पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक , पतीवर सिंचन केली व जीवास आवाहान केलं. त्या बरोबर पंचप्राणांनी दक्षाचे हृदयांत प्रवेश केला व तो सर्वावयवांनी सजीव झाला. इतक्यांत महादेवांनी आपल्या अंगावरील व्याघ्रांचर काढून त्यानें दक्षप्रजापतीचा सर्व देह मस्तकासह आछादन केला. नंतर कांहीं मंत्र प्रयोग केल्यावर दक्षाचें शारे- रांत सर्व धातुरस, ज्ञान व शक्ति हीं निर्माण होऊन त्याचें तें बस्तमस्तक नाहींसें झालें व तेथे त्याचें पूर्वीचें अत्यंत सुंदर असें मुख येऊ लागलें. इतके झाल्यावर महादेवांनी त्याच्या आंगावर घातलेले व्याघ्रांबर काढून घेतलें. तेव्हां सर्व देवांनां व प्रसूतीला पूर्वीप्रमाणे सर्वांग सुंदर, तेजस्वी व तसाच शक्तिसंपन्न दक्ष पाहून अत्यंत आश्चर्य वाटलें, व सर्वोनां महदानंद झाला. सर्वांनी महादेवांचा जय- जयकार केला. " कथाकल्पतरु. पुनः यज्ञसमारंभ. दक्षराजा जेव्हां डोळे उघडून पाहू लागला, तेव्हां त्याला नीलकंठाची कर्पूर गौर नागभूषित अत्यंत तेजस्वी अशी मूर्ति दिसली. शंकराला समोर पाहिल्या- बरोबर दक्षाचे हृदयांत सात्विक मनोवृत्ति उत्पन्न झाल्या व अंतःकरणांतील पूर्वीचा उन्मत्तपणा, अहंमान्यता, मत्सर, कपटत्व, निर्दयत्व, असहिष्णुत्व वगैरे दोष नाहींसे झाले. पूर्वी हातून झालेल्या अपराधाबद्दल त्याला अत्यंत पश्चात्ताप होऊं लागला. त्या पश्चात्तापामुळे आपण अत्यंत नीचप्रकृति आहों असें त्याला वाटू लागलें. आपण इतका द्वेष केला तरी महादेवांनी आपले सर्व अपराध पोटांत घालून आपणास परत प्राणदान दिलें याबद्दल त्याला लाज वाटू लागली. महादेवांचा तो अनुपमेय मोठेपणा पाहून आपलें क्षुद्रत्व दक्षाच्या लक्षांत आले. दाक्षायणीचा नाश होण्यास सर्वस्वी आपण कारण असून, तें सर्व महादेव विसरून गेले व आपणास प्राणदान देण्यासाठी येथवर आले याबद्दल त्यांचे उपकार कोणत्या शब्दानें मानावेत हें त्याला कळेना. त्याच्या अंतःकरणांत गहिवर उत्पन्न झाला. प्रेम दाटून आले, कंठ भरून आला, आणि डोळ्यांतून अश्रु वाहूं लागलें, सर्व अंगावर रोमांच उभे राहून शरीर थरथर कांपूं लागलें. महादेवांनां साष्टांग प्रणाम करून व हात जोडून तो गद्गद स्वरानें ह्मणाला; “ हे कैलासपते विश्वनाथा ! तूं दयेचा सागर आहेस असे मला वाटतें.. मी मोठा अपराधी आहे, उन्मत्तपणामुळे मी तुजबरोबर केवळ पशुप्रमाणे चागलों, परंतु ते सर्व अपराध तूं विसरून जाऊन मला पुनः हें विश्व दाखवि- लेंस. हे जगन्नाथा ! हे विश्वव्यापक विश्वेश्वरा ! हे करुणानिधे ! हे उमारमणा ! हे महारुद्रा ! हे पशुपते! हे चंद्रमौळी ! तुझी अगम्य अपरंपारता मी पूर्वी अहं- मान्यतेमुळे ओळखिली नाहीं. हे ईश्वरा ! तूं परमब्रह्म असून तुझें अविनाशित्व मला अभिमानामुळे जाणतां आलें नाहीं. सर्वांचे प्राणलिंग तो तुं, सर्वांचे कुळदैवत तो तूं, सर्वांचा आत्मा तो तूं, मी अज्ञानी, मतिमंद, मूर्ख, असल्यामुळे तुझी