पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ कथाकल्पतरु. फरक होता किं, त्याच्या हृदयांत शंकराविषयीं द्वेष नसून प्रेम होते. प्रेमानें आरंभिलेल्या कार्याचें फळहि नेहमी चांगले असेंच मिळावया नें" [ स्तवक शंकराच्या अध्याय १५ वा. १ यज्ञकुंडांतून शेषशाई भगवान निघाले, ती कथा. शंकरांनी दक्षास प्राणदान दिल्याची कथा ऐकून जनमेजय राजा वैशंपायन ऋषीला म्हणाला; " मुनिवर्य ! आपण दक्ष राजाची कथा सांगितली ती ऐकून फार आनंद झाला. दक्षानें यज्ञाला आरंभ करण्यापूर्वी त्याने शाई- धराची प्रार्थना करून त्यानां प्रसन्न करून घेतले होते. त्यावेळी शार्ङ्गधरानें मी तुझे यज्ञांत पूर्णाहुतीचे वेळी प्रत्यक्ष येईन म्हणून दक्षाला आश्वासन दिलें होतें, त्याप्रमाणें विष्णु पूर्णाहुतीचे वेळीं प्रगट झाले किंवा नाहीं, तें ऐकण्याची माझी इच्छा आहे; तर कृपा करून मला दक्षयज्ञाची पुढील कथा सांगावी.” राजाची ती इच्छा जाणून वैशंपायन ऋषि हाणाले; " राजा ! महादेवांनी दक्षाला प्राण देऊन यज्ञ करण्याची परवानगी दिल्यावर दक्षानें यज्ञास आरंभ केला व त्या यज्ञाचें कार्य त्यानें मोठ्या उत्साहानें चालविले होते. त्यानें आपल्या एकूण- साठ कन्या, त्यांचे पुत्र, पति, वगैरे अनेक आप्तांना त्या यज्ञासाठी बोलाविलें होते. त्याच्या राज्यांत जे मांडलिक राजे होते ते त्याची आज्ञा झाल्याबरोबर यज्ञमंडपांत येऊन राजाला साह्य करीत होते, अन्य देशांतल्या मोठमोठ्या राजांनां मुद्दाम निमंत्रणें पाठवून त्यांना यज्ञ समारंभासाठी आणविलें होतें. त्यांनी आपल्या राज्यांतील प्रजाजनांनाहि बोलाविलें होतें. यागपात्रे, समिधा, घृत व यज्ञासाठीं लागणारें अन्य साहित्य सिद्ध झाल्यावर सुमुहूर्त पाहून याला आरंभ केला, यज्ञ समाप्तीचे वेळी त्याला जें कांहीं दान करावयाचें होतें तें सर्व त्यानें यज्ञमंडपांत आणून ठेविलें होतें. ब्रह्मदेव, अध्वर्यु, होता, आचार्य, उद्गाता वगैरे ऋत्विजांच्या हातांत यज्ञकंकणे बांधिली. पुण्याहवाचन झाल्यावर दक्ष- राजानें सर्व ब्राह्मणांना नमस्कार केला व तो यज्ञकुंडाजवळ बसला. ऋत्विजांनी अमीस आवाहन करून मंत्रानें अनि सिद्ध केला. अग्नि सिद्ध झाल्यावर हव नास आरंभ झाला. यज्ञयागाचे पद्धतिप्रमाणें वेदमंत्रांनी देवदिक्पाळांना आहुत्या यज्ञकुंडांत जेव्हां ऋत्विज टाकू लागले तेव्हां सर्व देवदिक्पाळांना अत्यंत आनंद झाला. पूपाला दांत नव्हते म्हणून त्याला सातूच्या पिठाची आहुती दिली. मद्य, मांस, क्षीर, घृत, पुष्पें, पंचामृत वगैरे सर्व साहित्य तेथें असल्यामुळे त्या यज्ञांत उणे कांहींच भासत नव्हतें. महादेव तो यज्ञसमारंभ मोठ्या कौतुकानें पहात होते. शंकराला हविर्भाग देण्याची जेव्हां पाळी आली तेव्हां तो हविर्भाग दक्षानें