पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक इत्ती, व अठ्यायशीं हजार निरनिराळे सुवर्णाचे अलंकार सारखे वाटून दिले. या शिवाय रत्नें, बैल, रथ, गाड्या, गायी, म्हशी, जमीनी, घरें, वस्त्रे ही किती दिलीं याची तर गणतीच नाहीं. राजा जनमेजया ! याप्रमाणें त्या दक्षराजानें तो याग यथासांग पूर्ण केला. पुढें कांहीं दिवसांनीं त्या दक्षाला एक लक्ष पुत्र झाले. त्या- दक्षप्रजापतीला एक लक्ष पुत्रांची प्राप्ति झाली, परंतु त्याचा उपयोग त्या राजाला कांहीहि झाला नाहीं. हे एक लक्ष पुत्र मोठे झाल्यावर सर्व त्रिभुवन जिंकतील व इंद्राला पदच्युत करितील अशी देवांनां भीति पडली, ह्मणून त्यांनी नारदाला दक्षप्रजापतीकडे पाठवून एक निराळीच युक्ति योजिली. नारद दक्षराजाकडे गेला व त्याला ह्मणाला, मी तुझ्या सर्व मुलांनां विद्येत निपुण करितों, तूं आपली मुळे माझ्या आश्रमांत पाठवून दे. नारदाचें तें ह्मणणें प्रजापतीला रुचले व त्यानें आपल्या सर्व मुलांनां नारदाचे स्वाधीन करून त्याचे आश्रमांत पाठवून दिले. तेथें नारदानें त्यांनां ब्रह्मश्रति निरूपण केली. ती ऐकून त्या सर्व मुलांचे मनावर निराळा परिणाम झाला व ते विरक्त होऊन मोक्षमार्गाला गेले. या प्रमाणें नारदानें त्या दक्षाच्या एक लक्ष पुत्रांनां संसारापासून निराळे केल्यामुळे दक्षाला फार राग आला व त्यानें नारदाला शाप दिला, किं, "तुझें आसन तीन घटिकांपेक्षा अधिक असे एके ठिकाणी राहणार नाहीं." नारदाला असा शाप मिळाल्यापासून तो एकसारखा त्रिभुवनांत हिंडत असतो. असो, हे जनमेजय राजा ! ही दक्षप्रजापतीची कथा पुष्कळच मोठी आहे, ती मी तुला संक्षेपार्ने सांगितली. असे सांगून वैशंपायन ऋषीनी कथा पूर्ण केली.” कथाकल्पतरु. अध्याय १६ वा. १ कांतीनगराचें वैकुंठास गमन. 66 जनमेजय राजा, वैशंपायन ऋषीला ह्मणाला; "हे ऋषेश्वरा! दक्षप्रजापतीची ज्या प्रमाणें प्रसूतीशीं सहस्र वर्षे ताटातूट झाली होती, त्याप्रमाणे प्रत्यक्ष भगवंताची व लक्ष्मीचीहि बारा वर्षे ताटातूट झाली होती असें मी ऐकितों, तर ती संपूर्ण कथा आपण मला कृपाकरून सांगावी." वैशंपायन ऋषि जनमेजयाची विनंति ऐकून राजाला ती कथा सांगू लागले. ते झणाले; " राजा ! देवांनीं व राक्षसांनीं समु- द्राचे मंथन करून चौदा रत्ने काढिल्यावर नंतर मंथन केले, तेव्हां एकशेआठ व्याधी निघाल्या. समुद्रांतून निघाल्यावर त्या व्याधीनी ब्रह्मदेवाला नमस्कार केला व आह्मांस राहण्यासाठी जागा मिळावी ह्मणून ब्रह्मदेवाची विनंति केली. तेव्हां ब्रह्मदेव म्हणाला; " जो दोषी असेल, जो पातकी असेल, त्याच्या शरिरांत तुझी आश्रय करावा. " या प्रमाणे ब्रह्मदेवानें त्या व्याधींना जागा दाखविल्यावर