पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रा. ] अध्याय १४ वा. शक्ति न ओळखून तुला वाटेल तसे बोललों त्याचें मला योग्य असेंच प्रायश्चित्त मिळालें. मी आपणापाशीं इतका नीचपणानें वागलों, परंतु आपण मला कृपाह- ष्टीनेंच वागविलें. आपणांस तृतीय नेत्र उघडून संपूर्ण त्रिभुवनही भस्म करून टाकितां आलें असतें; मग मजसारख्या मशकाला चिरडून टाकावयाला किती वेळ लागला असता. हे परमात्मन् ! हे गंगाधरा ! नंदी व वीरभद्र आदिकांनी - माझी जी विटंबना केली ती योग्य अशी केली, माझा अहंकार, माझा अभिमान, माझा दुर्मद व माझे अज्ञान, त्यामुळे नाहींसें झाले, हे त्यांचे मजवर उपकारच झाले आहेत. हे अविनाशी अभंगा ! या सृष्टीतील मुखदुःखाचे प्रकार हे केवळ तुझे इच्छातरंग होत. सर्वांना कार्यकारण तूंच आहेस. हे विश्वनाथा ! मजवर कृपा करून मला जसें उः शापिलेंस त्याप्रमाणें भृगुऋषि व पूपापानांहि उःशाप देऊन त्यांची विटंबना दूर करावी. त्यांच्या अपराधाचेंहि त्यांनां पुरे प्रायश्चिच मिळाले आहे, त्यांच्यावर दया करावी. " दक्षप्रजापतीनें याप्रमाणें शंकराची प्रार्थना केल्यावर भृगु व पूषा महादेवापुढे येऊन उभे राहिले व त्यांनींहि शंकराची अंतःकरणपूर्वक स्तुति केली. तेव्हां शंकर प्रसन्न झाले व त्यांनी दोघांनां उःशाप देऊन भृगु ऋषीच्या ओंटाला बोकडाची मिशी लाविली, व पूषाला बोकडाचेच डोळे बसविले. याप्रमाणे सर्वाना शापमुक्त केल्यावर शंकर म्हणाले; "हे प्रजापति ! आतां तूं पुन: यागाचें साहित्य मिळवून यागाला आरंभ कर." १०१ महादेवांनीं यज्ञाची आज्ञा दिल्यावर सर्व ऋषि, देव, यक्ष, किन्नर, यांनां अत्यंत हर्ष झाला. दक्षानें पूर्वीपेक्षां या यज्ञाची तयारी अधिक थाटाची केली. • सर्वांचा उत्साह द्विगुणित झाला होता. यज्ञमंडप अत्यंत भव्य व विस्तीर्ण घातला होता. ध्वजा, पताका, तोरणें व लतापत्रे इत्यादिकांनी मंडप पूर्वी- पेक्षा अधिकांगारिला होता. संरक्षणाचें कामी दिक्पाळांची नेमणूक केल्या- वर पूर्वीचेच ऋत्विज वगैरे यज्ञाला बसविले. यज्ञपुरुष मृगाच्या वेषानें यज्ञकुंडांतून पळून गेला होता म्हणून त्यास आणण्यासाठीं भृगु वगैरे गेले होते, परंतु तो · न येतां पुढे पळू लागला. पळतां पळतां तो तारकामंडळांत गेला. शेवटी देवांनी मोठी शिकस्त करून त्याचें कातडें घरलें, परंतु तो मृग कातडे टाकून तसाच पुढे पळून गेला. तेव्हां देवांनीं त्वचा व त्वचेला असलेली त्याची शिंगे असें घेऊन ते यज्ञपंडपांत आले. मग महादेवांनी यज्ञकुंडाजवळ दक्षप्रजापति व प्रसूती यांनां बसवून त्यांच्याकडून पुण्याहवाचन करविलें व यज्ञास आरंभ केला. ऋषींचे चेहरे पुनः आनंदित होऊन त्यांनी हर्षभरानें वेदघोष कर- ण्यास आरंभ केला. ऋत्विज यज्ञकुंड प्रदीप्त करून आहुत्या देऊं लागले, देव आकाशांतून पुष्पवृष्टि करूं लागले, दुंदुभी वाजूं लागल्या, होमाच्या धुरानें दश- दिशा भरून गेल्या, वाद्यांच्या गजरानें आकाशमंडळ दुमदुमून गेलें; आणि . पुन: पूर्वीप्रमाणे त्या दक्षप्रजापतीचा तो याग सुरू झाला. या वेळी इतकाच .