पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०९. न समजून मजकडून ही गोष्ट, लक्ष्मीचें तें नम्र भाषण ऐकून अमृत सिंचन करून त्यांना सजीव ३ रा. ] अध्याय १६ वा. तुमच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्यावर चक्र टाकिलें. झाली तर मला या अपराधाबद्दल क्षमा करा." विष्णु शांत झाले व त्यांनी अश्विनीकुमारांवर केलें, व परम प्रीतीनें आलिंगन देऊन, स्वर्गी मार्गस्थ केलें. ३ विष्णु व लक्ष्मीचे शाप. वर सांगितलेल्या प्रसंगाचे वेळीं विष्णूचें मन कलुषित होण्यासारखा दुसरा एक प्रकार असा घडून आला. कीं, उच्चैःश्रवा नांवाचा सुंदर घोडा आपल्या पाठीवर सूर्याला घेऊन आकाश पंथाने वेगानें चालला असतां त्याला विष्णुच्या वाग्बा- णांनीं विव्हल झालेली लक्ष्मी दिसली. लक्ष्मीला त्या स्थितीत पाहून उच्चैःश्रव्याला फार वाईट वाटले व तो तिची अवस्था पहात क्षणभर आकाशांत उभा राहिला. तेव्हां सूर्यानें आपला प्रतोद (चाबुक) जोरानें उच्चैःश्रव्याच्या पाठीवर ओढला. त्या बरोबर त्या घोड्याची पाठ फुटली व त्यांतून रक्त वाहू लागले. त्या आघातामुळे त्या घोड्याला फार पीडा झाली व तो मोठ्यानें किंकाळला. तें किंकाळणें ऐकून लक्ष्मीचें लक्ष त्याच्याकडे गेलें व ती त्या घोड्याची शोचनीय अवस्था पाहून तिला फार वाईट वाटले व तिच्या डोळ्यांतून अश्रु वाहू लागले. तो प्रकार पाहून विष्णूनां लक्ष्मीचा अधिक तिटकारा आला व ते तिला म्हणाले; " जेव्हां तूं माझ्या भक्तांचा वध केलास तेव्हां तुझ्या डोळ्यांतून एक अश्रु देखील पडला नाहीं, आणि आतां परपुरुषाचे दुःख पाहून तुला इतकी हळहळ वाटते, यावरून तुझें अंतःकरण मला फार कलुपित दिसतें. तुझें माझ्या ठिकाणीं प्रेम नसून तें परपुरुषाचे ठिकाणी आहे असे वाटतें. तूं चंचल आहेस हैं मला पूर्वीपासून माहित आहे. तुला लहान थोराची ओळख नाहीं. राव, रंक, बंधु, दीर, यांची ओळख नाहीं. उच्चनीचपणाकडे तुझी दृष्टि नाहीं. तुला जातीचा विचार नाहीं, तुला धर्म नाहीं, अधर्म नाहीं, तुला कसलाहि विचार नाहीं. जो तुला वश करितो त्याचें तूं आंगणहि सोडित नाहीस. एकाला फसवून एकाला संतोषित करणें हा तुझा प्रकृति धर्म आहे. तूं महा कपटी असून मला तृणासमान मानतेस; तूं उच्चैःश्रव्याला मनानें चिंतिलेस हा तुजकडून मोठा अधर्म झाला आहे, मी तुला असा शाप देतों किं, तूं घोडी होऊन भूमीवर फिरशील आणि त्या अवस्थेत बारा वर्षे घातल्यावर तूं शाप मुक्त होशील." विष्णूची ही शापवाणी ऐकून लक्ष्मीला अत्यंत वाईट वाटले. आणि अत्यंत दुःखभराने ती भगवंतास ह्मणाली; वैकुंठनिवासी माधवा ! आपली वृति अत्यंत सात्विक आहे, आपण अत्यंत दयावंत अहांत, आपण सर्व कांहीं जाणतां अशी माझी समजूत होती, परंतु आज माझा तो भ्रम दूर झाला. भृगुऋषीनें तुझांला लाथ मारली होती, तें दुःख तुझीं विसरून जाऊन उलट त्या लत्ताप्रहराचा व्रण तुझांला शोभादायकच वाटूं लागला. विरोचनाच्या घरीं तुझीं स्वतः स्त्री झालां होतां, व त्या अवस्थेत तुझाला 66 ,