Jump to content

पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२० कथाकल्पतरू. [ स्वयंक टाकणार होता, पण त्या उत्पन्न झाली. या लहान असें त्याला वाटून त्याने शंबर त्या मुलाला नगराच्या बाहेर आणून मारून वेळी त्याला तशी बुद्धि न होतां त्याच्या हृदयांत दया मुलाचा आपण आपल्या हातानें प्राण घेणें हें बरें नव्हें त्या पांच दिवसांच्या मदनास मोठ्या समुद्रांत फेंकून दिले व आपल्या नगराला निघून गेला. इकडे मुलगा बाळंतिणीच्या खोलींतून नाहींसा झाल्याचे ऐकून सर्व द्वारकेंत एकच आकांत उडाला, सर्व द्वारकानगरी त्या दु:खामुळें दुःखसागरांत बुडून गेल्याप्रमाणे दिसूं लागली. श्रीकृष्णभगवान् व बलराम दोघेहि फार शोक करूं लागले. मुलाचें मुखावलोकनहि केलं नाहीं; तोंच मुलगा नाहींसा झाला, याबद्दल श्रीकृष्णास फार हळहळ वाटू लागली. रुक्मि- णीच्या शोकास तर सीमा उरली नाहीं. ती आपले मस्तक आपटून मोठ्याने टाहो फोडूं लागली. शोकानें तिची अवस्था वेड्याप्रमाणे झाली, ती शोकभराने म्हणाली, “हे महादेवा, तूं आपल्या कृपाप्रसादाने पुत्र दिलास, पण तो लागलाच नाहींसा तुझ्या वरदानाने मिळालेले फळ अशा रीतीनें नाहींसें व्हावें हें तुझ्या बोदाला शोभत नाहीं. तूं दिलेलें अक्षय राहतें अशी तुझी कीर्ति असून आज हैं विपरीत कसें झालें ? देवा महादेवा ! तुझ्या बोलाला अशा रीतीनें खोटे- पणा येणें हें चांगलें कां ? " नंतर ती कृष्णाकडे व बळरामाकडे पाहून म्हणाली; “अहो, तुम्हीं एवढें पराक्रमाचे पर्वत असतां माझें अर्भक कोणीहो चोरून नेलें ?', श्रीकृष्ण त्रिकालज्ञ होते, त्यांना सर्व प्रकार ज्ञानदृष्टीनें कळला होता, परंतु त्या वेळी त्यानांदेखील रुक्मिणीची समजूत करितां येईना. नंतर मोठ्या कष्टाने त्यांनी तिला झालेला प्रकार कळविला, व 'मदन हा चिरंजीव आहे, त्यास कोणाकडू- नहि मृत्यु येणार नाहीं. तो कुशल आहे. तो तुला लवकरच येऊन भेटेल. वगैरे अनेक धीराच्या गोष्टी कृष्णानें रुक्मिणीस सांगून तिचे शांतवन केलें. झाला. ३ रतिमन्मथ भेट. 2 बाई प्रभावती, आतां इकडे मदनाची काय स्थिति झाली ती ऐक. त्यास शंबरानें समुद्रांत फेंकून दिल्यावर एका मोठ्या माशाने मदनास गिळून आपल्या पोटांत घेतलें, परंतु मदन त्या मोठ्या माशाच्या पोटांत आनंदानें खुशाल खेळू लागला. एके दिवशी एक कोळी समुद्रतीरी जाऊन त्यानें समुद्रांत मासे पक- डण्यासाठी मोठें थोरले जाळे टाकले. त्या जाळ्यांत त्या कोळ्याला पुष्कळ मासे सांपडले; त्यांत तो मोठा मासाहि होता. तो मोठा मासा पाहून त्या कोळ्याला व त्याच्या स्त्रीला फार आनंद झाला. तो मोठा मासा त्या कोळ्यानें पुष्कळ पैसे यावेत या उद्देशाने शंबरासुरास नेऊन विकला. तो मोठा मासा पाहून शंबरा मुरास फार दर्प झाला व त्याने त्या कोळ्याला मोठें इनाम देऊन तो मासा लाग- लाच पाकशाळेत पाठवून दिला. त्या वेळीं पाकशाळेची सर्व व्यवस्था मदनाची स्त्री रति हिच्याकडे होती. रतीनें तो मासा चिरला, तो त्यांतून एक सर्वांग