पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ कथाकल्पतरु. [ स्तबक 66 कानांत कुंडलें डुलत होती, मस्तकाला कस्तूरी लाविली होती, शेषानें आपली फणा उभारून छत्र धरिलें होतें; अशी ती प्रभूची मूर्ति यज्ञकुंडांतून प्रकट झाल्यावर शंकर, ब्रह्मदेव व प्रजापति हे अनंतास नमस्कार करून त्याची प्रार्थना करूं लागले. दक्षप्रजापति आपल्या हातांत पूजेचें सर्व साहित्य घेऊन उभा राहिला व विष्णूला ह्मणाला. हे देवाधिदेवा ! तुझी आज पर्यंत कीर्ति ऐकत होतों, परंतु तुझी मूर्ति दृष्टीस पडली नव्हती; ही मूर्ति दृष्टीस पडावी ह्मणून महान महान तपस्वी अनंत कालपर्यंत तपश्चर्या करितात, परंतु त्यांनां दर्शन होत नाहीं. पण या दासाला दर्शन घडलें हैं याचें महद्भाग्य होय. हे लक्ष्मीरमणा भगवंता ! तूं अगम्य आहेस, तूं निर्गुण ब्रह्म आहेस, तुझी योग्यता जाणण्यास आह्मीं अज्ञानी असमर्थ आहोत. तुझ्या दर्शनामुळे माझ्या सर्व पातकांचा नाश झाला. तुझ्या कृपाकटाक्षानें माझा उद्धार झाला. मला योग्य असें फल मिळाले असें वाटतें. हे श्रीपती ! हे विश्वनाथा आतां माझी आधिदैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक या तीन प्रकारच्या तापांतून सुटका कर स्त्री पुत्र व अन्य आप्त यांचें मरण डोळ्यांनीं पाहणें हा जो आधिदैविक ताप, भूत, भैरव, जखिणी, या दुष्टांपासून पीडा होणें हा जो आधि भौतिक ताप, व द्रव्यापहरण, गोत्रवध, श्वान- भक्षण व जीवांपासन पीडा वगैरे जो आध्यात्मिक ताप, हे तीन ताप अत्यंत जाचक आहेत, मला त्यांची फार भीति वाटते; तुझ्या प्रत्यक्ष दर्शनाने माझी या तापत्रयांतून सुटका झाली अशी मला खात्री वाटते. माझें जन्ममरण आतां खास चुकलें. याग कर्माचे आरंभी माझे स्वप्नांत येऊन तुला पूर्णाहुतीचें वेळी दर्शन देईन म्हणून आश्वासन दिलें होतें, तें आश्वासन जसें पुरें केलें; तसेंच हे प्रभो ! मला पुत्रदान देऊन या संसारबंधनांतून माझी सुटका करावी. " ( दक्षप्रजापतीनें श्रीअनंताची याप्रमाणें प्रार्थना केल्यावर भगवान लक्ष्मी- रमण म्हणाले; " हे दक्षप्रजापते ! तुझ्या निःसीम भक्तीमुळे मी तुला प्रसन्न झालों आहे. तुझी माझ्यावर श्रद्धा किती ऊज्ज्वल आहे हे पाहण्यासाठी मीच तुझ्या या यज्ञांत विघ्न आणिलें होतें; मी, ब्रह्मदेव व महारुद्र या तिघांमध्यें जो भेद- भाव ठेवील त्याची कशी दुर्गति होते हैं तुझ्या चरित्रावरूव लोकांना चांगलें कळून येणार आहे. हे दक्षा ! आम्ही तिघेहि एकच आहोत. तेज, गार व पैलू या तिहींनीं हिरा होतो, पण त्यापैकी कोणा एकाचा स्वीकार करून जसा कांही फायदा नाहीं, त्याप्रमाणे आम्हांपैकी एकाची सेवा करून एकाचा द्वेष करण्यापासून फल तर कांहीं नाहींच, पण तसे करणे हा पापमार्ग होय. तूप काढण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तूप मिळते पण दूध फुकट जाते. तूप व दूध एकच आहे. दुधावांचून तूप मिळणार नाहीं, पण हें न कळता जो आम्हां हरिहरापैकी एकाची सेवा व दुसऱ्याचा द्वेष करितो तो खरोखर पाप- मार्गाने जात असतो आणि शेवटीं नरकास जाऊन पोहोचतो. हरिहरांस निर- दुधांतून म्हणजे