पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय १५ वा. १०५ निराळे अवयव आहेत व त्यांचे व्यापारहि निरनिराळे चालतात, परंतु ते सर्व एकच शरीर आहे. त्याप्रमाणे आम्ही तिघे एक व निरनिराळेहि आहोत. उत्पत्ति, स्थिति व लय या तीन कार्यासाठी आम्ही तिघे भिन्न आहोत, बाकी सर्व एकच आहोत. परमात्मा हा एकच आहे. तो निराकार, अविकारी, स्वयंज्योति असा आहे, तो आमचा मूळ आहे. आम्ही त्याचे अंशभूत आहोत. त्याला रूप नाहीं, कर्म नाहीं, नाव नाहीं असा तो आहे. तेव्हां आम्हां तिघांनां भिन्न मानून जो आमची सेवा करील, त्याला पुण्यफलाची प्राप्ति होणार नाहीं. हरिहरांमध्ये भेद मानून जो वागतो त्याला कोटि ब्रह्महत्येचें व कोटि गोहत्येचें पातक लागतें. तूं असाच भेद मानलास म्हणून तुझी अशी विटंबना झाली. शिर नाहींसें होऊन हजार वर्षेपर्यंत तुझें धड मृत्तिकेवर पडलें. मी व शंकर एकरूप असल्यामुळे तूं मला जो हविर्भाग दिलास तो शंकरानां मिळाला व शंकरानां जो दिलास तो मला मिळाला आणि ब्रह्मदेव हा माझ्या नाभिस्थानी असल्यामुळे तो नेहमीं मजजवळ असतोच झणून आह्मां दोघांची सेवा करणारांनां तिघांचीहि सेवा करण्याचें पुण्य लागतें. तूं या यज्ञ प्रसंगी आमच्यामध्यें भेदभाव न ठेवितां सेवा केलीस हाणून मी तुला प्रसन्न झालो आहे. तुला तुझ्या इच्छेप्रमाणें या योगाचें फल मिळून तुला एक लक्ष पुत्र होतील. भगवंतांनी दक्षप्रजापतीला याप्रमाणे सांगितल्यावर, त्यांचीं • सर्व देव, दिकूपाळ व ऋषि यानीं पूजा व प्रार्थना केली. नंतर ब्रह्मा, विष्णु व महेश हे तिघेहि तेथून अदृश्य झाले. " ३ दक्षाचे एक लक्ष पुत्र. वैशंपायन ऋषि हाणाले " हे राजा ! याप्रमाणें त्या दक्ष राजाचा यज्ञ यथा- सांग पूर्ण झाल्यावर, त्यानें यज्ञासाठी जे ऋषि, देव, दिक्पाळ, ब्राह्मण, मांडलिक राजे वगैरे आले होते त्या सर्वांनां भोजनाला बसविलें. भोजनाची तयारी दक्षानें सर्वोत्कृष्ट केली होती. मंडप सुंदर डांगारिला होता, मंडपांतील भूमि सडा- संमार्जन करून स्वच्छ केली होती, सुवर्णाचे पाट रांगेनें मांडले होते, पाटासमोर सुवर्णाची ताटें ठेविलीं होतीं, अनेक रंगांच्या रांगोळ्या घातल्या होत्या, सुवर्णाच्या वाट्या पानापुढे ठेविलेल्या होत्या, नाना प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, भात, रायतीं, शिखरिणी व लाडू, जिलब्या, अनारसे, करंज्या, श्रीखंड, बासुंदी केसरीभात, मोहनभोग, मांडे, फेण्या, घीवर वगैरे पक्कान्नांनी ताटें भरल्यावर दक्षानें सर्वांना बोलावून ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणें व वर्णाश्रम धर्माप्रमाणे पाटांवर बसवून संकल्प केला व जेवावयाला बसण्याविषयी विनंति केली. त्या बरोबर सर्वानी - हरहर महादेव - असा ध्वनी करून जेवण्यास आरंभ केला; ते अमृताप्रमाणे मधुर व रुचकर पदार्थ सर्वांनी आकंठ भक्षण केले. सर्वांची भोजनें झाल्यावर दक्षानें आपले सर्व द्रव्यभांडार ब्राह्मणाकडून लुटविलें. त्यानें ब्राह्म- णांनां पांच लक्ष सुवर्णाची हरणें, एक लक्ष सुवर्णाचे घोडे, दहा हजार सुवर्णाचे