचा गौरव करणे आणि स्त्रियांचा गौरव करणें सारखेंच होय. श्वानाला तरी अन्नाची कांहीं ओळख असते, पण तितकी देखील तुम्हां स्त्रियांना असत नाहीं. त्या मूर्खपणानें वागून पतीचें मुळीच ऐकत नाहींत. खाण्यापिण्याची मुळींच काळजी घेत नाहीत, आणि त्यांचा कोणी आत आला म्हणजे त्याचा वाटेल तसा पाहुणचार करितात. एकंदरीत स्त्रीजात ही अत्यंत नीच, कपटी व मूर्ख अशी आहे, यांच्यावर विश्वास ठेवून जो राहील, त्याची व त्याच्या संसाराची दुर्दशा होईल. याप्रमाणे श्रीहरि लक्ष्मीला वोलल्यावर लक्ष्मीची अवस्था मोठी कठीण झाली. तिला त्या कटुवचनांनी फार वाईट वाटले व त्यामुळे तिचे अंतःकरण विव्हल होऊन गेले. सूर्याच्या तापानें कम- लिनी जशी कोमेजून जाते, पौर्णिमेची सुखकर रजनी संपल्यावर चंद्रिका जशी निस्तेज होते, त्याप्रमाणे लक्ष्मी विष्णूच्या वाग्बाणांनी अत्यंत क्लांत झाली. तिचें हृदय दुःखानें दाटून आलें, व डोळ्यांतून अश्रु वाहूं लागले. ती अति नम्रपणानें विष्णूला म्हणाली, "अहो ! मी या अश्विनीकुमारांचा वध केवळ तुमच्या सांगण्यावरून केला. हे पंखासह अश्वरूप असल्यामुळे ते तुमचे भक्त आहेत असे मला न वाटतां ते कोणी तरी कपटी असावे असे मला वाटले व मी पतीच्या • १०८ कथाकल्पतरु.