पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय १६ वा. त्या एकशेआठ व्याधी अनेक पातक्यांच्या शरिरांत प्रवेश करून राहूं लागल्या.. जेथे आपणास दुःख दृष्टीस पडतें, जेथें रोगयुक्त लोक दृष्टीस पडतात, तेथ पातक अवश्य आहे, असे समजावें. कारण पातकावांचून व्याधीचा संचार होत नाही. जेव्हां कोणी आपला आचार सोडितो, आपले कर्तव्य विसरतो, आपल्या धर्माला सोडितो, तेव्हां तो व्याधींनीं ग्रस्त होतो. जो पुत्र आईबापांच्या वचनाप्रमाणे वागत नाहीं, जो शिष्य गुरूची आज्ञा मान्य करीत नाहीं, जी स्त्री पतीची सेवा करीत नाहीं, जो परनिंदा करितो, जो दुसऱ्याचें द्रव्य हरण- करितो, जो परस्त्रीगमन करितो, जो स्नानसंध्या करीत नाहीं, जो मृत पित- रांचे तर्पण करीत नाहीं, जो देवतार्चनावांचून भोजन करितो, तो निश्चयानें व्याधिग्रस्त होतो, व अत्यंत दुःखें भोगितो. जेथे जेथें निंद्याचरण घडत असेल तेथें तेथें व्याधींना राहण्यासाठी ब्रह्मदेवानें जागा दिली व त्यांना असे बजा- विलें किं, जेथें धर्माचरण होत असेल तेथें तुझीं क्षणभरही वास करूं नये. या नंतर पुनः समुद्रमंथन केले, तेव्हां समुद्रांतून एकशेंसात औषधी निघाल्या. त्या अत्यंत सतेज व ऋषींच्या स्त्रियांप्रमाणे पवित्र व दैदीप्यमान दिसत होत्या. त्यांनी ब्रह्मदेवाला साष्टांग प्रणाम केला, व राहण्यासाठी स्थान मागितले. तेव्हां त्या अत्यंत कल्याणकारक आहेत असें जाणून ब्रह्मदेवानें त्यांना हिमालय पर्वत. राहण्यासाठी दिला, व मेघ हे तुमच्या संरक्षणासाठी तुम्हांवर वारंवार वर्षाक करितील, असें त्यांना सांगून त्यांची हिमालयावर रवानगी केली. पुढे या सर्व औषधींचे ज्ञान स्वर्गावरील वैद्य अश्विनीकुमार यांनी मिळवून ते अनेकांच्या अनेक ब्याधी दूर करूं लागले. २ अश्विनीकुमारांचें वैकुंठास गमन. एकदां अश्विनीकुमार हे आपलें परम दैवत अशा महाविष्णूच्या दर्शनासाठी स्वर्गाहून निघून बैकुंठी येऊ लागले. या वेळी विष्णु शेषावर स्वस्थपणे निजले होते; लक्ष्मी पायांजवळ बसून विष्णूचें संरक्षण करीत होती; झोंपी जातेवेळी विष्णूनी लक्ष्मीला असे सांगितलें होतें किं, " मी झोपेत असतां कोणी राक्षस अथवा अन्य दुष्ट प्रकृतीचा कोणी मला त्रास देण्यासाठी आल्यास त्याचा तूं या सुदर्शन चक्रानें नाश कर. " असे सांगून विष्णूंनी सुदर्शन चक्र लक्ष्मीच्या स्वाधीन केलें व ते स्वस्थपणें झोंप घेऊं लागले. इकडे लक्ष्मी विष्णूच्या पायांजवळ बसून त्यांचे संरक्षण करीत असतां अश्विनीकुमार हे ज्या अश्वाला पक्ष आहेत अशा अश्वाचें रूप धारण करून आकाशांतून वैकुंठांत येऊं लागले; तें विलक्षण कधीहि न पाहिलेलें रूप पाहून लक्ष्मीला हे कोणी तरी कपटवेषधारी राक्षस असून ते मुद्दाम विष्णूला त्रास देण्यासाठी वैकुंठभुवनांत येत आहेत असे वाटलें, व त्यांचा नाश करण्यासाठी तिनें सुदर्शनचक्र त्यांच्यावर टाकिलें; त्याबरोबर अश्विनीकुमार आसन्नमरण होऊन भूमीवर पडले व श्रीहरी श्रीहरी असा नामो-